Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीतून फक्त एक फोन आला अन् महाडिकांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे; सतेज पाटील बिनविरोध

भाजप-महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद जागांबाबत (Legislative Council Election) बिनविरोधचा फॉर्म्युला ठरल्यामुळे राज्यामधील विधानपरिषद निवडणुका बिनविरोध झाल्या. आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाला.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 26, 2021 | 04:14 PM
दिल्लीतून फक्त एक फोन आला अन् महाडिकांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे; सतेज पाटील बिनविरोध
Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : भाजप-महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद जागांबाबत (Legislative Council Election) बिनविरोधचा फॉर्म्युला ठरल्यामुळे राज्यामधील विधानपरिषद निवडणुका बिनविरोध झाल्या. आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाला. या निवडणुकीत राज्याचे लक्ष लागून राहिलेली ‘हाय व्होल्टेज’ समजली जाणारी ‘पाटील-महाडिक’ लढत बिनविरोध झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष सुरु झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या महाराष्ट्रातील सर्वच जागा बिनविरोध करण्याच्या जोरदार हालचाली सुरू होत्या. भाजप- महाविकास आघाडीमध्ये याबाबतचा ‘समझोता एक्स्प्रेस’ चालू होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी रात्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली होती. त्यांच्या पाठोपाठ आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसही दिल्लीमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध होणार या निर्णयाला बळ आले होते. त्याप्रमाणे, आज राज्यातील सर्व विधान परिषद निवडणुका बिनविरोध करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक म्हटली की ‘पाटील-महाडिक’ यांची लढत डोळ्यासमोर येते. कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक यांच्यात इर्ष्येची लढाई होणार होती. गेल्या वेळी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव करून विधानपरिषदेत एंट्री केली होती. कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय वर्चस्वासाठी पाटील आणि महाडिक यांच्यात लढतीमुळे राजकीय वातावरण तापले होते. पण भाजप-महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद जागांबाबत बिनविरोधचा फॉर्म्युला ठरल्यामुळे अर्ज माघारीसाठी कोल्हापुरातील महाडिक कुटुंबाला भाजपने दिल्लीहून फोन केला. त्याप्रमाणे अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड झाली.

भाजप उमेदवार अमल महाडिक यांनी आपला अर्ज माघार घेतल्यानंतर संपूर्ण शहरात विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची भव्य आतिषबाजी करत गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. तर अजिंक्यतारा येथे सतेज पाटील यांच्या कार्यालयात संपूर्ण जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी नेते आणि गर्दी केली होती. निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आघाडी कार्यकर्त्यांच्यात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Satej patil win unopposed in kolhapur legislative council election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2021 | 04:14 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Satej Patil
  • अमित शहा

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक
1

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
2

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.