टी-२० वर्ल्डकपची (T-20 World Cup) सुरूवात जेव्हापासून झाली आहे. त्यापासून पाकिस्तान क्रिकेट टीम (Pak Team) सतत चर्चेमध्ये आहे. पाकिस्तान संघाने आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा (Team India) पराभव केला. त्यानंतर माजी क्रिकेटर सतत टीव्हीवर झळकत आहेत. पाकिस्तानचे माजी क्रिकेटर शोएब अख्तर यांच्यासोबत पाकिस्तानी टिव्हीवर (Pak TV) असं काहीतरी झालं की, त्यांनी आपला राजीनामा (Resign) लाईव्ह टीव्हीवरच दिला आहे. शोएबने सांगितलं की, माझ्यासोबत ज्या प्रकारे वर्तन करण्यात आलं आहे. ते सहन करण्याच्या पलीकडे आहे.
पाकिस्तानच्या पीटीव्ही वर शोएब अख्तरसह अजून काही माजी क्रिकेटर्सनी एका चर्चेमध्ये सहभाग घेतला होता. या चर्चेमध्ये शोएब अख्तर, विविअन रिचर्डस, सना मीर यांच्याशिवाय माजी क्रिकेटर सुद्धा उपस्थित होते. ज्यामध्ये शोच्या अँकर डॉ. नौमान होत्या. याचदरम्यान त्या असं काही बोल्ल्या की, शोएब अख्तरांना खूप वाईट वाटलं आणि त्यानंतर त्यांनी पीटीव्हीला राजीनामा देणार असल्याचं आवाहन केलं आहे.
टीव्ही शोवर काय झालं होतं ?
या वादात शोएब अख्तर, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ यांच्याबाबत काही मुद्दे मांडत होता. यादरम्यान डॉ.नौमानने शोएब अख्तरला सांगितले की, तुम्ही उद्धटपणे बोलत आहात, मी हे नाही सांगत आहे की, तुम्ही ओव्हर स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करत आहात, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. यानंतर शोएब अख्तर म्हणाला की, ही गोष्ट इथेच संपवा, मी तुमच्याविरुद्ध काही बोलत नव्हतो, या मुद्द्यावर बोलत होतो.
Multiple clips are circulating on social media so I thought I shud clarify. pic.twitter.com/ob8cnbvf90
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) October 26, 2021
दरम्यान, या गोष्टीनंतर शोेएब अख्तर थांबला नाही आणि त्याने लाईव्ह टीव्हीवरच आपला राजीनामा देण्याचं आवाहन केलं आहे. शोएबने सांगितलं की, मी पीटिव्हीमधून राजीनामा देत आहे. ज्या प्रकारे माझ्यासोबत राष्ट्रीय स्तरीय टीव्हीवर गैरवर्तवणूक करण्यात आली. त्यामुळे मला वाटतं नाही की, मला येथे थांबलं पाहिजे. यानंतर शोएब अख्तरने लाईव्ह टीव्हीवरील शो सोडला.