कुडाळ तालुक्यातील नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघात नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इतर ठिकाणी महायुती विरोधात ठाकरे सेना अशी होणारी निवडणूक नेरुरमध्ये मात्र ग्रामविकास आघाडीच्या प्रवेशाने वेगळ्या वाटेने लढली जाणार आहे. नेरुरमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार रुपेश पावसकर हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. ग्रामविकास आघाडीतर्फे पावसकर निवडणूक लढवत असताना त्यांना ठाकरे सेनेने पाठिंबा दिल्याने नेरुरमधील महायुतीचे उमेदवार संजय पडते यांच्यासमोर नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीचे आव्हान उभे राहिल्याच चित्र दिसत आहे.