‘द कपिल शर्मा शो’मुळे(The Kapil Sharma Show) सुमोन चक्रवर्तीला(Sumona chakravarti) नवी ओळख मिळाली. या शोच्या माध्यमातून सुमोनने अनेकांच्या मनात घर केले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे कपिल शर्मा शोचे चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे सुमोनवर आर्थिक संकट कोसळले आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर(Social Media post) एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमध्ये तिने आपल्याला गंभीर आजार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
सुमोनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक वर्कआऊट करतानाचा फोटो शेअर केला आहे.
हा फोटोसोबत तिने लिहिले आहे की, ‘खूप दिवसांनंतर मी घरात वर्कआऊट केला आहे. मी सध्या बेरोजगार असले तरी माझे आणि माझ्या कुटुंबियांचे पोट भरु शकते. कधी कधी मला अपराधीपणाची भावना जाणवते. तेव्हा मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेऊ शकत नाही. मी २०११ पासून एंडोमेट्रिओसिस या आजाराशी लढत आहे. या आजाराच्या चौथ्या स्टेजचा मी सामना करत आहे. चांगले जेवणे, व्यायाम आणि ताणवमुक्त आयुष्य यावरचा उपाय आहे’.
[read_also content=”‘दिठी’च्या निमित्तानं प्रथमच वारकऱ्याची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली – किशोर कदम https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/know-about-kishor-kadam-role-in-dithi-movie-nrst-128960/”]
पुढे ती सांगते की, ‘लॉकडाऊन माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या कठीण होता. मी आज वर्कआऊट केल्यावर मला बरं वाटलं. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरे जात असतो. प्रत्येकाला संघर्ष करावा लागतोच.’
सुमोनने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे.पण ‘द कपिल शर्मा शो’मुळे ती घराघरात पोहोचली.