प्रतिकात्मक फोटो
सांगली : एका मेंढीची किंमत सव्वा दोन लाखांहून अधिक किंमत मिळू शकते हे कोणाला पटणार नाही. पण सांगलीच्या माडग्याळ बझारात एका मेंढीची विक्री दोन लाख 33 हजारांना करण्यात आली. त्यामुळे आनंदित झालेल्या शेतकऱ्याने मेंढीची हलगीच्या निनादात भव्य मिरवणूक काढली आणि आनंद साजरा केला.
जत तालुक्यातील माडग्याळ येथील मय्याप्पा चौगुले या शेतकऱ्याच्या सहा मेंढ्यांच्या विक्री तब्बल 14 लाख रुपयांना करण्यात आली. मेंढ्यांना लाखो रुपयांचा भाव मिळाल्याने गावात मिरवणूक काढण्यात आली. माडग्याळमधील मेंढीची चांगले रुबाबदार नाक विशिष्ट चव आणि स्वाद असलेले मांस प्रसिद्ध आहे. त्यामुळे माडग्याळ मेंढीचे दर वाढलेले आहेत.
माळ रानावर आणि दुष्काळी भागात कमीत कमी चारा खाऊन शेतकऱ्याला चांगला भाव मेंढी मिळवून देत आहे. तर माडग्याळचा बझार प्रसिद्ध आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात मेंढी विक्रीस येत आहेत. त्याची मागणीही वाढू लागली आहे.






