यंदाच्या पावसाळ्यात मुंबईजवळील या 5 ठिकाणांची सफर म्हणजे स्वर्गसुखच! थंड वातावरण आणि मंत्रमुग्ध करणारी दृश्ये...
पावसाळा म्हणजे फिरण्याचा ऋतू! या ऋतूत अनेक ठिकाणांचे सौंदर्य आणखीनच वाढते आणि सर्वत्र हिरवेगार दृश्य लागते. आज आम्ही तुम्हाला मुंबईजवळील काही सुंदर ठिकाणे सांगत आहोत जिथे तुम्ही मान्सूनचा आनंद लुटू शकता
या यादितील पहिलं ठिकाणं म्हणजे, कान्हेरी लेणी (Kanheri Caves). ही लेणा महाराष्ट्रातील मुंबई शहरात, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वसली आहे. या लेण्या 2000 वर्षांपासून बांधलयाचे सांगितले जाते. या लेण्यांमधील उत्कृष्ट कोरीवकाम आणि शिलालेख या लेण्यांना आणखीन खास बनवते
आपलं दुसरं ठिकाण आहे आशापुरी एडवन (Ashapuri Edvan). सफाळे एडवन येथील आशापुरी मंदिर हे एडवन गावाजवळ स्थित आहे. मुख्य म्हणजे हे मंदिर समुद्राच्या काठावर वसले आहे. इथल्या समुद्रकिनाऱ्यावर एक उत्तम वेळ घालवत येईल
बोरिवली येथील त्रिमंदिर (Trimandir) हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे समुद्रसपाटीपासून ३०० फूट उंचीवर आहे आणि येथे अनेक देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. या मंदिरासमोर हिरवेगार वातावरण पाहता येते जे मनाला मंत्रमुग्ध करते
वांद्री तलाव (Vandri Lake) हे पालघर जिल्ह्यातील एक सुंदर ठिकाण आहे, जे मुंबईपासून सुमारे 61 कि.मी. अंतरावर आहे. हे तलाव शांत आणि निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखले जाते, तसेच येथे ट्रेकिंग, सायकलिंग आणि कॅम्पस सारख्या विविध ऍक्टिव्हिटीजचा आनंद घेता येतो