Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चमचमीत आणि मजेदार… मुंबईतल्या या खाऊ गल्ल्यांमध्ये कधी गेलाय का?

मुंबईतील खाऊ गल्ल्या खवय्यांसाठी स्वर्गच आहेत. घाटकोपरपासून मोहम्मद अली रोडपर्यंत प्रत्येक गल्लीत शाकाहारी-मांसाहारी, चटपटीत आणि खास फेमस पदार्थांची मेजवाणी पाहायला मिळते.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 24, 2025 | 08:46 AM
चमचमीत आणि मजेदार... मुंबईतल्या या खाऊ गल्ल्यांमध्ये कधी गेलाय का?

चमचमीत आणि मजेदार... मुंबईतल्या या खाऊ गल्ल्यांमध्ये कधी गेलाय का?

Follow Us
Follow Us:
  • घाटकोपर, चेंबूर, मुलुंड ते मोहम्मद अली रोडपर्यंत प्रत्येक खाऊ गल्लीची स्वतःची खास ओळख आणि फेमस पदार्थ आहेत.
  • विविध प्रकारचे डोसे, स्ट्रीट फूड, पंजाबी-सिंधी पदार्थ तसेच कबाब आणि मांसाहारी खास रेसिपी एका शहरात अनुभवता येतात.
  • गजबजलेले वातावरण, विविध चवी आणि संस्कृती यामुळे मुंबईच्या खाऊ गल्ल्या खवय्यांसाठी एक खास अनुभव ठरतात.
मुंबई ही केवळ स्वप्नांची नगरी नाही, तर खवय्यांसाठी स्वर्ग मानली जाते. या शहराच्या प्रत्येक भागात एखादी तरी प्रसिद्ध खाऊ गल्ली हमखास आढळते. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गजबजलेल्या या गल्ल्यांमध्ये शाकाहारी, मांसाहारी, चटपटीत, झणझणीत, गोड असे सर्व प्रकारचे पदार्थ चाखायला मिळतात. विशेष म्हणजे प्रत्येक खाऊ गल्लीची स्वतःची वेगळी ओळख आणि एखादा खास फेमस पदार्थ असतो. त्यामुळे मुंबईतील खाऊ गल्ली केवळ खाण्यासाठीच नव्हे, तर अनुभव घेण्यासाठीही लोकांना आकर्षित करतात.

खरंच पाकिस्तानात जाऊन धुरंधरची शूटिंग झाली आहे का? कराचीसारख्या दिसणाऱ्या त्या गल्ल्यांचे सत्य काय…

घाटकोपर पूर्व येथील खाऊ गल्ली शाकाहारी पदार्थांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. इथे डोशाचे असंख्य प्रकार पाहायला मिळतात. चीज बर्स्ट डोसा, मसाला डोसा, मंचुरियन डोसा, आयलंड डोसा आणि अगदी आइस्क्रीम डोसा देखील इथे मिळतो. याशिवाय पाणीपुरी, फाफडा, दाबेली यांसारखे लोकप्रिय स्ट्रीट फूडही येथे खूप चविष्ट मिळते. त्यामुळे शाकाहारी खवय्यांसाठी ही गल्ली म्हणजे एक मोठी मेजवाणीच आहे.

चेंबूर खाऊ गल्ली पंजाबी आणि सिंधी पदार्थांसाठी ओळखली जाते. येथे दाल पकवान, कोकी रगडा, कुलचा यांसारखे खास पदार्थ खाण्यास मिळतात. या गल्लीत फिरताना वेगवेगळ्या चवींमुळे प्रत्येक स्टॉलवर थांबावेसे वाटते. मुलुंड खाऊ गल्ली मसाला वड्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. इथला गरमागरम मसाला वडा खाण्यासाठी लोक आवर्जून येतात. त्यासोबतच तवा पुलाव, भेळपुरी, पावभाजी यांसारखे पदार्थही येथे चांगल्या चवीचे मिळतात.

मोहम्मद अली रोडवरील खाऊ गल्ली मांसाहारी पदार्थांसाठी संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे. येथे विविध प्रकारचे मसालेदार मांसाहारी पदार्थ, कबाब, करी आणि खास रेसिपी पाहायला मिळतात. रमजानच्या काळात तर या गल्लीत प्रचंड गर्दी असते. माहीम दर्ग्याजवळील खाऊ गल्ली अनेकांना माहित नसली, तरी ती खूप लोकप्रिय आहे. येथे चिकन तंदुरी, मोमोज, रगडा चाट तसेच विविध मांसाहारी पदार्थ चाखायला मिळतात.

भारतातील अनोख मंदिर जेथील शिवलिंगाची संख्या नेहमी बदलत राहते, विज्ञानालाही ठाऊक नाही यामागच रहस्य

कार्टर रोड खाऊ गल्ली ही तरुणाईमध्ये विशेष फेमस आहे. इंडो-चायनीज पदार्थ, मोमोज, फ्रोजन दही, वॅफल्स असे अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत. झवेरी बाजारातील खाऊ गल्ली देखील खूप मोठी असून गुजराती पॅनकेक्स, वडापाव, समोसा, तवा पुलाव, दाबेली आणि मूग डाळ भजी यांसारखे पदार्थ येथे सहज मिळतात. एकंदरीत, मुंबईतील खाऊ गल्ल्या म्हणजे विविध चवींचा खजिना असून, प्रत्येक खवय्याने किमान एकदा तरी या गल्ल्यांचा अनुभव घ्यायलाच हवा.

Web Title: Best khau galli of mumbai to visit travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 08:46 AM

Topics:  

  • Mumbai
  • street food
  • travel news

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
1

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स
2

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र
4

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.