Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Bangladesh Realtions: भारत बांगलादेशातील वाढत्या तणावावर अमेरिकेचे वक्तव्य म्हणाला…; जाणून घ्या सविस्तर

गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात हिंदूंवर हल्ले सुर असून सध्या भारत-बांगलादेशातील संबंध बिघडत चालले आहेत. दरम्यान अमेरिकेने भारत आणि बांगलादेसातील वाढत्या तणावावर प्रतिक्रीया दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 11, 2024 | 04:02 PM
India-Bangladesh Realtions: भारत बांगलादेशमधील वाढत्या तणावावर अमेरिकेचे वक्तव्य म्हणाला...; जाणून घ्या सविस्तर

India-Bangladesh Realtions: भारत बांगलादेशमधील वाढत्या तणावावर अमेरिकेचे वक्तव्य म्हणाला...; जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

वॉश्गिंटन: गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात हिंदूंवर हल्ले सुर असून सध्या भारत-बांगलादेशातील संबंध बिघडत चालले आहेत. दरम्यान अमेरिकेने भारत आणि बांगलादेसातील वाढत्या तणावावर प्रतिक्रीया दिली आहे. अमेरिकेने दोन्ही देशांनी त्यांच्या मतभेदांचे शांततापूर्ण मार्गाने समाधान करण्याचे आवाहन केले आहे.

वॉश्गिंटनमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना अमेरेकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले की, भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंधांमध्ये आलेल्या तणावाबाबत अमेरिका सतर्क आहे.भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या अलीकडील बांगलादेश दौऱ्याचा संदर्भ देताना त्यांनी म्हटले की, “आम्ही दोन्ही बाजूंना शांततेने संवाद साधण्याचे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे आवाहन करतो.”

बांगलादेश दौऱ्यात भारताच्या चिंता व्यक्त

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी नुकताच बांग्लादेशचा दौरा केला आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत भारताच्या चिंतेचा पुनरुच्चार केला. ढाक्यातील संवादादरम्यान मिसरी यांनी स्पष्ट केले की, “बांग्लादेशातील अंतरिम सरकारसोबत सहकार्याची भारताची इच्छा आहे.” त्यांनी अल्पसंख्याकांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आणि त्यावर चर्चा केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘भारताविरुद्ध बांगलादेश युनूस सरकार षड्यंत्र रचत असल्याचा पाकिस्तान तज्ञांचा दावा म्हणाले…

शेख हसीना यांचा मोहम्मद यूनुस यांच्यावर आरोप

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मोहम्मद यूनुस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शेख हसीना यांनी म्हटले आहे की, यूनुस यांनी देशात अस्थिरता निर्माण केली असून, हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध यांसारख्या अल्पसंख्याकांवर हल्ल्यांसाठी त्यांना जबाबदार धरले आहे. मोहम्मद युनूस विशेषत: हिंदूंवरील हत्याचारांमागे मास्टरमाईंड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, “युनुस यांच्या कारवायांमुळे बांगलादेशात धार्मिक स्थळांवर हल्ले आणि हिंसा वाढली आहे.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

धार्मिक हिंसेचे आरोप

शेख हसीना यांनी आरोप केला की, 5ऑगस्टनंतर बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले आणि सामूहिक हत्यांच्या घटना वाढल्या आहेत. त्यांनी याला सुनियोजित कट म्हणून वर्णन केले. हसीना यांनी असेही म्हटले की, नवीन सरकारने कट्टरपंथीय गटांना मोकळीक दिली आहे, यामुळे देशातील शांतता धोक्यात आली आहे.

याशिवाय पाकिस्तान तज्ञ साजिद तरार यांनी दावा केला आहे की, बांगलादेश भारताविरुद्ध षड्यंत्र रचत आहे. त्यांनी भारताला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताने यावेळी जास्त सतर्क राहण्याची गरज आहे कारण भारताच्या दोन्ही सिमेवर अल-जिहादच्या घोषणा दिल्या जात आहेत. तसेच मोहम्मद युनूस सरकारने पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची ऑर्डर दिलेली आहे. त्यांनी उघडपणे सांगितले आहे की ही शस्त्रे भारतासाठी असण्याची शक्यता आहे.

यामुळे सध्या भारत आणि बांग्लादेशमधील तणाव जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. अमेरिकेने केलेल्या आवाहनामुळे या तणावावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘मागच्या सरकारने केलेल्या चुका टाळा…’; सीरियाच्या नव्या सरकारला कोणी दिला इशारा?

Web Title: Us statement on rising tensions between india and bangladesh know details nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 12:29 PM

Topics:  

  • America
  • Bangladesh
  • india

संबंधित बातम्या

Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय
1

Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय

World News: F-35 चा ‘सिक्रेट पार्ट’ पोहचला हाँगकाँगमध्ये, चीनच्या हाती लागली अमेरिकेची स्टेल्थ टेक्नोलॉजी?
2

World News: F-35 चा ‘सिक्रेट पार्ट’ पोहचला हाँगकाँगमध्ये, चीनच्या हाती लागली अमेरिकेची स्टेल्थ टेक्नोलॉजी?

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?
3

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
4

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.