Whatsapp Scam विषयी HSBC ने जारी केला अलर्ट, आजच सावध व्हा नाहीतर बँक अकाउंट होईल रिकामं
HSBC ने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून होणाऱ्या घोटाळ्यांबाबत सर्वसामान्यांना इशारा दिला आहे. एचएसबीसी ॲसेट मॅनेजमेंटने व्हॉट्सॲपवरील फेक अकाउंट्स आणि ग्रुप्स ओळखले आहेत. यातून लोकांना अडकवले जात आहे. HSBC म्युच्युअल फंड योजनांचे गुंतवणूक व्यवस्थापक HSBC मालमत्ता व्यवस्थापन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (AMC) यांनी सांगितले की, हे फेक अकाउंट्स सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहेत. या गोष्टींवर विश्वास ठेवणे लोकांना महागात पडू शकते. प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, 118 – HSBC ॲसेट मॅनेजमेंट हे व्हॉट्सॲपवरील फेक अकाउंट्स एक आहे.
होऊ शकते फसवणूक
एचएसबीसीने म्हटले आहे की, व्हॉट्सॲपवरील असे ग्रुप्स आणि अकाउंट्स एएमसी किंवा त्यांचे कोणतेही कर्मचारी चालवत नाहीत. या फेक अकाउंट्समध्ये 118 HSBC ॲसेट ममॅनेजमेंटचा समावेश आहे. या ग्रुप्सवर चुकीची माहिती शेअर केली जात आहे, ज्यावर लोकांचा विश्वास बसत आहे. एचएसबीसीने अशा माहितीवर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला आहे. एचएसबीसी ॲसेट मॅनेजमेंटने सांगितले की, आमच्या वतीने असे कोणतेही अकाउंट्स तयार केलेली नाहीत. त्यांच्यावर अवलंबून राहून युजर्सची काही नुकसान झाल्यास, आम्ही कोणतीही जबाबदारी घेणार नाही. आम्ही या फसव्या कृतींचा तीव्र निषेध करतो आणि लोकांना अशा फसवे अकाउंट्स आणि ग्रुप्सना बळी पडू नये म्हणून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करतो.
Mahakumbh 2025: मोबाईल स्क्रीनवर होईल फुलांचा वर्षाव, फक्त Google वर सर्च करा हा शब्द
नावाचा करत आहेत दुरुपयोग
एएमसीने सांगितले की, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हे एकमेव व्यासपीठ असू शकत नाही जेथे एएमसी निधी किंवा त्याच्या अधिकृत नावाचा गैरवापर केला जाऊ शकतो. घोटाळेबाज एएमसी किंवा फंड ब्रँड वापरून इतर माध्यमांद्वारे घोटाळे चालवण्याचा प्रयत्न करू शकतात.
फेक व्हॉट्सॲप ग्रुपपासून सावध राहा
कंपनीने आपल्या सोशल मीडिया हँडलसह आपले अधिकृत मेल शेअर करून लोकांना विनंती केली आहे की त्यांना फसव्या ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतलेल्या कोणत्याही व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडिया ग्रुप्सबद्दल माहिती द्यावी. कंपनीने म्हटले आहे की , तुम्हाला एएमसी, फंड किंवा त्याच्या अधिकाऱ्यांच्या नावावर कोणताही संशयास्पद ग्रुप्स किंवा फसवणूक करणाऱ्या ॲक्टिव्हिटीज दिसल्या तर कृपया आम्हाला investor.line@mutualfunds.hsbc.co.in वर कळवा, जेणेकरून आम्ही या ॲक्टिव्हिटीजना सामोरे जाऊ शकू आणि योग्य ती पावले उचलू. अशा कोणत्याही उपक्रमाला प्रोत्साहन देऊ नका असे आवाहन युजर्सना देण्यात आला आहे.
PhonePe वर मल्टीपल अकाउंट्स जोडायचे आहेत? मग फॉलो करा या सोप्या स्टेप्स, घरबसल्या होईल काम
Official Handles of HSBC AMC