मुंबई – राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला घालवून शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झालेला आहे. नुकतेच नीती आयोगाच्या बैठकीसाठी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांना केंद्र शासनाने आमंत्रित केले होते. मात्र या बैठकीच्या संदर्भात जेव्हा फोटो काढण्याची वेळ आले, त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभे केल्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. त्याचे आपल्याला दुःख झाल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात! pic.twitter.com/3xYPid3U3N
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2022
नीती आयोगाची अत्यंत महत्वपूर्ण बैठक आज राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक सभागृहात झाली. जी-२० नवीन शिक्षण धोरण, शालेय शिक्षण, आत्मनिर्नभर भारत अशा अनेक विषयांवर यामध्ये चर्चा केली गेली. मात्र त्यात जेव्हा फोटो काढण्याची वेळ आली त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना एकदम शेवटच्या रांगेत उभे केले गेल्याचे चित्रात स्पष्टपणे दिसत आहे. हा फोटो सर्वत्र व्हायरल होतो आहे.
या संदर्भात रोहित पवार यांनी सांगितलं की, काहीही झाले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तब्ब्ल बारा कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करतात आणि अर्थव्यवस्थेचे इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत. याची दखल केंद्र शासन, पंतप्रधान मोदी त्यांनी घ्यायला हवी होती. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत असे स्थान देणे हे मराठी माणसाला राज्यातील प्रत्येक मराठी माणसाला देखील दुःख होण्यासारखेच आहे. म्हणून मला इथे दुःख झाला आहे आणि केंद्रशासन या संदर्भात यापुढे याबद्दलची दक्षता घेईल, अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.