Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार शिखर परिषदेचे उद्घाटन

Marathi Breaking Live Updates : राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्व आणि देश-विदेशसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 19, 2026 | 07:03 PM
Top Marathi News Today Live : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरणावर रोहित पवार आज बोलणार

Top Marathi News Today Live : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरणावर रोहित पवार आज बोलणार

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News Updates :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिखर परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि अनेक जागतिक नेते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी गुरुवारी सकाळी ९:४० वाजता भारत मंडपम येथे होणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी ९:१५ वाजता शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या २० देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे आणि सरकार प्रमुखांचे स्वागत करतील.

पंतप्रधान मोदींचे भाषण सकाळी १०:२५ वाजता सुरू होईल. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यासह अनेक जागतिक नेते आणि उद्योगपती शिखर परिषदेत उपस्थित राहतील. दरम्यान, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा बुधवारी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. नवी दिल्लीत उतरल्यानंतर त्यांनी एक्सवर लिहिले, “नमस्ते, भारत! मी पुन्हा एकदा भारतात आलो आहे. माझा अजेंडा संबंध मजबूत करणे, भागीदारी वाढवणे आणि जगात एआयच्या भविष्यावर चर्चा करणे आहे.”

The liveblog has ended.
  • 19 Feb 2026 07:03 PM (IST)

    19 Feb 2026 07:03 PM (IST)

    भारतातील शिक्षण क्षेत्रात AI ला चालना मिळणार; कोटक एज्युकेशन फाउंडेशनचा 'या' संस्थेसोबत करार

    मुंबई: कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF) ने भारतातील शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर मजबूत व व्यापक करण्यासाठी भारतजेन टेक्नॉलॉजी फाउंडेशनसोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या धोरणात्मक सहकार्याचा उद्देश स्वदेशी, बहुभाषिक एआय उपाय विकसित व लागू करणे हा आहे, ज्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल आणि देशभर गुणवत्तापूर्ण शिक्षण अधिक सुलभ होणार आहे.

  • 19 Feb 2026 06:45 PM (IST)

    19 Feb 2026 06:45 PM (IST)

    ब्रिटनच्या राजघराण्यात भूकंप! Epstein प्रकरणात प्रिन्स अँड्र्यू यांना अटक, जगात खळबळ

    Prince Andrew Epstein Case : लंडन : सध्या ब्रिटनच्या (Britain) राजघराण्यात मोठा गोंधळ उडाला आहे. किंग चार्ल्स तिसरे यांचे धाकटे भाऊ माजी प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांना अटक करण्यात आली आहे. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्या ६६ व्या वाढदिवसादिवशीच ही अटक करण्यात आली आहे. एपस्टीन प्रकरणात प्रिन्स अँड्र्यू यांचे नाव आले असल्याने ही कारवई करण्यात आली आहे.

  • 19 Feb 2026 06:35 PM (IST)

    19 Feb 2026 06:35 PM (IST)

    डिझाइन अफाट आणि रेंज सुसाट! Mahindra Udo ई-ऑटो लाँच, किंमत वाचाल तर आजच बुक कराल

    भारतातील क्रमांक 1 इलेक्ट्रिक कमर्शियल वाहन उत्पादक कंपनी Mahindra लास्ट माइल मोबिलिटी लिमिटेड (एमएलएमएमएल) ने लास्ट माईल मोबिलिटी क्षेत्रात नवे पर्व सुरू करत सर्व-नवीन इलेक्ट्रिक तीनचाकी ‘महिंद्रा उडो’ बाजारात सादर केली आहे. एक्स-शोरूम किंमत ₹3,84,299 ठेवण्यात आली असून, मर्यादित कालावधीसाठी ही ई-ऑटो ₹3,58,999 या विशेष किमतीत उपलब्ध असणार आहे.

  • 19 Feb 2026 06:27 PM (IST)

    19 Feb 2026 06:27 PM (IST)

    एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे-कल्याणचा कायापालट

    मुंबई, दि.१९: मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि वाढत्या शहरीकरणाची गरज ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी झालेल्या एमएमआरडीच्या बैठकीत ४८ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे. या माध्यमातून ठाणे आणि कल्याण या दोन शहरांचा कायापालट होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाण्याला 'मोबिलिटी हब' म्हणून विकसित करताना कल्याण हे भविष्यातील प्रगत शहरी केंद्र म्हणून उदयास येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

  • 19 Feb 2026 06:12 PM (IST)

    19 Feb 2026 06:12 PM (IST)

    Dahanu News: डहाणू-तलासरी पोलिसांची संयुक्त धडक; २०.७० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

    Dahanu News: डहाणू तालुक्यात आंबेसरी बारीपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्यावर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल २० लाख ७० हजार रुपयांचा तंबाखूजन्य माल जप्त केला असून एका आरोपीस अटक करून न्यायालयाने त्यास २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई डहाणू व तलासरी पोलिस ठाणे तसेच उपविभागीय पोलिस पथकाच्या संयुक्त सहभागातून पार पडली. उपविभागीय पोलिस अधिकारी अंकिता कणसे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आंबेसरी बारीपाडा परिसरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाल्याचा मोठ्या प्रमाणात साठा ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यावेळी वाडीत बाबुलाल जेठारामजी जाठ ही व्यक्ती उपस्थित होती.

  • 19 Feb 2026 06:02 PM (IST)

    19 Feb 2026 06:02 PM (IST)

    उन्हाळ्यात ई-वाहनांची काळजी कशी घ्यावी?

    पुणे: उन्हाळा सुरूवात झाला असून सुर्य उग्र रूप धारण करत आहे.सध्या इलेक्ट्रिकच्या दुचारी-चारचाकी वाहनांच्या आगीच्या घटना घडू लागल्या आहेत.आग लागल्यानंतर वाहन पूर्णपणे जळून खाक होत आहे.अशा घटना उन्हाळयात घडू नयेत म्हणून वाहनधारकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.उन्हाळयात बॅटरी गरम होण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे ई-वाहन सावलीत पार्क करावे.तसेच वाहन आणि बॅटरी जास्त गरम होणार नाही ते पाहावे,अगोदरच गरम असलेल्या बॅटरीमध्ये उष्णता वाढू नये म्हणून सकाळी लवकर किंवा सायंकाळी थंड वातावरणात चार्जिग करावे.

  • 19 Feb 2026 06:00 PM (IST)

    19 Feb 2026 06:00 PM (IST)

    Share Market Update: भारतीय शेअर बाजारात घसरण

    Share Market Update: भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा कोसळताना दिसत आहे. गुरुवारी, जोरदार सुरुवात झाल्यानंतर, दोन्ही बाजार निर्देशांक अचानक कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) १,०३४ अंकांनी घसरला आणि ८२,००० अंकांच्या खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही २५० अंकांनी घसरला. या अचानक घसरणीमागे अनेक कारणे असल्याचे दिसून येते.

  • 19 Feb 2026 05:50 PM (IST)

    19 Feb 2026 05:50 PM (IST)

    5 Seater SUV च्या मागणीत चांगली वाढ!

    भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असतात. सध्या सर्वाधिक मागणी SUV सेगमेंटमधील वाहनांना मिळताना दिसत आहे. 2025 मध्ये तर ग्राहकांनी सगळ्यात जास्त मागणी एसयूव्ही कार्सलाच दिली होती. नुकतेच जानेवारी 2026 मध्ये कोणत्या 5 सीटर मिड साइझ एसयूव्हीला मागणी मिळाली आहे. भारतात पाच सीट्ससह अनेक दमदार मिड साईज SUV उपलब्ध आहेत. मागील महिन्यात म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये या सेगमेंटमध्ये कोणत्या पाच SUV ला सर्वाधिक मागणी मिळाली, याची माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. टॉप 5 मध्ये कोणत्या कार्सचा समावेश झाला आहे, ते जाणून घेऊया.

  • 19 Feb 2026 05:36 PM (IST)

    19 Feb 2026 05:36 PM (IST)

    MPSC चे अध्यक्षपण कुणाकडे? मुंबईत झाली शपथविधी

    राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकतीच पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी बुधवारी शपथ दिली. हा शपथविधी सोहळा मुंबई येथे पार पडला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तत्कालीन अध्यक्ष रजनीश शेठ, सचिव महेंद्र हरपाळकर तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

  • 19 Feb 2026 05:30 PM (IST)

    19 Feb 2026 05:30 PM (IST)

    5 Seater SUV च्या मागणीत चांगली वाढ!

    भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असतात. सध्या सर्वाधिक मागणी SUV सेगमेंटमधील वाहनांना मिळताना दिसत आहे. 2025 मध्ये तर ग्राहकांनी सगळ्यात जास्त मागणी एसयूव्ही कार्सलाच दिली होती. नुकतेच जानेवारी 2026 मध्ये कोणत्या 5 सीटर मिड साइझ एसयूव्हीला मागणी मिळाली आहे. भारतात पाच सीट्ससह अनेक दमदार मिड साईज SUV उपलब्ध आहेत. मागील महिन्यात म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये या सेगमेंटमध्ये कोणत्या पाच SUV ला सर्वाधिक मागणी मिळाली, याची माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. टॉप 5 मध्ये कोणत्या कार्सचा समावेश झाला आहे, ते जाणून घेऊया.

  • 19 Feb 2026 05:20 PM (IST)

    19 Feb 2026 05:20 PM (IST)

    Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; कॉँग्रेस नेता म्हणाले

    नवी दिल्ली: विरोधी पक्षाचे नेते आणि कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी प्राप्त झाली आहे. राहुल गांधी यांच्यासह २५ अन्य कॉँग्रेस खासदारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. कॉँग्रेस नेत्याने याबाबत एक व्हिडिओ शेयर केला आहे. हा व्हिडिओ राजस्थानमधील असल्याचे समोर आले असून संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे.

  • 19 Feb 2026 05:10 PM (IST)

    19 Feb 2026 05:10 PM (IST)

    भारतानंतर आता पाकिस्तानमध्ये Appleची मोठी योजना

    Apple Manufacturing iPhone in Pakistan: आयफोनचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. भारतातच नाहीतर  जगभरात आयफोनने सगळ्यांना वेड लागवलं आहे. भारतानंतर आता अमेरिकन टेक कंपनी Apple पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल करत आहे. Apple पाकिस्तानात आयफोनचं उत्पादन सुरू करणार आहे. सरकारने मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन फ्रेमवर्कमध्ये प्रोत्साहन देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे Apple कंपनी पाकिस्तानात आयफोनचं उत्पादन सुरु करण्याचा विचार करत आहे.

  • 19 Feb 2026 04:55 PM (IST)

    19 Feb 2026 04:55 PM (IST)

    एपीएमसीतील त्या बांधकामाची स्थगिती कायम

    एपीएमसीतील त्या बांधकामाची स्थगिती कायम शेतकरी शेडच्या जागेत गाळे बांधकाम प्रकरण पणन संचालकांची बांधकामाला स्थगिती कायम या प्रकरणात धक्कादायक खुलासा करणार असं मयूर पाटील यांनी सांगितलं.

  • 19 Feb 2026 04:50 PM (IST)

    19 Feb 2026 04:50 PM (IST)

    कामोठे येथे शिवजयंतीनिमित्त आंबामातेच्या मंदिराची प्रतिकृती; नागरिकांचे आकर्षण

    शिवजयंती उत्सवानिमित्त कामोठे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोल्हापूर येथील प्रसिद्ध अंबाबाई मंदिर (आंबामाता मंदिर) याची भव्य आणि आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली असून ती सध्या परिसरातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.ही देखणी प्रतिकृती कलाकार विपुल गोवारी,संगम भोईर,आशिष धनावडे, तेजस गोवारी आणि कुणाल गोवारी यांनी अत्यंत कल्पकतेने साकारली आहे. मंदिराच्या मूळ वास्तुरचनेचा बारकाईने अभ्यास करून त्यानुसार सजावट, प्रकाशयोजना आणि शिल्पकलेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रतिकृती पाहताना कोल्हापूरच्या आंबामातेच्या मंदिराचा प्रत्यक्ष अनुभव घेत असल्याची भावना भक्तांमध्ये निर्माण होत आहे.

  • 19 Feb 2026 04:40 PM (IST)

    19 Feb 2026 04:40 PM (IST)

    सकल मराठा समाजातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

    ठाणे शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. सकाळ मराठा समाजाच्या वतीने तळावपाळी येथील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवनेरी येथून आणलेली शिवज्योत रॅलीद्वारे संपूर्ण शहरातून फिरवण्यात आली.

  • 19 Feb 2026 04:35 PM (IST)

    19 Feb 2026 04:35 PM (IST)

    पुणे झेडपीतील नवनिर्वाचित सदस्यांना चिंता

    एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन अधिसूचना प्रसिद्ध होऊनही अद्याप पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी नेमका मुहूर्त कधी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पदाधिकारी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला, तर ११ फेब्रुवारीला नवनिर्वाचित सदस्यांची अधिसूचना काढण्यात आली. मात्र, त्यानंतरही पदाधिकारी निवडीसाठी सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. कायद्यानुसार पहिली सभा बोलावणे आणि पदाधिकारी निवडीची प्रक्रिया राबविणे हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असतात. त्यामुळे त्यांच्या घोषणेची प्रतीक्षा सुरू आहे.

  • 19 Feb 2026 04:30 PM (IST)

    19 Feb 2026 04:30 PM (IST)

    उल्हासनगर मध्ये दिव्यांग मुलासह आई-वडिलांना मारहाण

    उल्हासनगरच्या आशेळे गाव परिसरातील गणपती मंदिरासमोर एका दिव्यांग मुलासह त्याच्या आई-वडिलांना टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली असून कुटुंबाने न्यायाची मागणी केली आहे.

     

  • 19 Feb 2026 04:20 PM (IST)

    19 Feb 2026 04:20 PM (IST)

    ठाणे महापालिकेची महासभा ठरणार वादळी । महासभेपूर्वीची गटनेत्यांनी बैठक संपन्न

    ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेपूर्वी गटनेते आणि नगरसेवकांची विशेष बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये महासभेत मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांबाबत रणनीती ठरवण्यात आली. या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते नजीब मुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 19 Feb 2026 04:15 PM (IST)

    19 Feb 2026 04:15 PM (IST)

    ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित

    राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्याबाबत भारतीय सरपंच परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याविरोधात राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे. ठराविक दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती एकदिवसीय संपावर जाणार असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्या दिवशी गावपातळीवरील दैनंदिन कामकाज ठप्प राहण्याची शक्यता आहे.

  • 19 Feb 2026 04:09 PM (IST)

    19 Feb 2026 04:09 PM (IST)

    क्रिकेटप्रेमींसाठी Jioची स्पेशल ऑफर, आता फक्त 99 रुपयांत मिळणार OTT बेनिफिट्ससह बरंच काही !

    Jio ने ही ऑफर एक वॅल्यू-पॅक पॅकेज म्हणून सादर केली आहे. ज्यात ब्रॉडबँड, लाइव्ह टीव्ही आणि OTT प्लॅटफॉर्मवर एकाच सबस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळू शकतं. यामध्ये कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स मिळत आहेत. Jio ची ही ऑफर Power Play Pass द्वारे उपलब्ध आहे, ज्याची किंमत फक्त 99 रुपये इतकी आहे. वापरकर्ते कंपनीच्या वेबसाइटवरुन किंवा MyJio अॅपवरुन सहजपणे ही ऑफर घेऊ शकतात. हा Pass अॅक्टिवेट केल्यानंतर पहिल्या रिचार्जवर एका महिन्याचा मोफत JioHome ब्रॉडबँड लाभ घेऊ शकता, ज्याची किंमत ₹707 इतकी आहे. इतकंच नाही तर कंपनी 750 रुपयांचा कॅशबॅकही देत आहे. हा कॅशबॅक 5 वेगवेगळ्या व्हाउचरच्या स्वरूपात मिळेल. मिळालेलं हे हे व्हाउचर तुम्ही तुमच्या नंतरच्या रिचार्जवरही वापरू शकता. कंपनीच्या मते, या पासमुळे तुम्हाला एकूण 1,457 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.

  • 19 Feb 2026 04:02 PM (IST)

    19 Feb 2026 04:02 PM (IST)

    सत्तेसाठी विचाराशी तडजोड नाही

    भिवंडी महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवली व सर्वात जास्त ३० नगरसेवक विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला पण बहुमतासाठी आणखी ४ नगरसेवकांची आवश्यकता होती. भाजपा व शिंदेसेना यांच्यासोबत जायचे नाही ही काँग्रेसची भूमिका आहे त्या भूमिकेशी काँग्रेसने त़डजोड केली नाही. आता भाजपाचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग करून धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी झाले असून, भिवंडीचा महापौर व उपमहापौर सेक्युलर फ्रंटचा होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

  • 19 Feb 2026 03:43 PM (IST)

    19 Feb 2026 03:43 PM (IST)

    बिहार विधानसभा अध्यक्षांसह 42 आमदारांना हायकोर्टाची नोटीस

    बिहारच्या राजकारणातून एक मोठी घडामोड समोर आली आहे. पाटणा उच्च न्यायालयाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील 42 आमदारांना नोटीस बजावली आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्ष प्रेम कुमार यांचाही समावेश आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती आणि अनियमिततेच्या आरोपांवर न्यायालयाने उत्तर मागितले आहे. हे प्रकरण गंभीर लक्षात घेऊन न्यायालयाने दिलेल्या वेळेत स्पष्टीकरण दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

  • 19 Feb 2026 03:39 PM (IST)

    19 Feb 2026 03:39 PM (IST)

    Louis Philippe कडून ‘तिकिट टू बहामास’ लाँच!

    Aditya Birla Fashion and Retail Limited अंतर्गत कार्यरत असलेल्या प्रीमियम मेन्सवेअर ब्रँड Louis Philippe ने स्प्रिंग समर २०२६ साठी ‘तिकिट टू बहामास’ हे आकर्षक कलेक्शन सादर केले आहे. आधुनिक पुरुषांसाठी खास डिझाइन केलेले हे कलेक्शन आलिशान बीच क्लब लाइफस्टाइल आणि उष्णकटिबंधीय सहलींच्या अनुभवातून प्रेरित आहे.

  • 19 Feb 2026 03:38 PM (IST)

    19 Feb 2026 03:38 PM (IST)

    दक्षिणी इराणमध्ये 5.5 तीव्रतेच्या भूकंपामुळे दहशत, अणुचाचणीच्या भीतीमुळे घबराट

    अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान, दक्षिण इराणमध्ये ५.५ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे घबराट पसरली आहे. जर्मनीच्या जीएफझेड संशोधन केंद्राच्या मते, भूकंपाचा केंद्रबिंदू फक्त १० किलोमीटर खोलवर होता. आतापर्यंत कोणतेही नुकसान झालेले नाही. तथापि, तो अणुचाचणीशी जोडला जात आहे. प्रदेश तणावपूर्ण आहे आणि इराण रॉकेट चाचण्या करत आहे. त्यामुळे, प्रत्येक भूकंपाच्या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

  • 19 Feb 2026 03:28 PM (IST)

    19 Feb 2026 03:28 PM (IST)

    शिवजयंतीच्या निमित्ताने ‘राजा शिवाजी’ची घोषणा, पुन्हा रितेश देशमुखचं दिग्दर्शन ‘आपला राजा..

    अभिनेता रितेश देशमुखने अखेर त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. आज सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह सुरु असताना अभिनेत्याने त्याच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे नवेकोरे पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरवरील रितेश देशमुख लूक पाहण्यासारखा आहे. अभिनेता या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असून, चाहते त्याला या शैलीत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत ‘वेड’च्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख नव्या उंचीवर झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा आगामी ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख करणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे.

  • 19 Feb 2026 03:15 PM (IST)

    19 Feb 2026 03:15 PM (IST)

    कोकणच्या ‘लक्ष्मी’वर आस्मानी संकट; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा; म्हणाले

    देवगड: कोकणचा आंबा उत्पादक शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटात सापडला असून राज्य सरकारने तातडीने या शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी व हेक्टरी ५ लाख रूपये मदतीचा हात येत्या बजेटच्या अर्थसंकल्पात न दिल्यास १२ मार्च रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी देवगड येथे घेण्यात आलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या एल्गार मेळाव्यात व्यक्त केली. कोकणचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आणि राज्यातील इतर आंबा उत्पादक शेतकरी सध्या नैसर्गिक अस्मानी व सुल्तानी संकटात सापडले आहेत.

  • 19 Feb 2026 02:50 PM (IST)

    19 Feb 2026 02:50 PM (IST)

    Su-35 ऐवजी F-35?भारताच्या लढाऊ विमान खरेदीत मोठा ट्विस्ट

    जगभरातील धोरणात्मक परिस्थिती झपाट्याने बदलत आहेत. कोणता देश कोणच्या बाजूने उभा आहे यावरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या महासत्ता इतर मोठ्या आणि प्रभावशाली देशांना आपल्या बाजूने करण्याच्या प्रयत्नात आहेत. कोणता देश कोणाच्या बाजूने आहे हे ठरवण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे संरक्षण करार. सध्या जागतिक स्तरावर भारत एक मोठी शक्ती म्हणून उदयास येत आहे. जागतिक महासत्ता बनायचं असेल तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असणं आवश्यक आहे. ही अट पूर्ण करण्यासाठी एकीकडे भारत स्वदेशी तंत्रज्ञानाने शस्त्रे विकसित करत आहेत तर दुसरीकडे शस्त्रास्त्रांची आयातही करत आहे.

  • 19 Feb 2026 02:40 PM (IST)

    19 Feb 2026 02:40 PM (IST)

    Mangal Gochar: मंगळ ग्रह बदलणार आपली चाल, या राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

    पौराणिक कथेनुसार, एकेकाळी जेव्हा भगवान शिवाच्या घामाचे थेंब पृथ्वीवर पडले, तेव्हा त्यातून मंगळ ग्रहाची निर्मिती झाली आणि नंतर पृथ्वीने त्याचे पालनपोषण केले. म्हणून, त्याला “पृथ्वीचा पुत्र,” “पृथ्वीचा पुत्र,” किंवा “भूमी” असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रात, मंगळाचे संक्रमण धैर्य, ऊर्जा, आक्रमकता आणि जमिनीशी संबंधित बाबींवर प्रभाव पाडते. मंगळाला ग्रहांचा सेनापती मानले जाते, म्हणून त्याच्या संक्रमणामुळे व्यक्तीचे जीवन, करिअर, आरोग्य आणि रागावर नियंत्रण यासारख्या बाबींमध्ये बदल दर्शवते.

  • 19 Feb 2026 02:30 PM (IST)

    19 Feb 2026 02:30 PM (IST)

    पुणे झेडपीतील नवनिर्वाचित सदस्यांना चिंता; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची तारीख कधी जाहीर होणार?

    पुणे : एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन अधिसूचना प्रसिद्ध होऊनही अद्याप पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी नेमका मुहूर्त कधी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पदाधिकारी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 19 Feb 2026 02:25 PM (IST)

    19 Feb 2026 02:25 PM (IST)

    जोधपूरमध्ये थरारक घटना! आधी मावस बहिणीची हत्या केली, नंतर स्वतः तरुणाने घेतला गळफास

    राजस्थान: राजस्थान येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या बहिणीची हत्या केली नंतर स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम तपासणीसाठी ते रुग्णालयात नेण्यात आले.

  • 19 Feb 2026 02:20 PM (IST)

    19 Feb 2026 02:20 PM (IST)

    काँग्रेस-BJP ने मिळून ठरवला महापौर, महाराष्ट्रातील ‘या’ नगरपालिकेत मिळाला एकनाथ शिंदेना झटका!

    महाराष्ट्रातील भिवंडीमध्ये एक अनोखा राजकीय देखावा उदयास आला आहे. भिवंडी महानगरपालिकेत महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी कधीही न घडलेला एक अनोखा विकास झाला आहे. काँग्रेस आणि भाजप हे दोन प्रमुख विरोधी पक्ष महापौर निवडण्यासाठी एकत्र आले आहेत.

  • 19 Feb 2026 02:15 PM (IST)

    19 Feb 2026 02:15 PM (IST)

    अर्थ खात्याविरुद्ध ‘बोंब मारो आंदोलन’; वेतनवाढ फरक हप्ता न दिल्यास…; एसटी कर्मचारी काँग्रेसचा इशारा

    मुंबई: एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांना वेतनासोबत या महिन्यात वेतनवाढ फरक हप्ता मिळाला नसून राज्य सरकारच्या अर्थ खात्यात १० फेब्रुवारी पासून फाईल निर्णयाविना पडून आहे. हप्ता न मिळाल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला असून “बोंब मारो “आंदोलन अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याशिवाय कर्मचारी राहणार नाहीत असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.

  • 19 Feb 2026 02:10 PM (IST)

    19 Feb 2026 02:10 PM (IST)

    बंजी जम्पिंगने घेतले जीव! गळ्यातील हाड तुटल्याने ऋषिकेशमध्ये तरुणीचा हवेतच मृत्यू…

    बंजी जम्पिंग हा एक साहसी खेळ आहे ज्यात एका लांब, लवचिक दोरीच्या साहाय्याने उंच ठिकाणावरून, हवेतून खाली जमिनीच्या दिशेला उडी मारली जाते. ही दोरी जमिनीपासून काही अंतरावर जाऊन थांबते जेणेकरुन व्यक्तीला आपण जमिनीवर आपटणार असं वाटतं पण असं न घडता त्याचा जीव वाचतो. हा खेळ खेळण्यासाठी भरपूर साहसाची गरज लागते पण मागील काही काळापासून या खेळाची थरारकता फार अधिक वाढू लागली आहे. माहितीनुसार, देशात अनेक लोकांनी हा खेळ खेळताना आपला जीव गमावला आहे. अशीच एक घटना अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आली असून यात महिलेने हवेतच आपले प्राण सोडल्याची माहिती मिळत आहे. चला घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

  • 19 Feb 2026 02:05 PM (IST)

    19 Feb 2026 02:05 PM (IST)

    विपुल अमृतलाल शाह यांचा ‘The Kerala Story 2’ करणार धमाका

    भारतीय सिनेमात आशयप्रधान आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे विपुल अमृतलाल शाह यांनी आपल्या वेगळ्या दृष्टीकोनातून नेहमीच प्रभाव टाकला आहे. आँखें पासून नमस्ते लंडन, हॉलिडे: ए सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी आणि कमांडो सारख्या चित्रपटांपर्यंत त्यांनी मोठ्या कॅनव्हासवरील कथा, तीव्र भावना आणि राष्ट्रभावनेचा संगम प्रेक्षकांसमोर मांडला आहे. त्यांच्या सनशाईन पिक्चर्स या बॅनरखाली धाडसी आणि वास्तवाला भिडणारे चित्रपट साकारले जातात. आणि आता अशातच आणखी एका नवा धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

  • 19 Feb 2026 02:00 PM (IST)

    19 Feb 2026 02:00 PM (IST)

    मिळकतकर दरवाढ नाही, नागरिकांना दिलासा; सत्तेत आल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय

    अपेक्षेनुसार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मिळकत करातील वाढीचा प्रस्ताव फेटाळला आहे. याचवेळी नगरसेवकांनी मिळकत कर विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त करीत, झारीतील शुक्राचार्य शाेधुन काढा असे मतही मांडले. यानिमित्ताने समाविष्ट गावांतील मिळकत कराचा विषय पुन्हा एकदा चर्चिला गेला.महापालिका प्रशासनाने मिळकत करात दहा टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला हाेता. स्थायी समितीने ताे मंजुरही केला हाेता. परंतु प्रत्यक्षात मुख्य सभेपुढे हा प्रस्ताव आणताना त्यामध्ये पाच टक्के वाढ सुचविली गेली हाेती.

  • 19 Feb 2026 01:55 PM (IST)

    19 Feb 2026 01:55 PM (IST)

    माझा भाऊ नाही याचं दुःख, पण आता…; विलिनिकरणाबाबत सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

    आज माझा भाऊ नाही. जे काही माझ्या आणि माझ्या भावाच्या मध्ये झाले. माझा भाऊ इतका मोकळ्या मनाचा होता सगळ्यांना माहित आहे. माझा दादा नाही हे दुःख आयुष्यभर माझ्या मनात राहील त्यामुळे कश्याला खरं खोटं करत बसायचे, जे खरे आहे ते माझ्या भावात आणि माझ्यात झाले आहे. आता काम करणे हीच दादाला सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

  • 19 Feb 2026 01:50 PM (IST)

    19 Feb 2026 01:50 PM (IST)

    काँग्रेस-BJP ने मिळून ठरवला महापौर, महाराष्ट्रातील ‘या’ नगरपालिकेत मिळाला एकनाथ शिंदेना झटका!

    महाराष्ट्रातील भिवंडीमध्ये एक अनोखा राजकीय देखावा उदयास आला आहे. भिवंडी महानगरपालिकेत महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी कधीही न घडलेला एक अनोखा विकास झाला आहे. काँग्रेस आणि भाजप हे दोन प्रमुख विरोधी पक्ष महापौर निवडण्यासाठी एकत्र आले आहेत.खरंच, काँग्रेस पक्षाने भिवंडीच्या महापौरपदासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. पक्षाने अधिकृतपणे पत्र लिहून पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपने महापौरपदासाठी धर्मनिरपेक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्नेहा पाटील यांना या पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

  • 19 Feb 2026 01:35 PM (IST)

    19 Feb 2026 01:35 PM (IST)

    एआय पायाभूत सुविधांवरून अमेरिका-चीन आमनेसामने

    भारतात सध्या एआय इम्पॅक्ट समिटचे आयोजन करण्यात आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस आता फक्त एक तंत्रज्ञान राहिलेले नाही, तर ते एक भू-राजकीय क्षेत्र बनले आहे. त्याची स्थिती शीतयुद्धाच्या काळातल्या अणु तंत्रज्ञानासारखीच आहे. देश केवळ अल्गोरिदममध्ये गुंतवणूक करत नाहीत, तर ते सत्तेत गुंतवणूक करत आहेत. कोणाकडे जास्त लष्करी आणि आर्थिक शक्ती असेल, कोणाचा समाजावर जास्त प्रभाव असेल. हे एआय कोण तयार करते आणि प्रशिक्षित करते यावर अवलंबून असेल, विविध क्षेत्रांमध्ये एआयचा वापर वाढत असताना ही स्पर्धा तीव्र झाली आहे.

  • 19 Feb 2026 01:25 PM (IST)

    19 Feb 2026 01:25 PM (IST)

    “लल्ला… तैयार रहना!” ‘सुबेदार’मधील जबरदस्त गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

    अ वॉर्निंग फ्रॉम सुबेदार’ला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर Amazon Prime Video आणि T-Series यांनी त्यांच्या आगामी प्राइम ओरिजिनल चित्रपट सुबेदार मधील अधिकृत ‘लल्ला’ गाण्याचा हाय-व्होल्टेज व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. दिग्गज अभिनेते अनिल कपूर प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटातील हे गाणे ऊर्जा, अभिमान आणि सुबेदार अर्जुन मौर्य यांच्या अढळ नैतिक मूल्यांचे प्रभावी चित्रण करते.

  • 19 Feb 2026 01:20 PM (IST)

    19 Feb 2026 01:20 PM (IST)

    इंडियन डॉग, गो बॅक! ऑस्ट्रिलयात भारतीय शीख तरुणावर प्राणघातक हल्ला

    ऑस्ट्रेलियात (Australia) पुन्हा एकदा भारतीय तरुणावर हल्ल्याची घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे जिलॉन्ग शहरात ही घटना घडली असून वर्णभेदावरुन हल्ला करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. एक २२ वर्षीय भारतीय शीख तरुणावर निर्घृणपणे हल्ला करण्यात आला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियातील शीख समुदायात संतापाची लाट उसळली आहे. या तरुणाचे नाव हमनप्रीत सिंग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • 19 Feb 2026 01:15 PM (IST)

    19 Feb 2026 01:15 PM (IST)

    बांग्लादेशचे T20 विश्वचषकात पुनरागमन! ऑस्ट्रेलिया सुपर-8 मधून बाहेर

    टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीसाठी ८ संघांची नावे निश्चित करण्यात आली आहेत आणि १२ संघांचा प्रवास येथे संपला आहे. सुपर-८ टप्प्यातील सामने २१ फेब्रुवारीपासून खेळवले जातील, जिथे ४ संघांना उपांत्य फेरीसाठी तिकिटे मिळतील. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एक मोठी घोषणा केली आहे. टी-२० विश्वचषकाची पुढील आवृत्ती २०२८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली खेळवली जाईल. या स्पर्धेसाठी १२ संघांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. तर, उर्वरित ८ संघ प्रादेशिक पात्रता फेरीतून निश्चित केले जातील.

  • 19 Feb 2026 01:06 PM (IST)

    19 Feb 2026 01:06 PM (IST)

    पुणे झेडपीतील नवनिर्वाचित सदस्यांना चिंता; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची तारीख कधी जाहीर होणार?

    पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन अधिसूचना प्रसिद्ध होऊनही अद्याप पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी नेमका मुहूर्त कधी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पदाधिकारी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

     

  • 19 Feb 2026 01:00 PM (IST)

    19 Feb 2026 01:00 PM (IST)

    देशात मुलांना सोशल बंदी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

    अनेक देशांमध्ये अल्पवयीन मुलांवर सोशल मीडिया बंदी घालण्यात आली असून आता भारतातही अल्पवयीन मुलांकडून सोशल मीडिया वापरावर बंदी येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याचे संकेत दिले आहेत. आयटी मंत्र्यांनी सांगितले की, वय-आधारित निबंधांबाबत सोशल मीडिया कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.

  • 19 Feb 2026 12:55 PM (IST)

    19 Feb 2026 12:55 PM (IST)

    हळदीत होणार जल्लोष! ‘सुपर डुपर’ मधील ‘नाचा दणाना’ गाण्यावर थिरकणार महाराष्ट्र

    मराठी चित्रपटसृष्टीत सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘सुपर डुपर’ या आगामी चित्रपटातील ‘नाचा दणाना’ हे गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. हळदी समारंभाच्या पार्श्वभूमीवर साकारलेले हे गाणे धमाल संगीत, भव्य सेट्स आणि उत्साहाने भरलेल्या सादरीकरणामुळे हे गाणं ऐकल्याबरोबरच प्रेक्षकांना थिरकायला भाग पडेल हे नक्की.

  • 19 Feb 2026 12:50 PM (IST)

    19 Feb 2026 12:50 PM (IST)

    RTE प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जाला सुरुवात; 10 मार्चपर्यंत करता येणार अर्ज

    आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 10 मार्चपर्यंत पालकांना अर्ज करता येणार आहे. यंदा शिक्षण परिषदेने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. एकाचवेळी लॉटरी व पालकांना प्रथम अर्जासाठी शैक्षणिक व आवश्यक दस्तावेज अपलोड करावे लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत आरटीई प्रवेश अर्जासाठी यावर्षी 640 शाळांची नोंद केली आहे.

  • 19 Feb 2026 12:45 PM (IST)

    19 Feb 2026 12:45 PM (IST)

    नागपुरात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई; तब्बल 20 घरांवर चालवला बुलडोजर

    जुना भंडारा रस्ता रुंदीकरणाची दोन दिवसांपासून सुरू असलेली कारवाई बुधवारीही सुरूच होती. जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनाच्या आदेशानंतर अतिक्रमणविरोधी विभागाने सुमारे २० घरांवर बुलडोजर चालवला. याशिवाय विभागाने शहराच्या विविध भागांत अवैध अतिक्रमणे आणि ताब्याविरोधात मोठी कारवाई केली. यावेळी सतरंजीपुरा, धरमपेठ, लक्ष्मीनगर आणि गांधीबागसारख्या प्रमुख भागांतील रस्ते आणि फुटपाथ अतिक्रमणमुक्त केले.

  • 19 Feb 2026 12:40 PM (IST)

    19 Feb 2026 12:40 PM (IST)

    तीन दिवसांत तयार होणार वैधृति योग, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

    सूर्य आणि चंद्राच्या विशेष स्थितीमुळे वैधृति योग तयार होणार आहे. हा योग ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ मानला जातो. या योगामुळे काही राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. मेष रास, कर्क रास, तूळ रास, या राशीच्या लोकांनी सावध राहावे.

  • 19 Feb 2026 12:35 PM (IST)

    19 Feb 2026 12:35 PM (IST)

    Rockstar दादी! ‘कच्ची कली’ गाण्यावर आजीचा नातावासोबत भन्नाट डान्स; नेटकरी फिदाच, VIDEO VIRAL

    एक धुरंधर चित्रपटातील गाणे सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे.एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका आजींनी आपल्या नातवासोबत या कच्ची कली गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, आजी आणि नातू घराच्या हॉलमध्ये डान्स करत आहेत. नातावने आजीला सर्व स्टेप्स शिकवल्या आहेत. आजी अगदी हुबेहुब गाण्याती डान्सर्स सारख्या स्टेप्स करत आहेत. त्यांची अदा, त्यांची एनर्जीही भन्नाट आहे.

  • 19 Feb 2026 12:30 PM (IST)

    19 Feb 2026 12:30 PM (IST)

    श्रीलंकेचे अव्वल स्थान पुन्हा मिळवण्याचे उद्दिष्ट, आज कोलंबोमध्ये झिम्बाब्वेशी होणार सामना

    सुपर 8 साठी आधीच पात्र ठरलेले श्रीलंका आणि झिम्बाब्वे १९ फेब्रुवारी रोजी टी२० विश्वचषक सामन्यात आमनेसामने येतील, ज्यांचे उद्दिष्ट ग्रुप बी मध्ये अव्वल स्थान मिळवणे आहे. सुपर 8 चे सामने हे 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. श्रीलंकेने स्थानिक परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत ओमान आणि आयर्लंडचा पराभव केला आणि नंतर ऑस्ट्रेलियाला आठ विकेट्सने हरवून जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून स्वतःला स्थापित केले.

  • 19 Feb 2026 12:25 PM (IST)

    19 Feb 2026 12:25 PM (IST)

    AI समिटमधून Bill Gates ने घेतली माघार, देणार नाही भाषण

    दिल्लीत होणाऱ्या AI Summit बाबत वाईट बातमी समोर आली आहे. बिल गेट्स, ज्यांनी काही कारणास्तव या समिटमध्ये बोलू नये असा निर्णय घेतला आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर याची घोषणा केली. गेट्स फाउंडेशनचे आफ्रिका आणि भारत प्रमुख अंकुर व्होरा त्यांच्या जागी बोलतील.

Web Title: Marathi breaking live updates top news marathi international news national news crime news live updates marathi batmya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • Marathi Breaking news
  • Navarashtra live Upadates

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live : अकोला ठरले जगातील दुसरे सर्वात उष्ण शहर
1

Top Marathi News Today Live : अकोला ठरले जगातील दुसरे सर्वात उष्ण शहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.