डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी रामदेव बाबांचे आयुर्वेदिक उपाय (फोटो सौजन्य - iStock/Instagram)
भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते आणि त्याला कारणंही तशीच आहेत. बदलती जीवनशैली, जंक फूडचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे अगदी कमी वयातही लोकांना डायबिटीस होतोय. भारतात १० कोटींहून अधिक लोक डायबिटीसग्रस्त रुग्ण आहेत. प्रत्येक ६ पैकी १ व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहे.
डायबिटीसला सायलंट किलरही म्हणतात कारण डायबिटीसमुळे शरीर कधी पोखरून जीव घेऊ शकतो हे कळणारही नाही आणि याशिवाय डायबिटीस शरीराच्या अवयवांना नुकसान पोहोचवतो. बाबा रामदेव काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत ज्याद्वारे तुम्ही रक्तातील साखरेचे प्रमाण सहजपणे नियंत्रित करू शकता आणि इन्सुलिनच्या इंजेक्शनपासूनदेखीलही मुक्त होऊ शकता, जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
योगासन उत्तम उपाय
डायबिटीससाठी योगासन
बाबा रामदेव यांच्या मते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी नियमित योगाभ्यास खूप प्रभावी आहे. यासाठी दररोज १०-१५ मिनिटे कपालभाती प्राणायाम, १५-२० मिनिटे अनुलोम-विलोम प्राणायाम करा. योगामुळे पचन सुधारते, ताण कमी होतो आणि इन्सुलिनची कार्यक्षमता वाढविण्यास याची मदत मिळते
डायबिटीस रूग्णांनी वाचाच, केवळ गोडच नाही तर ‘या’ पदार्थांनीही वाढते ब्लड शुगर पातळी
मेथी दाणे आणि जांभूळ पावडर
मेथी दाणे आणि जांभळाच्या पावडरचा करा उपयोग
मेथी दाणे आणि जांभूळ हे दोन्ही पदार्थ डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यास उत्तम ठरतात. यासाठी तुम्ही घरीच याचा वापर करून घेऊ शकता. १ चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी हेच पाणी तुम्ही आठवड्यातून साधारण ३ दिवस प्या. याशिवाय, १/२ चमचा जांभळाच्या बियांची पावडर दिवसातून दोनदा पाण्यासोबत घ्या. यामुळे त्वरीत डायबिटीसवर नियंत्रण मिळते
रामबाण कारल्याचा ज्युस आणि गुरमार
नियमित कारल्याचा ज्युस प्या
दररोज सकाळी रिकाम्या पोटी ५०-१०० मिली कारल्याचा रस पिण्यामुळे रक्तातील साखर कमी होते. याशिवाय, तुम्ही आणखी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती, गुरमार देखील वापरू शकता. ती पावडर किंवा टॅब्लेटच्या स्वरूपात उपलब्ध आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुरमार खूप फायदेशीर आहे. त्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी ३० मिनिटांत कमी होऊ लागते. खरं तर, गुरमार ही एक वनस्पती आहे, जी हजारो वर्षांपासून आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जात आहे.
कडुलिंब आणि त्रिफळा
कडुलिंबाचा ज्युसही ठरतो गुणकारी
कडुलिंब आणि बेलाच्या पानांचा रस साखर नियंत्रित करण्यास मदत करतो. तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी एक चमचा रस घेऊ शकता. याचा तुम्हाला कोणताही त्रास होत नाही. याशिवाय, रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत त्रिफळा पावडर घेतल्याने साखर नियंत्रणात राहते.
5 चुकांमुळे डायबिटीसची शुगर पार करेल 300 चा आकडा, औषधंही येणार नाहीत कामी; 5 पद्धतीने आणा नियंत्रणात
आवळा रस + कोरफड रस
आवळा आणि कोरफड रस करेल शुगर कमी
तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी २० मिली आवळा रस + कोरफडीचा रस घेऊ शकता. याशिवाय, तुम्ही दररोज सकाळी १०-१५ मिली गुळवेलाचा रस घेऊ शकता. डॉक्टर किंवा आयुर्वेदिक चिकित्सकाचा सल्ला घेतल्यानंतरच ही औषधे घ्या. कारण याचे प्रमाण तुम्ही ठरवू शकत नाही. योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
जास्त तळलेले पदार्थ आणि गोड पदार्थ खाऊ नका. पांढरा भात, मैदा आणि साखर टाळा. अधिक अंकुरलेले धान्य, ओटमील, भाज्या आणि सॅलड खा. दिवसातून ३-४ वेळा थोडे थोडे जेवण करा हे नक्की लक्षात ठेवा.