फटाक्यांचा काळा धूर संपूर्ण शरीरात पसरलाय? हे 5 घरगुती उपाय फुफ्फुसांमध्ये अडकलेली सर्व घाण-श्लेष्मा काढतील बाहेर
दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि उत्साहाचा सण असतो, मात्र यानंतर अचानकपणे वाढणारे प्रदूषण आपल्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते. फटाक्यांचा धूर, रस्त्यांवरील धूळ आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण यामुळे अनेक शहरांमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत खराब पातळीवर पोहोचते. दिवाळीनंतर हवेमध्ये सूक्ष्म कण (PM 2.5 आणि PM 10) मोठ्या प्रमाणावर वाढतात, जे थेट आपल्या श्वसन प्रणालीवर परिणाम करतात. हे कण श्वासावाटे फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात आणि सूज, श्वास घेण्यात त्रास, खोकला, दम्याचे अटॅक, थकवा आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
फुफ्फुसांना या प्रदूषणापासून संरक्षण देण्यासाठी आणि त्यांची सफाई करण्यासाठी काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात. डाएटिशियन शिखा अग्रवाल शर्मा यांच्या मते, योग्य आहार आणि श्वसनाचे व्यायाम हे फुफ्फुसांना स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. चला यासाठी कोणत्या घरगुती उपायांचा वापर करावा ते जाणून घेऊया.
अदरक आणि हळद
आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले हे दोन पदार्थ शरीरातील सूज कमी करतात आणि कफ बाहेर टाकायला मदत करतात. यामुळे खोल्यापासून आराम मिळ्वण्यासही मदत होते.
लसूण
यामध्ये ‘अॅलिसिन’ नावाचे घटक असते, जे संसर्गापासून बचाव करते आणि श्वसननलिका स्वच्छ ठेवते. तुम्ही डाळ, भाजी किंवा चटणीमध्ये लसणाचा वापर करून त्याचा आहारात समावेश करू शकता.
तुळस
तुळशीची पाने कफ काढण्यासाठी उपयुक्त आहेत. तुम्ही याचा चहा किंवा काढा करून याचा आपल्या आहारात समावेश करू शकता.
व्हिटॅमिन C युक्त फळे
लिंबू, संत्री, आवळा यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि टॉक्सिन्स बाहेर टाकतात. तुम्ही फ्रुट सॅलड तयार करून अथवा फळांचा ज्यूस तयार करून त्याचा आहारात समावेश करू शकता.
मेंदूवरच सुरू असतं संपूर्ण शरीर, याला निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा 5 सुपरफुड्सचा समावेश
गरम पाणी, हळद आणि मध
दररोज सकाळी हळद आणि मध टाकून गरम पाणी एकत्र मिसळून याचा काढा तयार करा आणि रोज याचे सेवन करा. हा काढा पिणे फुफ्फुसांसाठी उपयुक्त आहे.
पाणी भरपूर प्या
दिवसभरात किमान 8–10 ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि कफ सैल होतो. यामुळे शरीर हायड्रेट राहते, याचा त्वचेवरही फायदा होतो.
प्राणायाम
अनुलोम-विलोम, कपालभाती, भस्त्रिका हे योगातील श्वसन व्यायाम फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवतात आणि शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतात. दिवाळीचा सण आनंदाने साजरा करा, पण त्यानंतर आपल्या शरीराची विशेषतः फुफ्फुसांची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.