Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

5 फूड जे किडनी स्टोनचा धोका वाढवतात…, तुमच्या आहारात यांचा समावेश तर नाही ना? वेळीच ताटातून वगळा ‘हे’ पदार्थ

Kidney Stone : आजकाल सर्व वयोगटातील लोकांमध्ये किडनी स्टोनचा धोका वाढला आहे. यामागे चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. चला किडनी स्टोनला कारणीभूत ठरणाऱ्या पदार्थांविषयी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 30, 2026 | 08:15 PM
5 फूड जे किडनी स्टोनचा धोका वाढवतात..., तुमच्या आहारात यांचा समावेश तर नाही ना? वेळीच ताटातून वगळा 'हे' पदार्थ

5 फूड जे किडनी स्टोनचा धोका वाढवतात..., तुमच्या आहारात यांचा समावेश तर नाही ना? वेळीच ताटातून वगळा 'हे' पदार्थ

Follow Us
Follow Us:
  • काही सामान्य आहारातील सवयींमुळे किडनीशी संबंधित समस्या वाढू शकतात.
  • तज्ञांच्या मते, शरीरातील खनिजांचे असंतुलन आणि कमी पाणी हे महत्त्वाचे कारण ठरत.
  • योग्य आहार आणि मर्यादित सेवन केल्यास धोका टाळता येऊ शकतो.
मागील काही काळापासून अनेकांना किडनी स्टोनचा त्रास सतावू लागला आहे. हा एक असा आजार आहे ज्यामुळे आपल्या किडनी आणि पित्ताशयात लहान खडे तयार होऊ लागतात. वेळीच यावर उपचार केले नाहीत तर हे खडे आपल्याला प्रचंड वेदना देऊ शकतात. किडनी स्टोनचा हा आजार पूर्णपणे आपल्या आहारातील सवयींवर अवलंबून असतो. बदलत्या जीवनशैलीसोबतच लोकांच्या आहारातही अनेक बदल घडून आल्याचे दिसून आले आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आहारातील काही पदार्थच तुमच्या पोटात किडनी स्टोनचा त्रास वाढवत असतात. याचबरोबर कमी पाण्याचे सेवन देखील या आजारासाठी घातक ठरु शकते. यामुळे शरीरात खडे तयार होण्याची शक्यता आणखी वाढते. चला कोणते पदार्थ किडनी स्टोनचा धोका वाढवू शकतात ते जाणून घेऊया.

आरोग्य तज्ञांच्या मते, किडनी स्टोन होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यात डिहायड्रेशन, शरीरातील खनिजांचे असंतुलन आणि काही विशिष्ट पदार्थांचे सेवन महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेकदा नकळत आपल्या आहारात असे काही पदार्थ येतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले ठरत नाहीत. आज आपण अशाच पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत.

Travel News : 6 ज्योतिर्लिंग आणि शिर्डीच्या साई बाबांचे दर्शन… IRCTC घेऊन आला 12 दिवसांचा टूर पॅकेज

पालक

लोहाचे उत्तम स्त्रोत मानले जाणारे पालक आरोग्यासाठी फायद्याचे ठरत असले तरी याचे अतिसेवन किडनी स्टोनच्या धोक्याला जन्म देऊ शकते. ज्या लोकांना आधीपासून किडनी स्टोनचा त्रास जाणवत आहे त्यांनी पालकाचे सेवन अजिबात करु नये. पालकामध्ये ऑक्झॅलेटचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील कॅल्शियमसोबत संयोग करून स्फटिक तयार करू शकते, ज्यामुळे अखेरीस खडे तयार होतात.

ड्रायफ्रुट्स आणि बिया

बदाम, काजू, शेंगदाणे आणि तीळ, सूर्यफुलाच्या बिया यांसारख्या घटकांमध्ये ऑक्झॅलेट असल्याने ते किडनी स्टोनचा त्रास वाढवू शकतात. हे आरोग्यासाठी पाैष्टीक असले तरी याच्या अतिसेवनामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. विशेषत: ज्यांना आधीच किडनी स्टोनचा त्रास सतावत आहे त्यांनी तर चुकूनही याचे सेवन करु नये.

चॉकलेट आणि कोको उत्पादने

चॉकलेट आणि कोको उत्पादने चवीला चांगली असली तरी यातील ऑक्झॅलेटचे प्रमाण किडनी स्टोनच्या धोक्याला वाढवण्याची क्षमता ठेवते. किडनी स्टोनच्या धोक्यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर याचे मर्यादित प्रमाणात सेवन करा.

अति खारट अन्न

जास्त मीठाचे पदार्थ फक्त किडनी स्टोनची समस्याच नाही तर इतर समस्या वाढवण्यास देखील कारणीभूत ठरु शकते. जेव्हा आपण अति खारट पदार्थ खातो तेव्हा र लघवीद्वारे अधिक कॅल्शियम बाहेर टाकते, ज्यामुळे नंतर खडे तयार होऊ शकतात. पॅकेज फूड, वेफर्स, चिवडा अशा पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण भरपूर असते ज्यामुळे यांचे सेवन टाळायला हवे किंवा कमी प्रमाणात सेवन करणे योग्य ठरेल.

वयाच्या ९१ व्या वर्षी ‘ही-मॅन’ ॲक्शन फिगरचे निर्माते रॉजर स्वीट यांनी घेतला अखेरचा श्वास, ‘या’ गंभीर आजाराने होते त्रस्त

लाल मांस

रेड मीट जसं की, चिकन, मटन किंवा अंडी यांसारख्या प्राणिजन्य प्रथिनांमुळेही किडनी स्टोनचा धोका वाढतो. यांचे अतिसेवन शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते. हे युरिक ॲसिड नंतर किडनीत जमा होऊ लागेत ज्यामुळे खडे तयार होण्याची प्रक्रिया वेगवान होते. संशोधनानुसार, प्रथिनांचे संतुलित सेवन महत्त्वाचे आहे, परंतु त्याचे अतिसेवन नक्कीच टाळणे गरजेचे ठरते. तुम्हाला आधीपासूनच किडनी स्टोनचा त्रास असेल तर याचे सेवन टाळा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: 5 foods that increase the risk of kidney stones lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • Kidney stones
  • lifestyle news

संबंधित बातम्या

टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स
1

टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स

नैराश्यापासून दूर राहायचंय? डिप्रेशनवर मात करण्यासाठी औषधांसोबत जीवनशैलीतही करा ‘हे’ बदल
2

नैराश्यापासून दूर राहायचंय? डिप्रेशनवर मात करण्यासाठी औषधांसोबत जीवनशैलीतही करा ‘हे’ बदल

प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अ‍ॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या
3

प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अ‍ॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत
4

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.