रोज सकाळी नाश्ता करताना कोणते पदार्थ खावेत
नाश्ता हे दिवसाचे पहिले जेवण मानले जाते. अनेक जण कधीही नाश्ता स्किप करू नका असे सल्ले देतात. तुमचे संपूर्ण दिवसाचे आरोग्य तुम्ही त्यात काय खाता यावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत, नाश्त्यासाठी पदार्थांची निवड अतिशय काळजीपूर्वक करणे महत्वाचे आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारच्या वैद्यकीय स्थितीचा सामना करत आहात याचा विचार केला जातो.
निरोगी नाश्ता शरीराला योग्य ऊर्जा देतोच पण त्याचबरोबर तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील तयार करतो. आम्ही तुम्हाला काही निरोगी पदार्थांबद्दल सांगत आहोत जे तुम्ही तुमच्या नाश्त्याचा भाग बनवू शकता. डाएटिशियन आणि पोषणतज्ज्ञ निखिल वत्स यांनी काही पदार्थ सांगितले आहेत, जे तुम्ही नाश्त्यात समाविष्ट करून घेतले तर तुमचे आरोग्य उत्तम राहू शकते (फोटो सौजन्य – iStock)
ओट्स
ओट्सचा करा नाश्त्यात समावेश
ओट्स हा नाश्त्याचा एक उत्तम पर्याय आहे. त्यामध्ये फायबर, प्रथिने आणि इतर अनेक आवश्यक पोषक तत्वे जास्त प्रमाणात असतात. ओट्स खाल्ल्याने तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहण्यासही मदत होते. तुम्ही ओट्स दूध किंवा पाण्यात शिजवू शकता आणि ते फळे आणि काजू मिसळून खाऊ शकता. तसंच तुम्ही रोज ओट्सचे सेवन प्रमाणात करू शकता. ओट्स खाल्याने वजनही नियंत्रणात राहते आणि त्रासही होत नाही
महिनाभर नाश्ता नाही केला तर आरोग्यावर काय परिणाम होईल? जाणून घ्या
दही
नाश्त्यात दही खाल्ल्याचा होतो फायदा
दही हे प्रथिने आणि कॅल्शियमने समृद्ध अन्न आहे. तसंच दह्यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स आढळतात आणि दही हे पोटासाठीदेखील फायदेशीर आहे. प्रोबायोटिक्स असल्यामुळे पचनास मदत करतात. फळे, नट किंवा ओट्समध्ये दही मिसळून तुम्ही एक स्वादिष्ट आणि पौष्टिक नाश्ता बनवू शकता. तुम्ही रोज सकाळच्या नाश्त्यात दह्याचा समावेश करून घ्यावा. दही हे पोट शांत राखण्यासही मदत करते
फळ
फळांचे सेवन ठरते फायदेशीर
सकाळी लवकर फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सफरचंद, केळी, संत्री आणि बेरी यांसारखी फळे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. हे शरीराला ऊर्जा प्रदान करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. अशा परिस्थितीत तुम्ही फळ कापून किंवा सलाड म्हणून खाऊ शकता.
Breakfast Recipes: निरोगी राहण्यासाठी ‘या’ हेल्दी नाश्ता रेसिपींनी करा सकाळची सुरुवात
अंडी
अंड्याचा करा नाश्तयात समावेश
अंडी हे प्रथिनांचे एक उत्तम स्रोत आहेत आणि नाश्त्यात त्यांचा समावेश करणे खूप फायदेशीर ठरू शकते. अंड्यांमध्ये शरीराच्या स्नायूंसाठी आवश्यक असलेले सर्व आवश्यक अमीनो आम्ल असतात. तुम्ही अंडी उकळून, ऑम्लेट बनवून किंवा भाज्यांसोबत तळून खाऊ शकता. मधुमेहाचे रुग्णही याचे सेवन करू शकतात. मधुमेहीच्या रुग्णांसाठी अंडे खाणे उत्तम ठरते. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रमाणात याचे सेवन करावे
ड्रायफ्रूट्स आणि बिया
ब्रेकफास्टमध्ये खावे ड्रायफ्रूट्स आणि नट्स
बदाम, अक्रोड, चिया सीड्स आणि अळशीच्या बिया यांसारखे काजू आणि बिया हे उत्तम स्नॅक्स आहेत. त्यामध्ये निरोगी चरबी, प्रथिने आणि फायबर असतात, जे तुम्हाला बराच काळ तृप्त ठेवतात. तुम्ही ते दही, ओट्ससोबत किंवा स्नॅक म्हणून तुम्ही खाऊ शकता. रोज दिवसातून एक वेळा सकाळी उपाशीपोटी 3-4 ड्रायफ्रूट्स खाणे तुमच्या शरीरासाठी उत्तम ठरू शकते. यामध्ये तुम्ही बदाम, काजू, बेदाणे, अक्रोड, अंजीरचा समावेश करून घेऊ शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.