नात्यातील रेड फ्लॅग कसा ओळखाल
नात्यांबाबत तुम्ही नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे कारण तुमचा एक चुकीचा निर्णय तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, म्हणूनच जोडीदार निवडण्यापूर्वी अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्यात, तरच भविष्यामध्ये एखाद्यासह तुम्ही सुखी संसार थाटू शकता.
ग्रीन फ्लॅग आणि रेड फ्लॅग हे दोन्ही शब्द नात्याच्या बाबतीत तुमच्या कानावर जात असतील. ग्रीन फ्लॅग असेल तरच स्वीकारा, नाहीतर रेड फ्लॅग असणाऱ्या व्यक्तीला ‘हो’ म्हणणे हा तोट्याचा सौदा ठरू शकतो. (फोटो सौजन्य – iStock)
रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग म्हणजे काय?

रेड फ्लॅगची व्याख्या काय आहे
रेड फ्लॅग अशा प्रकारच्या जोडीदाराचा संदर्भ देतात जो तुम्हाला अजिबात साथ देत नाही, वाईट वागणूक देतो, स्वभावाने Toxic आहे किंवा आपल्या जोडीदाराला योग्य साथ देऊ शकत नाही. त्यांचं वागणं अत्यंत वाईट असतं. नात्यात ना तुम्हाला सोडून देत ना तुम्हाला साथ देत अशा व्यक्तींपासून वेळीच लांब राहायला हवं. तर दुसरीकडे, ग्रीन फ्लॅग अशा जोडीदारांना् सूचित करतो जे तुम्हाला नेहमी समर्थन देतात, तुमच्याशी जे सत्य बोलतात, काळजी घेतात, तुमच्या एकत्रित भविष्यासाठी वचनबद्ध राहतात आणि तुमचा आदर करतात. रेड फ्लॅग असणाऱ्या व्यक्ती कशा ओळखाव्यात?
हेदेखील वाचा – पती – पत्नीच्या नात्यात ‘वो’ ठरतेय नोकरी, असे सांभाळा नातं दुरावा करा दूर
नियंत्रित करणाऱ्या व्यक्ती

एखाद्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवणे चुकीचे
काहीवेळा चुकीच्या गोष्टी असूनही तुम्हाला त्या करायला लावणे अथवा तुम्ही चुकीचे वागत असूनही तुम्हाला त्यासाठी पाठिंबा देणे. सतत तुम्हाला आणि तुमच्या आवडीनिवड नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे. तुमच्यावर ती व्यक्ती खूप नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर समजून घ्या की भविष्यात ते तुमच्या नात्यासाठी अत्यंत टॉक्सिक ठरू शकते. त्यामुळे वेळीच हे संकेत ओळखा आणि अशा व्यक्तींपासून लांब राहा.
कम्युनिकेशन गॅप

नात्यात संवाद महत्त्वाचा
जर तुमचा पार्टनर तुमच्याशी मोकळेपणाने बोलण्यास कचरत असेल किंवा असे म्हणण्यास घाबरत असेल तर अशा प्रकारची कम्युनिकेशन गॅप कोणत्याही नात्यासाठी चांगली नाही. नात्यामध्ये संवाद अत्यंत गरजेचा आहे अन्यथा नाते टिकू शकत नाही. चांगले नाते तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही तुमच्या भावना तुमच्या जोडीदारासोबत शेअर करण्यास घाबरत नाही. तुम्ही काहीही बोलल्यानंतर तुमचा जोडीदार कसा वागेल याची भीती जर तुमच्या मनात असेल तर अशा नात्यात न राहणं योग्य
हेदेखील वाचा – नात्यात घडत असतील या गोष्टी तर समजून घ्या बाहेर पडण्याची वेळ आली आहे
सतत खोटं बोलणं

सतत खोटं बोलणं ठरेल नात्याचा शेवट
जर तुमचा वा तुमची जोडीदार सतत खोटं बोलत असेल किंवा सत्य लपवत असेल, तर समजून घ्या की ते नाते फसवणुकीचे असू शकते. विश्वास हा नात्याचा पाया आहे. तुमच्या नात्यात समोरची व्यक्ती सतत काहीतरी लपवत असेल आणि खोटं बोलत असेल तर अशा नात्यात राहणं अथवा त्या व्यक्तीसह राहणं हे नक्कीच रेड फ्लॅगचं लक्षण आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि अशा व्यक्तीपासून दूर राहा.
भिन्न आवडीनिवडी

आवडीनिवडींमधील तफावत
दोन व्यक्तींचा स्वभाव आणि आवडी-निवडी थोडीफार वेगळी असणे हे सामान्य आहे, त्यामुळे नात्याला धोका नाही. परंतु जर तुमच्या दोघांची विचारसरणी आणि सवयी पूर्णपणे भिन्न असतील तर नाते टिकवणे कठीण होईल. त्यामुळे सुरूवातीच्या दिवसात जरी तुम्ही एकमेकांसाठी तडजोड करत असलात तरीही नंतर ते निभावणं नक्कीच कठीण होऊ शकतं. याचा वेळीच विचार करून योग्य पाऊल उचला.






