(फोटो सौजन्य – istock)
Christmas 2025 : ड्रेसेस, मेकअप, फूटवेअर आणि ज्वेलरीसह यंदाच्या ख्रिसमस पार्टीला करा एलिगंट लूक
जानेवारी 2026
नवीन वर्षाची सुरुवातच सुट्ट्यांनी होते. 1 जानेवारी (गुरुवार) आणि 26 जानेवारी (सोमवार – प्रजासत्ताक दिन) या सुट्ट्यांमुळे दोन लाँग वीकेंड्स मिळतात. या काळात 1 ते 4 जानेवारी किंवा 23 ते 26 जानेवारी अशी ट्रिप प्लॅन करता येईल. दिल्लीहून जयपूर किंवा ऋषिकेश, तर मुंबईहून अलीबाग आणि नाशिक हे जवळचे व लोकप्रिय पर्याय आहेत.
मार्च 2026
मार्चच्या शेवटी 28 मार्च (शुक्रवार) रोजी सुट्टी असल्याने 28 ते 30 मार्च असा छोटा पण आरामदायक लाँग वीकेंड मिळतो. दिल्लीहून लॅन्सडाऊनसारखी शांत ठिकाणे किंवा मुंबईहून भंडारदऱ्याची निसर्गरम्य सहल करता येईल.
एप्रिल 2026
एप्रिलमध्ये गुड फ्रायडे (3 एप्रिल) ते ईस्टर (5 एप्रिल) असा छान वीकेंड आहे. दिल्लीहून आग्र्याला भेट देऊन ताजमहाल पाहण्याची संधी मिळेल, तर मुंबईहून माथेरानसारखी थंड हवेची जागा उत्तम पर्याय ठरेल.
ऑगस्ट 2026
28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनामुळे लाँग वीकेंड मिळतो. दिल्लीहून नीमराणा फोर्ट किंवा मुंबईहून गणपतिपुलेची समुद्रकिनारी सहल या काळात खास ठरू शकते.
ऑक्टोबर 2026
ऑक्टोबर महिना सुट्ट्यांनी भरलेला आहे. गांधी जयंती (2 ऑक्टोबर), दुर्गापूजा (17 ते 20 ऑक्टोबर) आणि वाल्मिकी जयंती (26 ऑक्टोबर) यामुळे प्रवासासाठी अनेक संधी मिळतात. या काळात जोधपूरसारखी ऐतिहासिक ठिकाणे किंवा पंचगणीसारखी हिलस्टेशन ट्रिप प्लॅन करता येईल.
नोव्हेंबर 2026
24 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती असल्याने 21 ते 24 नोव्हेंबर असा लाँग वीकेंड मिळू शकतो. अमृतसरची धार्मिक व सांस्कृतिक सफर किंवा मुंबईजवळील इगतपुरीची निसर्गभ्रमंती उत्तम ठरेल.
हा आहे मुंबईतील सर्वात पहिला चर्च, इथूनच जोडलेले आहे चर्चगेट स्टेशनचे नाव…
डिसेंबर 2026
वर्षाचा शेवट ख्रिसमस (25 डिसेंबर)च्या सुट्टीने गोड होतो. या काळात उदयपूरसारखी राजेशाही ठिकाणे किंवा फोर्ट कोच्चीसारखी वेगळी संस्कृती अनुभवता येईल. थोडक्यात सांगायचं तर, 2026 मधील लाँग वीकेंड्स हे प्रवासासाठी परफेक्ट आहेत. आधीच प्लॅनिंग करा, वेळेत तिकीट आणि हॉटेल बुक करा आणि भारताच्या विविध भागांमध्ये फिरून अविस्मरणीय आठवणी साठवा.






