(फोटो सौजन्य – Pinterest)
लाल पार्टी ड्रेस
या ख्रिसमसमध्ये लाल रंग ट्रेडमध्ये आहे, लाल बॉडीकॉन किंवा ए-लाइन ड्रेसेस तरुणींमध्ये खूप लोकप्रिय आहेत पार्टीसाठी तुम्ही लाल रंगाचा कुठलाही पार्टी ड्रेस निवास शकता
सेक्विन आणि शायनिंग गाऊन
ग्लॅमरस लुक हवा असलेल्या महिलांसाठी सेक्विन उतणि शायनिंग गाऊन परिपूर्ण आहेत. गोल्डन, सिल्व्हर किंवा क्लासिक ब्लॅक शायनिंग गाऊन तुम्हाला या खिसमसमध्ये पार्टी क्वीन बनवतील.
फ्लोरल विंटर ड्रेस
ख्रिसमसमध्ये फ्लोरल विंटर ड्रेस ही देखील एक सामान्य थीम आहे. हिवाळ्यातील पार्टीसाठी फ्लोरल प्रिंटेड मिडी किंवा मॅक्सी ड्रेस परिपूर्ण आहे. ओव्हरकोट किंवा शाल घालल्याने स्टाईल आणि आराम दोन्ही मिळू शकतात.
पडेजेंट आणि फ्रॉक स्टाईल
फ्रॉक्स किंवा प्लेटेड ड्रेसेस देखील तरुण मुलींसाठी एक लोकप्रिय पर्याय आहेत. पेस्टल शेडू किंवा क्लासिक व्हाईट फ्रॉक एक सुंदर आणि आकर्षक पार्टी लूक तयार करतील, त्यांना हील्स आणि कमीत कमी दागिन्यांसह जोडा.
टॉप-स्कर्ट कॉम्बिनेशन
ज्या महिलांना अधिक कॅज्युअल आणि कूल लूक हवा आहे त्यांच्यासाठी स्लोव्हलेस टॉप आणि मिडी/मिनी स्कर्ट कॉम्बिनेशन ट्रेडिंग आहे. पार्टीसाठी स्टायलिश हील्स आणि चोकरसोबत ते पेअर करा
डोळ्यांचा मेकअप
ख्रिसमस पार्टीचा मेकअप करण्यासाठी तुम्ही डोळ्यांवर अधिक लक्ष द्यायला हवे. यासाठी आयशॅडो लाइट पिंक किंवा न्युट्रल रंगाच्या लावू शकता. यामुळे तुम्हाला साधा पण आकर्षक लुक नक्कीच मिळेल.
रेट्रो स्टाइल
ख्रिसमस पार्टीत डोळे आणखीनच आकर्षित करण्यासाठी रेट्रो स्टाइल विंग आयलायनर लावता येईल. ज्या पार्टीत जाणार असाल आणि तिथे रेट्रो स्टाइल असेल तर हा पर्याय उत्तम आहे.
फूटवेअर
तुम्हाला शोभणारे फूटवेअर निवडा, विनाकारण नवीन ट्राय करायला जाऊ नये नाहीतर तुमचा लूक बिघडू शकतो. जर शॉर्ट ड्रेस चालणार असाल तर बूट घालावेत. गाऊन घालणार असाल तर हिल्स घालण्याला प्राधान्य द्यावे.
ज्वेलरी
कपड्यांनुसार ज्वेलरी निवडायला हवी. ख्रिसमस पार्टीत आऊफिटसोबत तुम्ही स्टार रिंग ट्राय करू शकता. स्टेटमेंट इअररिंग्ज, नेकलेस किंवा ब्रेसलेट घाला.
वाढत्या Sinusitis च्या ५०% रुग्णांसाठी कामाची जागा कारणीभूत, लक्षणे आणि उपाय
केशरचना
ख्रिसमसनिमित्त केसांना कर्ल करा किंवा एक सुंदर बन घाला. केसांची चमक वाढणवण्यासाठी तुम्ही हेअर सिरमचा वापर करू शकता.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






