किडनी डॅमेज होण्याची नक्की लक्षणे काय आहेत
किडनी शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनीच्या मदतीने शरीरात भरलेला कचरा बाहेर येऊ शकतो. किडनी हा असा अवयव आहे जो रक्त फिल्टर करण्यासारखे महत्त्वाचे कार्य करतो. सर्व अवयव निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे, मात्र अनेकदा किडनीवर लवकर परिणाम होताना दिसून येते आणि याची कारणंही अनेक आहेत.
त्यामुळे किडनीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास ती ओळखून लवकरात लवकर उपचार सुरू करणे गरजेचे आहे. अनेक वेळा किडनीच्या समस्येची समस्या प्रामुख्याने सकाळी दिसून येते, येथे आम्ही तुम्हाला अशाच 5 लक्षणांबद्दल सांगत आहोत. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
सकाळचा थकवा
सकाळी सतत थकवा जाणवणे
जर तुम्ही सकाळी उठल्यावर थकल्यासारखे आणि अशक्तपणा वाटत असाल तर ते एक गंभीर लक्षण असू शकते. किडनीच्या समस्यांमुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला नेहमी थकवा जाणवू शकतो. तुम्हाला रोज सकाळी झोप पूर्ण होऊनही थकवा वाटत असेल तर वेळीच लक्ष द्या
हेदेखील वाचा – किडनी 36 आणि फुफ्फुस 8 तास, जाणून घ्या मृत्यूनंतर कोणता अवयव किती काळ काम करतो
लघवीच्या रंगातील बदल
लघ्वीच्या रंगात बदल होणे
सकाळच्या लघवीचा रंग आणि प्रमाण हे तुमच्या किडनीच्या आरोग्याचे महत्त्वाचे सूचक असू शकते. जर तुमचा लघवी खूप पिवळा, फेसाळ किंवा असामान्य रंगाचा असेल किंवा तुम्हाला वारंवार लघवी करण्याची गरज भासत असेल तर ते मूत्रपिंडाच्या समस्येचे लक्षण असू शकते असे अनेक अभ्यासात सांगण्यात आले आहे.
पोटात पेटके येणे
सकाळी उठल्यावर पोटात दुखणे
सकाळी उठल्यावर पोटात सूज किंवा पेटके येत असल्यास, हे मूत्रपिंड नीट काम करत नसल्याचे लक्षण असू शकते. तुम्ही उठल्यानंतर सतत तुम्हाला पोटातून कळा येत असल्यासारखे वाटत असेल अथवा पोटातून सतत पेटके येत असतील आणि ते सहन होत नसतील तर तुम्ही वेळीच डॉक्टरांना दाखवा
जास्त तहान लागणे
सतत तहान लागल्याने त्रास होणे
सकाळी उठल्यावर तुम्हाला अनेकदा खूप तहान लागली असेल तर हे आणखी एक लक्षण असू शकते. किडनीच्या समस्यांमुळे शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडू शकते, त्यामुळे जास्त तहान लागते. दिवसभर कितीही पाणी पित असाल आणि तरीही तुम्हाला तहान लागल्याचा भास होत असेल तर तुम्ही नक्कीच किडनीच्या आजाराने त्रस्त आहात हे जाणून घ्या
त्वचेवर खाज
त्वचेवर खाज येण्याचे लक्षण
किडनीच्या समस्यांमुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात, ज्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, पुरळ उठणे किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही सकाळी उठल्यावर त्वचेवर असामान्य खाज येत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ही खाज नक्कीच साधीसुधी अथवा एलर्जीची नाही. त्यामुळे वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.