कैलास पर्वताचे 5 रहस्य जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील; का आजवर कुणीही यावर चढू शकलं नाही?
कोविड-१९ नंतर आता अखेर पाच वर्षांनंतर, कैलाश मानसरोवर यात्रा ३० जून २०२५ पासून सुरु करण्यात येत आहे. हिंदू, बौद्ध, जैन, शीख धर्मांच्या अनुयायांसाठी ही यात्रा खूप पवित्र मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, हे ठिकाण भगवान शिवाचे निवासस्थान आहे. इथे जाऊन लोक कैलास पर्वताला प्रदक्षिणा घालतात. हे ठिकाण फक्त धार्मिक श्रद्धेमुळेच खास नाही तर यासंबंधित अनेक न उलगडलेली रहस्ये आहेत ज्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. कैलास पर्वत माउंट एव्हरेस्टपेक्षा फारच खाली आहे मात्र तरीही आजवर कोणीही हे चढू शकले नाही. त्याच्या सभोवतालच्या अनेक आश्चर्यकारक घटना या शास्त्रज्ञांसाठी एक कोडंच आहेत.
कैलासाच्या शिखरावर कोणीही का चढू शकले नाही?
कैलास पर्वताला भेट द्यायला अनेक भाविक इथे जात असतात. मात्र आजवर कुणीही हे शिखर चढू शकले नाही. १९२६ मध्ये एका ब्रिटिश संघाने आणि २००१ मध्ये एका जपानी संघाने प्रयत्न केला, परंतु अचानक आजारपण, खराब हवामान आणि विचित्र घटनांमुळे त्यांना परतावे लागले. याव्यतिरिक्त लोकांचा असा विश्वास देखील आहे की इथे एक अदृश्य शक्ती आहे जी कुणालाही कैलास पर्वताच्या एका विशिष्ट बिंदूच्या पलीकडे जाऊ देत नाही. तथापि, त्याच्या धार्मिक श्रद्धेमुळे चिनी सरकारने कैलास पर्वतावर चढाई करण्यात बंदी घातली आहे.
कैलासचा पिरॅमिडसारखा आकार
कैलास पर्वताचा आकार हा एका पिरॅमिडसारखा आहे, ज्याचे चारही दिशांना सिमेट्रिकल फेसेस आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, नैसर्गिक धूप आणि हिमनद्यांमुळे हे तयार झाले आहे. मात्र अशी परिपूर्ण सिमिट्री इतरत्र निसर्गात क्वचितच दिसून येते. तथापि यावर शास्त्रज्ञांचे मत आहे की, कैलास इजिप्शियन पिरॅमिड आणि स्टोनहेंज सारख्या संरचनांशी जोडलेला आहे आणि तो प्राचीन ऊर्जा ग्रिडचा भाग असू शकतो. त्याच वेळी, तिबेटी बौद्ध धर्मात त्याला “अॅक्सिस मुंडी” म्हणजेच विश्वाचे केंद्र म्हटले जाते.
मानसरोवर आणि राक्षस ताल
कैलास पर्वताजवळ दोन सरोवर आहेत, एक मानससरोवर, जे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. धार्मिक श्रद्धा मानतात की मानससरोवराचे पाणी अत्यंत पवित्र आहे. तर त्याच्या शेजारीच राक्षस ताल आहे, जे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. त्याचे पाणी पिण्यायोग्य नाही आणि येथे जीवन फुलत नाही. धार्मिक मान्यतेनुसार, रावणाने येथे तपश्चर्या केली होतीज्यामुळे हे सरोवर अपवित्र झाले. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे दोन्ही सरोवर एकेकाळी एकमेकांची जोडलेले होते मात्र भूगर्भीय हालचालींमुळे वेगळे झाले. तरीही, या दोघांच्या पाण्यात इतका फरक का आहे याचे उत्तर आजवर कुणाला सापडलेले नाही. लोक याला चांगल्या आणि वाईट संतुलनाचे प्रतीक मानतात.
कैलासाचा रहस्यमय ‘आरसा’
कैलासच्या दक्षिणेकडील बाजूला एक खूप मोठी गुळगुळीत भिंत आहे, जी सूर्यप्रकाशात आरशासारखी चमकते. तथापि, हिमालय पर्वतरांगांमध्ये अशी गुळगुळीत भिंत इतरत्र कुठेही नाही. असे मानले जाते की हे नैसर्गिक हिमनदी पॉलिशिंग किंवा खडकांच्या थरांमुळे घडत आहे, परंतु त्याचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही.
कैलासावर वेळ लवकर जातो का?
अनेक यात्रेकरूंनी कैलासभोवती काळाच्या गतीत बदल अनुभवला आहे. काही जण म्हणतात की येथे काही तासांतच त्यांची नखे आणि केस जलद वाढले, तर काहींना खूप लवकर वृद्ध झाल्यासारखे वाटले. १९९९ मध्ये, रशियन शास्त्रज्ञ डॉ. अर्न्स्ट मुलदाशेव यांनी एका मोहिमेदरम्यान शोधून काढले की कैलासच्या आतून दगड पडण्याचे आवाज ऐकू येत आहेत. त्यांनी येथे बराच काळ राहिल्यानंतर अचानक वृद्ध झालेल्या सायबेरियन गिर्यारोहकांबद्दल देखील सांगितले.