(फोटो सौजन्य: Pinterest)
दिल्लीतील फेमस चांदणी चौक भारतातील एक फेमस बाजारपेठ आहे. या बाजारपेठेला भेट देण्यासाठी दूरदूरवरून लोक दिल्लीला भेट द्यायला जात असतात. दिल्लीमध्ये अनेक बाजारपेठ आहेत मात्र चांदणी चौक त्यातील सर्वात लोकप्रिय! सर्वांच्या आवडीची आणि फेमस असणाऱ्या या बाजारपेठचा उगम कसा झाला आणि याला हे नाव कसं पडलं ते तुम्हाला माहिती आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो की, चांदणी चौकचा इतिहास फार जुना आणि रंजक आहे. खरंतर, याचा इतिहास मुघल बादशाह शाहजहानशी संबंधित आहे.
चांदणी चौक मार्केट कधी बांधले गेले?
देशाच्या कानाकोपऱ्यातून महिला शॉपिंग करण्यासाठी चांदणी चौकला भेट देतात. महिलांच्या आवडीच्या या बाजारपठेचा इतिहास तुम्हाला थक्क करण्यासारखा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही बाजारपेठ आजच नाही तर शतकानुशतकांपासून सुरु आहे. जुन्या काळातही महिलांना शॉपिंगची फार आवड आणि महिलेच्या या आवडीमुळेच चांदणी चौकची निर्मिती करण्यात आली. मुघल शासक शाहजहानच्या कारकिर्दीत या बाजारपेठेला बांधण्यात आले. असे म्हटले जाते की जेव्हा मुघल बादशहा शाहजहानने आपली राजधानी आग्र्याहून दिल्लीला हलवली तेव्हा त्याने शाहजहानाबाद हे नवीन शहर स्थापन केले आणि येथे स्वतःसाठी लाल किल्ला देखील बांधला. सध्या, ते जुनी दिल्ली म्हणून ओळखले जाते. लाल किल्ल्यासमोरील बाजारपेठेला चांदणी चौक असे म्हणतात.
हे बाजार कसे आणि कोणी बांधले?
सन १६५० च्या दशकात चांदणी चौक बाजारपेठेला बाधण्यात आले. वास्तविक, शाहजहानची मुलगी जहांआरा हिला शॉपिंगची फार आवड होती. आपल्या या आवडीखातरच जहांआरा वेगवेगळ्या बाजारात जाऊन आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करत असे. जेव्हा शाहजहानला आपल्या मुलीच्या या आवडीबद्दल कळालं तेव्हा त्याने आपल्या मुलीसाठी एक बाजारपेठ बांधण्याचा निर्णय घेतला. मग काय, तिचा खरेदीचा छंद पूर्ण करण्यासाठी, जहांआराने स्वतः हे बाजार डिझाइन केले आणि तेव्हापासूनच दिल्लीतील या जुन्या बाजारपेठेची निर्मिती झाली.
बाजारपेठेला चांदणी चौक नाव कसं मिळाले?
आता ही तर बाजारपेठेची कहाणी मात्र आता प्रश्न असा उपस्थित होतो की, याला चांदणी चौक हेच नाव का देण्यात आले? तर झालं असं की, जेव्हा हे बाजार बांधले गेले तेव्हा त्याचा आकार अर्धवर्तुळाकार म्हणजेच अर्धचंद्रासारखा होता. इतकेच नाही तर या बाजारात कालवे आणि तलाव देखील होते, ज्यावर रात्री चांदण्यांचे दृश्य चमकत राहायचे आणि म्हणूनच त्याचे नाव चांदणी चौक ठेवण्यात आले.