Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breast Cancer पुन्‍हा होण्‍याचा धोका कमी करण्‍यासाठी 5 उपाय, तज्ज्ञांचा सल्ला

ब्रेस्ट कॅन्सर एकदा बरा झाल्यावर पुन्हा होऊ शकतो. यासाठी नक्की महिलांनी कोणती काळजी घ्यावी आणि काय उपाय आहेत याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे, जाणून घ्या लेखातून

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 01, 2025 | 01:24 PM
स्तनाचा कर्करोग परत झाल्यास काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

स्तनाचा कर्करोग परत झाल्यास काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • स्तनाचा कर्करोग माहिती 
  • स्तनाचा कर्करोग पुन्हा होऊ नये यासाठी काय करावे 
  • महिलांमध्ये वाढता आजार 
स्‍तनाचा कर्करोग सर्वात सामान्‍य व प्राणघातक कर्करोग आहे, ज्‍याचा भारतातील महिलांवर परिणाम होतो. वाढती जागरूकता आणि वैद्यकीय प्रगतीमुळे भारतातील जवळपास ७६ टक्‍के स्तनाच्या कर्करोगाच्‍या केसेसचे आता सुरुवातीच्या टप्प्यात निदान होत आहे.  सुरुवातीच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग म्हणजे कर्करोगाची गाठ स्तनात किंवा जवळच्या लिम्फ नोड्समध्ये आढळते आणि शरीराच्या इतर भागात पसरलेली नसते. ते ०, १, २ किंवा ३ टप्‍प्‍यामधील असू शकते.  पण यशस्वी उपचारानंतर देखील स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्याचा धोका प्रमुख चिंतेचा विषय आहे. 

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, अर्ली ब्रेस्ट कॅन्सर (EBC)चे निदान झालेल्या जवळपास २० टक्‍के महिलांना १० वर्षांच्या आत पुन्‍हा स्‍तनाचा कर्करोग होण्‍याची शक्‍यता आहे.  निदानाच्या वेळी वय, ट्यूमरचा आकार, कर्करोग असलेल्या लिम्फ नोड्सची संख्या, जनुकांमधील उत्परिवर्तन किंवा कर्करोग वाढण्यास कारणीभूत ठरू शकणाऱ्या जनुकांची असामान्य क्रिया यांसह अनेक घटकांमुळे ईबीसी असलेल्या प्रत्येक महिलेला स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्याचा धोका वेगळा असतो.  जोखीम समजून घेणे आणि पुढील उपाययोजनांबाबत स्‍पष्‍ट जाणीव असणे हे स्‍तनाचा कर्करोगामधून वाचलेल्यांना आत्मविश्वासाने जीवन जगण्‍यास मदत करण्‍यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

बदललेला दृष्टीकोन 

सुदैवाने, वैद्यकीय प्रगतीमुळे स्तनाच्या कर्करोगातून वाचलेल्यांसाठी दृष्टिकोन बदलत आहे. हार्मोन-आधारित उपचारांसह आरोग्‍यदायी उतींना वाचवून कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणारे अत्याधुनिक लक्ष्यित उपचार केले जात आहेत. तसेच, अल्पावधीत स्‍तनाचा कर्करोग नियंत्रित करण्याऐवजी दीर्घकाळापर्यंत स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याच्या शक्‍यतेला कमी करण्‍यावर, तसेच दीर्घकाळापर्यंत जीवनाचा दर्जा उत्तम राहण्‍यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. परिणामत: अधिकाधिक महिलांना दीर्घकाळापर्यंत उत्तमरित्‍या जीवन जगता येते. 

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

काय सांगतात तज्ज्ञ

सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजीच्या संचालिका आणि ऑन्कोलॉजी रिसर्चच्या संचालिका डॉ. सेवंती लिमये म्हणाल्या, “सुरुवातीच्या टप्प्यावरील ब्रेस्‍ट कॅन्‍सर पूर्णपणे बरा होऊ शकतो, असा सामान्य समज आहे. प्रत्यक्षात, लवकर निदान झाल्‍यानंतर देखील स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्याचा धोका कायम असतो, कधी-कधी ५० टक्‍क्‍यांपर्यंत शक्‍यता असू शकते.  म्हणून, प्रत्येक रुग्णाने प्रगत थेरपी पर्यायांबद्दल सतत दक्ष राहणे आणि चर्चा करणे महत्त्वाचे आहे. तुमचा वैयक्तिक धोका समजून घेऊन आणि तुमच्या काळजी घेणाऱ्या टीमसोबत एकत्रित काम करून तुम्ही स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याची शक्यता कमी करण्यासाठी आणि दीर्घकाळापर्यंत आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी सक्रिय पावले उचलू शकता.”  

आरोग्‍यदायी वजन आणि सक्रिय शारीरिक जीवनशैली राखा

शरीराचे जास्‍त वजन आणि निष्क्रिय शारीरिक जीवनशैलीमुळे स्तनाचा कर्करोग होण्‍याचा धोका वाढू शकतो. नियमित व्यायाम आणि आरोग्‍यदायी वजन राखणे यामुळे हार्मोन्स नियंत्रित करण्यास मदत होते, जळजळ कमी होते आणि एकूण आरोग्‍य उत्तम राहते.  फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि लीन प्रोटीन असलेल्‍या संतुलित आहाराचे सेवन केल्‍याने वजनाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत होऊ शकते. हे सर्व घटक स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याची शक्‍यता कमी करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजातवत. 

नियमित फॉलो-अप घेत तपासणी करा 

स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याबाबत लवकर निदान केल्‍यास अधिक प्रभावी उपचार करता येऊ शकतात आणि उत्तम निष्‍पत्तींची खात्री मिळते. इमेजिंग, प्रयोगशाळेत चाचण्‍या व प्रत्‍यक्ष तपासणीसाठी फॉलो-अप वेळापत्रकाचे पालन केल्‍यास कोणतेही बदल लवकर ओळखण्‍यास मदत होते. तुम्हाला गाठी, वेदना किंवा अस्पष्ट थकवा यांसारखी कोणतीही नवीन लक्षणे दिसली तर विलंब न करता वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे. 

स्तनांचा कर्करोग झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास आरोग्यास निर्माण होईल धोका

प्रगत उपचारांबद्दल डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या

अर्ली ब्रेस्‍ट कॅन्‍सरसह निदान झालेल्‍या महिलांसाठी हार्मोन-आधारित औषधे आणि लक्ष्यित उपचारांसह प्रगत उपचारांमुळे जीवनाचा दर्जा कायम राखत स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याचा धोका कमी होऊ शकतो. भारतात अजूनही केअर सर्विस उपलब्‍ध असण्‍याचे प्रमाण आणि जागरूकता वाढत आहे, ज्‍यामुळे फक्‍त जगण्‍याबाबत नाही तर जीवन जगण्‍याच्‍या पद्धतीबाबत देखील चर्चा होणे महत्त्वाचे आहे. यशस्‍वी उपचारासह दीर्घकाळापर्यंत काळजी, मानसिक आरोग्‍य व जीवनाचा दर्जा यांना देखील प्राधान्‍य दिले पाहिजे. रुग्णांना ‘माझ्यासाठी कोणते प्रगत उपचार पर्याय आहेत?’ अशी प्रश्‍नं विचारण्‍यास प्रेरित केले पाहिजे. 

मानसिक आणि भावनिक आरोग्‍य उत्तम राखण्‍याला प्राधान्‍य द्या

भावनिक आरोग्‍य उत्तम असणे शारीरिक रिकव्‍हरी आणि दीर्घकाळापर्यंत जगण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. सामाजिक पाठिंबा, समुपदेशन व तणाव व्‍यवस्‍थापन यामुळे जीवनचा दर्जा मोठ्या प्रमाणात सुधारू शकतो, तसेच स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याचा धोका देखील कमी होऊ शकतो. चिंता, नैराश्‍य किंवा स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याची भिती जाणवत असेल तर मानसिक आरोग्य तज्ञांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका.

तंबाखूचे सेवन टाळा आणि मद्यपान मर्यादित करा

धूम्रपान आणि जास्त मद्यपान केल्याने स्तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याचा धोका वाढू शकतो.  तुम्ही धूम्रपान करत असाल तर समुपदेशन किंवा इतर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून धूम्रपान सोडण्‍यासाठी मदत घ्या. मद्यपान मर्यादित करा किंवा शक्य असल्यास पूर्णपणे टाळा. हे धोके कमी करण्याबाबत वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुमच्या केअर टीमसोबत याबाबत चर्चा करा.

स्‍तनाचा कर्करोग पुन्‍हा होण्‍याचा धोका वास्तविक आहे, पण दक्षता, थेरपीचे पालन आणि आरोग्यासाठी व्यापक दृष्टिकोन यांद्वारे त्‍याचे व्‍यवस्‍थापन केले जाऊ शकते. तुमच्या केअर टीमसोबत सल्‍लामसलत करा, प्रगत उपचारांबद्दल चर्चा करा, जीवनशैलीच्या निवडींबाबत सक्रिय राहा आणि शारीरिक व मानसिक आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याला प्राधान्य द्या. अशी सक्रिय पावले उचलत तुम्‍ही स्‍तनाचा कर्करोग होण्‍याचा धोका कमी करू शकता आणि आरोग्‍यदायी जीवन जगू शकता

FAQs (संबंधित प्रश्न) 

१. स्तनाचा कर्करोग कसा ओळखायचा?

स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी मॅमोग्राम सामान्यतः वापरले जातात . अधिक तपशीलवार मॅमोग्रामला डायग्नोस्टिक मॅमोग्राम असे म्हटले जाते 

२. स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण किती काळ जगतात?

NCI च्या अहवालानुसार स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या ९०.८% महिला निदानानंतर साधारण ५ वर्षे जगतात 

३. कोणते कर्करोग १००% बरे होऊ शकतात?

प्रोस्टेट, थायरॉईड, टेस्टिक्युलर, मेलेनोमा, स्तनाचे कर्करोग योग्य उपाय मिळाल्यास बरे होतात

Web Title: 5 ways to reduce the risk of breast cancer recurrence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 01:24 PM

Topics:  

  • Breast Cancer
  • Cancer Awareness
  • Cancer prevention

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
2

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Health News: ‘वय वर्ष 35, अजूनही मूल नाही Breast Cancer होईल’, खरंच या दाव्यात किती तथ्य, तज्ज्ञांनी केला खुलासा
3

Health News: ‘वय वर्ष 35, अजूनही मूल नाही Breast Cancer होईल’, खरंच या दाव्यात किती तथ्य, तज्ज्ञांनी केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.