Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pregnancy After Breast Cancer: ‘कर्करोगानंतरही आई होऊ शकेन का…’, प्रजनन क्षमता, गर्भधारणा आणि स्तनपान तज्ज्ञांचा योग्य सल्ला

Pregnancy After Breast Cancer: स्तनाचा कर्करोग झाल्यानंतर अनेक महिलांना गर्भधारणा, प्रजननक्षमता आणि स्तनपान करण्याबाबत शंका असते. याची योग्य उत्तरंही माहीत नसतात. वाचा तज्ज्ञांंचा योग्य सल्ला

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 31, 2026 | 08:09 PM
स्तनाच्या कर्करोगाबाबत काही गैरसमज (फोटो सौजन्य - iStock)

स्तनाच्या कर्करोगाबाबत काही गैरसमज (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • स्तनाच्या कर्करोगानंतर गर्भधारणा, प्रजनन क्षमता आणि स्तनपानाबाबत योग्य माहिती 
  • तज्ज्ञांनी सांगितले तथ्य
  • स्तनाच्या कर्करोगातून बरं झाल्यावर गर्भधारणा होऊ शकते का? 
Pregnancy After Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगावरील उपचार सुरू करण्यापूर्वीच भविष्यातील मातृत्वाबाबत विचार करणं तरुण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः ज्यांना भविष्यात आई व्हायचं आहे, त्यांनी उपचारांपूर्वीच डॉक्टरांशी प्रजननक्षमता (Fertility) जपण्याच्या पर्यायांबाबत मोकळेपणाने चर्चा करणं गरजेचं आहे. कारण एकदा उपचार सुरू झाल्यानंतर काही पर्याय मर्यादित होऊ शकतात किंवा उपलब्ध राहतीलच असं नाही. 

कर्करोगाचं निदान, उपचारांची चिंता आणि त्यातून सावरण्याचं आव्हान या सगळ्यांशी झुंजताना तरुण महिलांच्या मनात आणखी काही महत्त्वाचे प्रश्न असतात. मात्र, या प्रश्नांवर बोलणं अनेकदा अवघड ठरतं. जसं की ‘कर्करोगाच्या उपचारांनंतरही मी आई होऊ शकेन का? मला पुन्हा गर्भधारणा शक्य होईल का? आणि भविष्यात माझ्या बाळाला स्तनपान करता येईल का?’ या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या लेखातून तुम्हाला मिळणार आहेत. डॉ. भावना शर्मा, Longevity & IVF Specialist Founder, TLC (The Longevity Centre) च्या संस्थापिका यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

काय आहे तज्ज्ञांचे मत 

डॉ. शर्मा यांच्या मते, ज्या स्त्रीने आयुष्यभर आई होण्याचं स्वप्न पाहिलं आहे, तिच्यासाठी अशा परिस्थितीला सामोरं जाणं अत्यंत भावनिक आणि कठीण ठरू शकतं. विशेषतः जेव्हा संपूर्ण लक्ष कर्करोगाशी लढण्यावर केंद्रित करावं लागतं, तेव्हा मातृत्वाची स्वप्नं आणि भविष्यातील कुटुंब नियोजन काही काळासाठी मागे पडू शकतं.
अनेकदा कर्करोगावरील उपचार तातडीने सुरू करणं आवश्यक असल्याने गर्भधारणा आणि अपत्यप्राप्तीशी संबंधित योजना पुढे ढकलाव्या लागतात. मात्र, काही स्त्रियांना केमोथेरपी किंवा इतर उपचारांचा त्यांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, याची आधीपासून कल्पनाच नसते. उपचारांदरम्यान मासिक पाळीच्या चक्रात बदल जाणवू लागल्यानंतरच त्यांना या संभाव्य परिणामांची जाणीव होते.

Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सरचे निदान म्हणजे शेवट नाही! सुरुवातीच्या टप्प्यातील कॅन्सरवर मात करण्याचे ५ प्रभावी मार्ग

स्तनाच्या कर्करोगानंतर शक्यता संपते का?

स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले म्हणजे मातृत्वाची शक्यता पूर्णपणे संपली, असे अजिबात नाही. कर्करोग उपचार आणि प्रजनन वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे महिलांसमोर आता अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. प्रजनन क्षमता जतन करण्याच्या आधुनिक पद्धती, उपचार पूर्ण झाल्यानंतर गर्भधारणेचे काळजीपूर्वक नियोजन करणे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे, यांसारख्या गोष्टींमुळे काही महिलांना कुटुंब स्थापन करण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे कर्करोगाच्या निदानानंतर मातृत्वाची स्वप्नं पूर्णपणे सोडून देण्याची गरज नाही.

ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे की, या विषयांवर उपचारांच्या सुरुवातीलाच मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी. कर्करोग उपचार पथक आणि प्रजनन वैद्यक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पर्याय समजून घेऊन निर्णय घेणं महत्त्वाचं ठरतं.

डॉक्टरांशी चर्चा करणं महत्त्वाचं 

‘एखाद्या तरुण महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर, उपचारांच्या नियोजनासोबतच तिच्या प्रजननक्षमतेबाबतची चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः भविष्यात मातृत्वाचा अनुभव घ्यायची इच्छा असलेल्या महिलांसाठी हा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरतो. निदानानंतर अनेक रुग्णांचे संपूर्ण लक्ष कर्करोगावरील उपचारांवर केंद्रित असते. 

मात्र, या उपचारांचा प्रजनन आरोग्यावर होऊ शकणारा परिणाम समजून घेणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे उपचार सुरू करण्यापूर्वीच प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास महिलांना भविष्यातील मातृत्वासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांची माहिती मिळते आणि विचारपूर्वक निर्णय घेणे शक्य होते,’ असे टीएलसी (द लॉन्जेव्हिटी सेंटर) च्या संस्थापक, प्रजनन वैद्यक आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. भावना शर्मा यांनी सांगितले.

प्रजनन क्षमता जतन करण्याचा अर्थ कर्करोगावरील उपचार पुढे ढकलणे असा नाही. तर उपचार सुरू करण्यापूर्वी उपलब्ध वेळेत प्रजनन क्षमतेसाठी काही पर्याय शक्य आहेत का, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी कर्करोगतज्ज्ञ आणि प्रजनन क्षमता उपचारतज्ज्ञांनी एकत्रितपणे योग्य वैद्यकीय योजना आखणे आवश्यक आहे.

खराब लाइफस्टाइलमुळे होतो Breast Cancer! वाचण्याचे उपाय जाणून घ्या

काय आहे गैरसमज

‘स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांनंतर आई होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही, असा समज कोणत्याही महिलेने करून घेऊ नये. मात्र, गर्भधारणेचा निर्णय घेताना केवळ अंदाज किंवा सर्वसाधारण माहितीच्या आधारे पुढे जाणे योग्य ठरणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन आणि तज्ज्ञांचा सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे. गर्भधारणेसाठी योग्य वेळ कोणती, तसेच सुरू असलेल्या औषधोपचारांमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे का, याबाबत संबंधित कर्करोगतज्ज्ञ (ऑन्कोलॉजिस्ट) आणि प्रजनन तज्ज्ञ (फर्टिलिटी स्पेशालिस्ट) यांच्याशी सविस्तर चर्चा करावी. या संपूर्ण प्रक्रियेत महिलेचे आरोग्य आणि सुरक्षितता जपण्यासोबतच तिच्या मातृत्वाच्या इच्छा आणि कौटुंबिक नियोजनाचाही विचार केला जाणे गरजेचे आहे,’ असे डॉ. शर्मा सांगतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारानंतर गर्भधारणा होऊ शकते का?

    Ans: होय, स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारानंतर गर्भधारणा होऊ शकते. बऱ्याच महिला उपचारांनंतर यशस्वीपणे गर्भवती होतात आणि त्यांना निरोगी बाळ होते

  • Que: स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारानंतर स्तनपान करता येते का?

    Ans: होय, स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारानंतर स्तनपान करणे शक्य आहे, परंतु हे तुम्ही घेतलेल्या उपचाराच्या प्रकारावर आणि शस्त्रक्रियेवर अवलंबून असते

  • Que: स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारानंतर प्रजननक्षमता योग्य राहते का?

    Ans: स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारानंतर प्रजननक्षमता प्रभावित होऊ शकते, परंतु अनेक प्रकरणांमध्ये योग्य नियोजनाद्वारे ती सुरक्षित राखणे शक्य असते

Web Title: Pregnancy after breast cancer breastfeeding fertility information from experts dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 08:09 PM

Topics:  

  • Breast Cancer
  • Health News
  • pregnancy

संबंधित बातम्या

वयाची ४० वर्ष पूर्ण होण्याआधी महिलांना स्तनाच्या कर्करोगाबद्दल माहित असायला हव्यात ‘या’ गोष्टी, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
1

वयाची ४० वर्ष पूर्ण होण्याआधी महिलांना स्तनाच्या कर्करोगाबद्दल माहित असायला हव्यात ‘या’ गोष्टी, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Health News: पुण्यातील रुग्णालयांचे धाबे दणाणणार? केवळ २० टक्के हॉस्पिटल्सकडून नियमांचे पालन
2

Health News: पुण्यातील रुग्णालयांचे धाबे दणाणणार? केवळ २० टक्के हॉस्पिटल्सकडून नियमांचे पालन

Breastfeeding: आई आणि बाळासाठी स्तनपान करणे फायदेशीर! स्तनाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळण्यास होईल मदत
3

Breastfeeding: आई आणि बाळासाठी स्तनपान करणे फायदेशीर! स्तनाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळण्यास होईल मदत

ACTREC Navi Mumbai : रक्ताच्या नमुन्यातून कर्करोगाच्या पेशींचा शोध! ‘ऑन्कोडिस्कव्हर’हे नविन तंत्रज्ञान चर्चेत
4

ACTREC Navi Mumbai : रक्ताच्या नमुन्यातून कर्करोगाच्या पेशींचा शोध! ‘ऑन्कोडिस्कव्हर’हे नविन तंत्रज्ञान चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.