Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breast Cancer: बायोप्सी महत्त्वाची का आहे? स्तनाच्या ऊतींचा छोटासा नमुना घेतल्यानंतर लॅबमध्ये नेमकं काय होतं? जाणून घ्या सविस्तर

Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकर होणे फार आवश्यक आहे. वयाच्या 30 वर्षांनंतर दरवर्षी डॉक्टरांकडून स्तनांची तपासणी करून घेणे फार आवश्यक आहे. कमी वयाच्या आणि स्तनांमध्ये दाट ऊती असलेल्या महिलांसाठी अल्ट्रासाऊंड उपयोगी ठरू शकतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 02, 2026 | 03:30 PM
बायोप्सी महत्त्वाची का आहे? स्तनाच्या ऊतींचा छोटासा नमुना घेतल्यानंतर लॅबमध्ये नेमकं काय होतं?

बायोप्सी महत्त्वाची का आहे? स्तनाच्या ऊतींचा छोटासा नमुना घेतल्यानंतर लॅबमध्ये नेमकं काय होतं?

Follow Us
Follow Us:

Breast Cancer: स्तनामध्ये गाठ जाणवली किंवा मॅमोग्राममध्ये काहीतरी असामान्य दिसलं, की महिलांच्या मनात चिंता निर्माण होणं स्वाभाविक आहे. अशा वेळी मनात लगेच एक प्रश्न येतो, तो म्हणजे, “मला कॅन्सर तर नाही ना?” डॉक्टरांची तपासणी आणि इमेजिंग टेस्टमधून काही महत्त्वाचे संकेत मिळतात; पण बायोप्सीमुळे अनेकदा या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळतं. मॅमोग्राममधून स्तनामध्ये एखादी संशयास्पद सावली किंवा बदल दिसू शकतो. पण तो नेमका काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे आणि त्यावर कोणतं उपचार करायचे, हे बायोप्सीमधून समजतं. बायोप्सीशिवाय आपण केवळ अंदाज बांधत असतो.याविषयी डॉ. कुंजल लीला, हेड ऑफ डिपार्टमेंट आणि कन्सल्टंट, सर्जिकल पॅथॉलॉजी, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Pregnancy After Breast Cancer: ‘कर्करोगानंतरही आई होऊ शकेन का…’, प्रजनन क्षमता, गर्भधारणा आणि स्तनपान तज्ज्ञांचा योग्य सल्ला

ब्रेस्ट कॅन्सरचे वाढते प्रमाण

जगभरात आणि भारतात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनाचा कर्करोग हा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. GLOBOCAN 2024 च्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी स्तनाच्या कर्करोगाचे अंदाजे 2,37,231 नवीन रुग्ण आढळतात. देशातील एकूण नवीन कर्करोगाच्या रुग्णांपैकी हे प्रमाण 15.2 टक्के आहे. भारतात हा कर्करोग साधारणपणे वयाच्या 40 ते 50 वर्षांदरम्यान जास्त आढळतो. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात तो जवळपास दहा वर्षं आधी दिसून येतो. दुर्दैवाने, भीतीपोटी किंवा नियमित तपासणी न केल्यामुळे अजूनही जवळपास निम्म्या महिला कर्करोगाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात डॉक्टरांकडे येतात. ही आकडेवारी जनजागृती, वेळेवर निदान आणि योग्य वेळी वैद्यकीय तपासणी किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित करते.

कोणत्या तपासण्या कराव्यात

कर्करोगाचं लवकर निदान होण्यासाठी काही तपासण्या आणि खबरदारी महत्त्वाची आहे. मासिक पाळी सुरू झाल्यानंतर 7 ते 10 दिवसांनी दर महिन्याला स्वतः स्तनांची तपासणी (Self-examination) करावी. वयाच्या 30 वर्षांनंतर दरवर्षी डॉक्टरांकडून स्तनांची तपासणी करून घ्यावी. वयाच्या 40 वर्षांनंतर मॅमोग्राम करण्याचा सल्ला दिला जातो. मॅमोग्राममुळे स्तनामध्ये गाठ जाणवण्याच्या जवळपास दोन वर्षं आधीही कर्करोगाचे संकेत मिळू शकतात. कमी वयाच्या आणि स्तनांमध्ये दाट ऊती (Dense Breasts) असलेल्या महिलांसाठी अल्ट्रासाऊंड उपयोगी ठरू शकतो. तर BRCA म्युटेशन असलेल्या किंवा कुटुंबात स्तनाच्या कर्करोगाचा ठोस इतिहास असलेल्या महिलांना MRI करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

इमेजिंग तपासणीमध्ये BIRADS 4 किंवा 5 असा रिपोर्ट आला, म्हणजेच कर्करोगाचा संशय व्यक्त झाला, तर बायोप्सी करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय, नवीन गाठ बराच काळ टिकून राहणे, स्तनाग्रातून रक्तमिश्रित स्त्राव येणे, स्तनाच्या त्वचेवर जाडी येणे किंवा त्वचा आत ओढल्यासारखी दिसणे (Dimpling), तसेच काखेत संशयास्पद गाठी जाणवणे, अशा परिस्थितीतही बायोप्सीची गरज पडू शकते.

बहुतेक वेळा कोअर नीडल बायोप्सी (Core Needle Biopsy) केली जाते. ही प्रक्रिया स्थानिक भूल देऊन आणि अल्ट्रासाऊंडच्या मदतीने केली जाते. यामध्ये स्तनाच्या गाठीमधून टिश्यूचे म्हणजेच ऊतींचे 3 ते 4 छोटे नमुने घेतले जातात. ही प्रक्रिया साधारण 15 मिनिटांत पूर्ण होते. टाके घालण्याची गरज नसते आणि त्याच दिवशी घरी जाता येतं. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये व्हॅक्यूम-असिस्टेड बायोप्सी किंवा सर्जिकल बायोप्सी करण्याचीही गरज पडू शकते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बायोप्सी केल्यामुळे कर्करोग पसरत नाही.

आता प्रश्न असा पडतो की, बायोप्सीसाठी घेतलेल्या या छोट्याशा नमुन्याचं पुढे नेमकं काय होतं? इथे पॅथॉलॉजिस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. बायोप्सीमधून घेतलेला टिश्यूचा नमुना लगेच फॉर्मालिनमध्ये सुरक्षित ठेवला जातो आणि प्रयोगशाळेत पाठवला जातो. लॅबमध्ये या टिश्यूवर प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर हिस्टोपॅथॉलॉजी तपासणी (Histopathology Examination) केली जाते. या तपासणीमधून टिश्यू सामान्य आणि कॅन्सर नसलेला आहे का, त्यामध्ये काही असामान्य किंवा भविष्यात कर्करोगाचा धोका वाढवणारे बदल आहेत का, किंवा प्रत्यक्ष कर्करोगाच्या पेशी आहेत का, हे समजतं. कर्करोग असल्यास त्याचा प्रकार आणि ग्रेड म्हणजेच तो किती आक्रमक असू शकतो, याचंही मूल्यांकन केलं जातं. या सर्व गोष्टींच्या आधारे रुग्णाच्या पुढील उपचारांची दिशा ठरवली जाते. काही वेळा अचूक निदान करण्यासाठी इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री (Immunohistochemistry – IHC) नावाच्या विशेष चाचण्यांचीही गरज पडते.

IHC चाचण्यांच्या आणखी एका महत्त्वाच्या गटामध्ये ER, PgR, HER2neu आणि Ki-67 या चाचण्यांचा समावेश होतो. कर्करोगाच्या वाढीसाठी कोणते घटक कारणीभूत आहेत आणि कर्करोगाच्या पेशी किती वेगाने वाढत आहेत, हे समजून घेण्यासाठी या चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. स्तनाच्या कर्करोगाच्या 60 ते 70 टक्के रुग्णांमध्ये ER/PgR पॉझिटिव्ह असतात. अशा रुग्णांना हार्मोनल उपचारांचा फायदा होऊ शकतो आणि काही प्रकरणांमध्ये केमोथेरपी टाळता येऊ शकते. तर 20 ते 25 टक्के रुग्णांमध्ये HER2neu पॉझिटिव्ह असतं. अशा रुग्णांवर Trastuzumab नावाच्या विशेष टार्गेटेड इंजेक्शनद्वारे उपचार करता येतात. Ki-67 हा पेशींच्या वाढीचा वेग दर्शवणारा मार्कर आहे. म्हणजेच कर्करोगाच्या पेशी किती वेगाने विभाजित होत आहेत, याची माहिती या चाचणीतून मिळते. या सर्व रिपोर्ट्सच्या आधारे डॉक्टर प्रत्येक रुग्णाच्या कर्करोगाच्या स्वरूपानुसार योग्य उपचार ठरवू शकतात.

प्रत्येक इन्व्हेसिव्ह ब्रेस्ट कॅन्सरमध्ये या चाचण्या करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे या चाचण्या एकामागोमाग एक करण्याऐवजी सुरुवातीलाच एकत्र करण्याची (Reflex Testing) शिफारस केली जाते. यामुळे निदानासाठी लागणारा महत्त्वाचा वेळ वाचू शकतो आणि उपचार लवकर सुरू करता येतात.

काही निवडक प्रकरणांमध्ये आणखी माहिती मिळवण्यासाठी मॉलिक्युलर किंवा जीनोमिक चाचण्या (Molecular or Genomic Tests) केल्या जातात. HER2neu जीन टेस्टमुळे काही वेळा आधीच्या चाचण्यांचे निष्कर्ष स्पष्ट होण्यास मदत होते. तर इतर काही चाचण्यांमधून कर्करोग पुन्हा होण्याचा धोका किती आहे किंवा पुढील उपचार कोणते असावेत, याचा अंदाज घेता येतो.

कर्करोगाच्या सुरुवातीच्या काही टप्प्यांमध्ये जीन टेस्ट केली जाते. या चाचणीतून कर्करोग पुन्हा होण्याची शक्यता दर्शवणारा एक स्कोअर मिळतो. स्कोअर कमी असल्यास केमोथेरपी टाळून केवळ गोळ्यांच्या स्वरूपातील उपचार घेणं सुरक्षित ठरू शकतं. तर स्कोअर जास्त असल्यास केमोथेरपीचा फायदा होऊ शकतो. या चाचण्यांमुळे अनेक महिलांना अनावश्यक केमोथेरपी आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत झाली आहे.

प्रगत अवस्थेतील (Advanced) किंवा ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये BRCA1/2, PIK3CA आणि PD-L1 यांसारख्या इतर घटकांचीही तपासणी केली जाते. या चाचण्यांच्या मदतीने PARP Inhibitors किंवा Immunotherapy यांसारखे टार्गेटेड उपचार रुग्णाला देता येतील का, हे ठरवण्यास मदत होते.

पॅथॉलॉजीच्या अंतिम रिपोर्टमध्ये सूक्ष्मदर्शकाखाली केलेल्या तपासणीचे निष्कर्ष आणि इतर विशेष चाचण्यांचे निष्कर्ष एकत्रित केले जातात. त्यानंतर डॉक्टरांची टीम हे रिपोर्ट्स, इमेजिंग तपासण्या, रुग्णाची वैद्यकीय स्थिती आणि इतर तपासण्यांचे निष्कर्ष यांचा एकत्रित विचार करून पुढील उपचारांची योजना ठरवते.

थोडक्यात सांगायचं तर, अवघ्या 15 मिनिटांत घेतलेला बायोप्सीचा एक छोटासा नमुना पुढील अनेक वर्षांच्या उपचारांची दिशा ठरवू शकतो. शस्त्रक्रिया करायची की नाही, गोळ्या द्यायच्या, इंजेक्शन द्यायचं की केमोथेरपीची गरज आहे, यासारखे महत्त्वाचे निर्णय या छोट्याशा नमुन्याच्या तपासणीतून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून असतात.

वयाची ४० वर्ष पूर्ण होण्याआधी महिलांना स्तनाच्या कर्करोगाबद्दल माहित असायला हव्यात ‘या’ गोष्टी, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

म्हणूनच, बायोप्सी म्हणजे काहीतरी वाईट घडल्याचं लक्षण नाही, तर आजाराबद्दल स्पष्ट माहिती मिळवण्याच्या दिशेने उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. वेळेवर तपासणी आणि अचूक निदानामुळे मनातील भीती आणि अनिश्चितता कमी होण्यास मदत होते. कारण योग्य माहितीच्या आधारेच डॉक्टर रुग्णाला योग्य वेळी योग्य उपचार देऊ शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी बायोप्सी का महत्त्वाची असते?

    Ans: स्तनात आढळलेली गाठ किंवा संशयास्पद बदल कर्करोगाचे आहेत की नाही, हे निश्चित करण्यासाठी बायोप्सी महत्त्वाची असते. यात स्तनाच्या ऊतींचा छोटासा नमुना तपासणीसाठी घेतला जातो.

  • Que: बायोप्सीमध्ये स्तनाच्या ऊतींचा नमुना कसा घेतला जातो?

    Ans: सुईच्या साहाय्याने किंवा आवश्यकतेनुसार लहान शस्त्रक्रियेद्वारे ऊतींचा नमुना घेतला जातो. कोणती पद्धत वापरायची हे गाठीचे स्वरूप आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरते.

  • Que: बायोप्सीच्या अहवालातून कोणती माहिती मिळते?

    Ans: अहवालातून गाठ कर्करोगजन्य आहे की नाही, कर्करोगाचा प्रकार आणि पेशींमधील काही महत्त्वाचे बदल समजू शकतात. आवश्यक असल्यास पुढील तपासण्यांद्वारे कर्करोगाची वैशिष्ट्येही तपासली जातात.

Web Title: Breast cancer why is a biopsy important what exactly happens in the lab after a small sample of breast tissue is collected sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Breast Cancer
  • Cancer Awareness
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यात मूठभर मोड आलेली कडधान्य खाल्ल्यास शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, राहाल कायमच हेल्दी
1

सकाळच्या नाश्त्यात मूठभर मोड आलेली कडधान्य खाल्ल्यास शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, राहाल कायमच हेल्दी

Health Care: कोणताही त्रास होत नसताना सुद्धा ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल तपासणे का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या यामागील कारणे
2

Health Care: कोणताही त्रास होत नसताना सुद्धा ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल तपासणे का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या यामागील कारणे

Health Update: लघवीच्या नमुन्यातून मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान! नव्या चाचणीमुळे वैद्यकीय क्षेत्रात आशादायक चित्र
3

Health Update: लघवीच्या नमुन्यातून मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान! नव्या चाचणीमुळे वैद्यकीय क्षेत्रात आशादायक चित्र

Stomach Pain: पोटाच्या एकाच बाजूला कायम वेदना होतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय
4

Stomach Pain: पोटाच्या एकाच बाजूला कायम वेदना होतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.