
Parenting Tips : तुमच्या मुलांना हे 7 खोटं बोलायला जरुर शिकवा, सायबर सुरक्षा तज्ञाकडून देण्यात आल्यात टिप्स
Brain Tumor: स्मार्टफोनमुळे ब्रेन ट्यूमर होतो का? जाणून घेऊया याबद्दल असलेले गैरसमज आणि वास्तविकता
मुलांना सांगा की, जर कुणी अनोळखी व्यक्ती घरी आली आणि त्यांना मुलांना घरी आई-वडिल आहेत की नाही तर त्यांना नाही असं सांगू नका. मुलांना नेहमी अनोखळी व्यक्तींना पालक घरीच आहेत असं सांगावं. यामुळे चुकीच्या प्रवृत्तीची लोक मुलांना सोपा लक्ष्य बनवत नाही.
मुलांना सांगून ठेवा की, जर कुणी अनोखळी व्यक्ती बाईक किंवा चारचाकीने त्यांना घरी सोडायला सांगत असेल तर लगेच त्याला नकार द्या. त्यांनी खूप जबरदस्तू केली तर त्यांना सांगा की, “माझे आई-वडील मला घ्यायला येत आहेत.” यामुळे फसवणूकीचे प्रकार टाळता येईल.
अनेकदा अशी प्रकरणे समोर येतात की अनोखळी व्यक्तींद्वारे मुलांना चाॅकलेटचे आमीष देऊन त्यांचे अपहरण केले जाते. अशा परिस्थितीत मुलांना आधीपासून नाही म्हणायला शिकवा.
जर कुणी व्यक्ती मुलांना सांगत असेल की, “याबद्दल आई-बाबांना सांगू नकोस,” तर मुलांना आधीच समजावून ठेवा की ही धोक्याची घंटा असू शकते. बाहेर काहीही झालं तरी मुलांना सर्व तपशील घरी येऊन सांगण्याची सवय लावा.
लहान मुलांना शाळेचे नाव, घराचा पत्ता, मोबाईल नंबर आणि कुटुंबाशी जोडलेली काही वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीला कधीही न सांगायला शिकवा. जर कुणी हे तपशील विचारले तर मुलांना माहिती नाही असं सांगायला हवं.
जर मुलं चुकून रस्ता विसरलेच आणि त्यांना मदतीची गरज असेल तर त्यांनी पोलिस किंवा सुरक्षा गार्डकडून मदत मागावी. याव्यतिरिक्त कोणत्याही कुटुंबाकडे ते मदत मागू शकतात.
महाराष्ट्रातील हे ठिकाण दडलेला खजिनाच… पावसाळ्यात इथले दृष्य म्हणजे स्वर्गच! कुठे आहे ते जाणून घ्या
मुलांना सांगा की, जर त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका जाणवलाच तर शांत न बसता त्यांनी मदतीसाठी ओरडायला सुरुवात करावी किंवा सुरक्षित ठिकाणाकडे पळत स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करावा. या सर्वच सवयी मुलांना असुरक्षित परिस्थिती स्वत:ला सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.