स्मार्टफोनमुळे ब्रेन ट्यूमर होतो का? जाणून घेऊया याबद्दल असलेले गैरसमज आणि वास्तविकता
अनेकांचा असा समज असतो की स्मार्टफोनचा वापर केल्यामुळे ब्रेन ट्यूमर होऊ शकतो. मात्र, हा केवळ एक गैरसमज आहे. ब्रेन ट्यूमरबाबत अनेक गैरसमजूती समाजात पसरलेल्या आहेत, ज्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होते. या लेखाच्या माध्यमातून तज्ज्ञांनी ब्रेन ट्यूमरशी संबंधित गैरसमज दूर करत वेळेवर उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. ब्रेन स्ट्रोकसारख्या गंभीर आजारावर डॉ हरीश नाईक, न्यूरोसर्जन, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई, यांनी महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे.(फोटो सौजन्य – istock)
Brain Tumor: मेंदूचे आरोग्य आणि जीवनशैलीचा काय संबंध? काय आहे जोखीम
ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमध्ये किंवा मेंदूच्या आसपासच्या भागात पेशींची होणारी असामान्य वाढ. मात्र, ब्रेन ट्यूमरबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा, चुकीची माहिती आणि गैरसमजुती पसरलेल्या आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ब्रेन ट्यूमरचे निदान झाल्यास त्याच्या मनात लगेच या आजाराचे कारण काय असावे, असा प्रश्न निर्माण होतो. त्यातील सर्वात सामान्य प्रश्न म्हणजे, मोबाइल फोनच्या वापरामुळे हा आजार झाला असेल का?मात्र, हा एक गैरसमज असून तो दूर करणे आवश्यक आहे. याशिवाय ब्रेन ट्यूमर बाबत अनेक चुकीच्या समजुती अनेत व्यक्तींमध्ये तणावास कारणीभूत ठरतात. चला तर मग, या गैरसमजूतींमागील वास्तव जाणून घेऊया.
वास्तविकता : मोबाइल फोनचा नियमित वापर केल्यामुळे ब्रेन ट्यूमर होतो, असे सिद्ध करणारे कोणतेही संशोधन किंवा वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. दीर्घकाळ मोबाइल फोन वापरल्यामुळे डोळ्यांशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात, मात्र मोबाइल फोन आणि ब्रेन ट्यूमर यांचा थेट संबंध असल्याचे सिद्ध झालेले नाही.
वास्तविकता : मायक्रोवेव्ह ओव्हनमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गामुळे ब्रेन ट्यूमर होतो, असा अनेकांचा समज आहे. मात्र, या दाव्याला पुष्टी देणारे कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.
वास्तविकता : कृत्रिम गोड पदार्थांचा (Artificial Sweeteners) थेट संबंध ब्रेन ट्यूमरशी असल्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. मात्र, अशा पदार्थांचे अति सेवन केल्यास पोट फुगणे, अॅसिडिटी, आतड्यांतील जीवाणूंमध्ये होणारे बदल किंवा पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. त्यामुळे कृत्रिम गोड पदार्थांचे अति सेवन टाळून संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.
वास्तविकता : ब्रेन ट्यूमरचे निदान झाल्यानंतर घाबरण्याची गरज नाही. प्रत्येक ब्रेन ट्यूमर कर्करोगजन्य (Malignant) असतोच असे नाही. अनेक ब्रेन ट्यूमर सौम्य (Benign) स्वरूपाचे असतात आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरत नाहीत. मात्र, वेळीच निदान आणि उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
वास्तविकता : डोकेदुखी हे ब्रेन ट्यूमरचे एक सामान्य लक्षण असू शकते, पण प्रत्येक रुग्णाला डोकेदुखी होईलच असे नाही. काही रुग्णांमध्ये फिट्स येणे, स्वभावातील बदल, स्मरणशक्ती कमी होणे, दृष्टीदोष, बोलण्यात अडचणी किंवा इतर न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे प्रत्येक डोकेदुखीला ब्रेन ट्यूमरचे लक्षण समजणे चुकीचे आहे.
वास्तविकता : बदलत्या काळानुसार वैद्यकीय क्षेत्रात न्यूरोसर्जरी, न्यूरो-नॅव्हिगेशन, रेडिओथेरपी आणि वैयक्तिकृत उपचार पद्धतींमध्येही मोठी प्रगती झाली आहे. त्यामुळे ब्रेन ट्यूमर असलेल्या अनेक रुग्णांचे यशस्वीपणे उपचार करता येतात. योग्य वेळी निदान आणि उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे अर्थपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण जीवन जगू शकतो.
ब्रेन ट्यूमरबाबत अनेक गैरसमज समाजात पसरलेले आहेत. मात्र यामधील अफवा आणि अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. वेळीच निदान, योग्य उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोन याच्या मदतीने ब्रेन ट्यूमरवर प्रभावीपणे मात करता येऊ शकते.
Ans: सध्याच्या वैज्ञानिक माहितीनुसार स्मार्टफोन वापरामुळे थेट ब्रेन ट्यूमर होतो असे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. मोबाइलमधून निघणारी रेडिओफ्रिक्वेन्सी ऊर्जा आणि ब्रेन ट्यूमर याबाबत संशोधन सुरू आहे.
Ans: मोबाइल फोनमधून रेडिओफ्रिक्वेन्सी (RF) ऊर्जा बाहेर पडते. ही ऊर्जा नॉन-आयोनायझिंग रेडिएशन प्रकारातील असते, जी एक्स-रेसारखी डीएनएला थेट नुकसान करणारी मानली जात नाही.
Ans: सतत किंवा वाढत जाणारी डोकेदुखी, उलट्या, दृष्टीमध्ये बदल, झटके येणे, बोलण्यात अडचण, स्मरणशक्तीत बदल आणि तोल जाणे अशी लक्षणे दिसू शकतात.






