Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील 7 रहस्यमयी प्राचीन मंदिर ज्यांचे व धनी कोणी केले ते आजवर कुणाला कळू शकेल नाही; आजही आकर्षित करते यांचे रूप…

भारताची प्राचीन मंदिरे केवळ श्रद्धेची नव्हे तर गूढतेचीही प्रतीके आहेत. देशात आजही अशी काही मंदिरे आहेत ज्यांचे गूढ आजवर मानवाला उलगडलेले नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 05, 2025 | 08:23 AM
भारतातील 7 रहस्यमयी प्राचीन मंदिर ज्यांचे व धनी कोणी केले ते आजवर कुणाला कळू शकेल नाही; आजही आकर्षित करते यांचे रूप...

भारतातील 7 रहस्यमयी प्राचीन मंदिर ज्यांचे व धनी कोणी केले ते आजवर कुणाला कळू शकेल नाही; आजही आकर्षित करते यांचे रूप...

Follow Us
Close
Follow Us:

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध प्रांतात भिन्न भाषा, परंपरा आणि खाद्यसंस्कृती दिसून येते. तितकेच लोक धार्मिकतेनेही जोडलेले आहेत. देशभरातील अनेक मंदिरे ही केवळ श्रद्धेची नव्हे तर प्राचीन इतिहासाची आणि गूढतेची प्रतीके मानली जातात. घरातील ज्येष्ठ मंडळी सांगतात त्या कथांमध्येही या मंदिरांचा उल्लेख येतो. या मंदिरांच्या वास्तुकलेत, रचनेत आणि इतिहासात असे अनेक रहस्य दडलेले आहे, ज्यामुळे लोक थक्क होतात. पाहूया काही प्रमुख मंदिरे आणि त्यांच्याशी निगडित गुढता…

हिमालयाचे हृदय आणि मिनी तिबेट म्हणून संबोधले जाते भारतातील ‘हे’ राज्य; फोटोग्राफर आणि साहसप्रेमींसाठी स्वर्गच जणू

ज्वालामुखी मंदिर, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील कालीधार पर्वतावर वसलेले हे मंदिर ज्वाला देवीला अर्पण केलेले आहे. येथे धरतीच्या गर्भातून निघणाऱ्या नऊ प्रकारच्या ज्वाळा सतत प्रज्वलित असतात. या नऊ ज्वाळा देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक मानल्या जातात. आजपर्यंत विज्ञानालाही या ज्वाळांचे रहस्य उलगडता आलेले नाही.

केवडिया गुहा मंदिर

चट्टानांच्या मध्ये असलेले हे प्राचीन मंदिर पाहताना असे वाटते की ते मानवी हस्तकौशल्याने नव्हे तर निसर्गाच्या अद्भुत चमत्काराने निर्माण झाले आहे. त्याची रचना आणि गूढ आकार पाहून आश्चर्य वाटते.

लिंगराज मंदिर, भुवनेश्वर

ओडिशातील लिंगराज मंदिर हे शैव आणि वैष्णव दोन्ही परंपरेचे संगमस्थान मानले जाते. असे म्हटले जाते की या मंदिराच्या वरून पक्षी किंवा विमान जात नाहीत. या घटनेमागील कारण आजही अनुत्तरित आहे.

कैलास मंदिर, एलोरा

महाराष्ट्रातील एलोरा येथील कैलास मंदिर हे जगप्रसिद्ध रॉक-कट वास्तूंपैकी एक आहे. इथे कुठेही विटा किंवा चुन्याचा वापर नाही. असे मानले जाते की लाखो टन दगड कापून अत्यल्प काळात हा भव्य मंदिर संकुल उभारले गेले, जे मानवी क्षमतेच्या पलिकडचे कार्य वाटते.

अमरनाथ गुहा

हिमालयात वसलेली ही गुहा भगवान शंकराला समर्पित आहे. येथे नैसर्गिकरीत्या तयार होणारा बर्फाचा शिवलिंग भक्तांना दर्शन देतो. मानले जाते की हा शिवलिंग कोणत्याही मानवी प्रयत्नांनी नव्हे तर पूर्णपणे निसर्गाच्या प्रक्रियेतून निर्माण होतो.

शोर मंदिर, महाबलीपुरम

तामिळनाडूतील समुद्रकिनारी वसलेले शोर मंदिर हे प्राचीन स्थापत्याचे उदाहरण आहे. असा समज आहे की पूर्वी येथे सात मंदिरे होती, परंतु समुद्राने सहा मंदिरे गिळंकृत केली. 2004 मधील सुनामीनंतर समुद्राने काही जुन्या संरचना परत बाहेर आणल्या ज्यामुळे या कथेला अधिक बळ मिळाले.

7 तारखेला लागणार आहे चंद्र ग्रहण, या दिवशी सर्व मंदिर राहतील बंद; फक्त 4 मंदिरात ग्रहणाला केली जाते पूजा

मुंडेश्वरी मंदिर, बिहार

बिहारमधील कॅमूर जिल्ह्यातील मुंडेश्वरी मंदिर हे अत्यंत प्राचीन मानले जाते. येथे माता मुंडेश्वरीला रक्तहीन बलिदान दिले जाते अशी मान्यता आहे. पुजारी आईच्या चरणांशी चावलाचा स्पर्श करून बकऱ्यावर टाकतो, ज्यामुळे तो बकरा बेशुद्ध होतो. त्यानंतर पुन्हा चरणस्पर्श करून तेच चावल टाकल्यावर बकरा पुन्हा भानावर येतो. या मंदिराच्या बांधणीबाबत अद्याप ठोस माहिती उपलब्ध नाही.

ही मंदिरे केवळ उपासनेची स्थाने नसून, श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम आहेत. त्यांच्या गुढतेमुळेच आजही लाखो भाविक तिथे पोहोचतात आणि दैवी अनुभव घेतात.

Web Title: 7 mysterious ancient temples in india know how to visit travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 08:23 AM

Topics:  

  • temple
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

हिमालयाचे हृदय आणि मिनी तिबेट म्हणून संबोधले जाते भारतातील ‘हे’ राज्य; फोटोग्राफर आणि साहसप्रेमींसाठी स्वर्गच जणू
1

हिमालयाचे हृदय आणि मिनी तिबेट म्हणून संबोधले जाते भारतातील ‘हे’ राज्य; फोटोग्राफर आणि साहसप्रेमींसाठी स्वर्गच जणू

श्रद्धा की अंधश्रद्धा? इथे फेकलेल्या प्रसादाला छत्रीत पकडून केले जाते सेवन; हजारो भाविकांची गर्दी अन् गणपती पूजेचा Video Viral
2

श्रद्धा की अंधश्रद्धा? इथे फेकलेल्या प्रसादाला छत्रीत पकडून केले जाते सेवन; हजारो भाविकांची गर्दी अन् गणपती पूजेचा Video Viral

7 तारखेला लागणार आहे चंद्र ग्रहण, या दिवशी सर्व मंदिर राहतील बंद; फक्त 4 मंदिरात ग्रहणाला केली जाते पूजा
3

7 तारखेला लागणार आहे चंद्र ग्रहण, या दिवशी सर्व मंदिर राहतील बंद; फक्त 4 मंदिरात ग्रहणाला केली जाते पूजा

दक्षिण भारतातील ‘या’ प्रसिद्ध मंदिरांचा प्रसादच आहे दैवी आशीर्वाद; खाद्यसंस्कृतीही पाडते भुरळ, पाहा कोणते?
4

दक्षिण भारतातील ‘या’ प्रसिद्ध मंदिरांचा प्रसादच आहे दैवी आशीर्वाद; खाद्यसंस्कृतीही पाडते भुरळ, पाहा कोणते?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.