१५ दिवस नियमित चावून खा 'ही' हिरवीगार पाने, शरीरात कुजलेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच पेशींचे होईल रक्षण
कढीपत्त्याच्या पानांचे फायदे?
कढीपत्त्याच्या पानांचे कशा पद्धतीने सेवन करावे?
शरीर डिटॉक्स करण्यासाठी उपाय?
प्रत्येक स्वयंपाक घरात कढीपत्त्याच्या पानांचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जातो. जेवणात कढीपत्ता नसेल तर जेवणाची चव चांगली लागत नाही. कढीपत्त्याच्या पानांचा वापर जेवणाला फोडणी देण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले घटक लोह (Iron), कॅल्शियम, फॉस्फरस आणि विटामिन सी, ए, बी, ई इत्यादी अनेक घटक शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. कढीपत्त्याच्या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून बचाव करतात. आज आम्ही तुम्हाला सुप्रसिद्ध योगगुरू डॉ. हंसा योगेंद्र यांच्या मते, कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होते. या पानांमध्ये ‘बीटा-कॅरोटीन’ आणि प्रथिने इत्यादी अनेक घटक आढळून येतात. केसांची मूळ मजबूत करण्यासाठी कढीपत्त्याची पाने खावीत. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. याशिवाय केसांची मूळ सुद्धा मजबूत होण्यास मदत होते. सलग दोन ते तीन आठवडे कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा आणि केस गळती कमी होते.
गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठता इत्यादी समस्यांपासून त्रस्त असलेल्या लोकांनी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. कढीपत्त्याच्या पानांमध्ये असलेले पाचक एन्झाइम्स शारीरासाठी अतिशय उत्तम आहेत. दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. या सर्व समस्यांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे.
रक्तात जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. चेहऱ्यावर आलेले मुरूम, पिंपल्स आणि मोठे फोड कमी करण्यासाठी कढीपत्याची पाने चावून खावीत. कढीपत्त्यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला संसर्गापासून वाचवतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणतात. यासोबतच तुम्ही कढीपत्त्याच्या पानांची चटणी सुद्धा खाऊ शकता.
रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कढीपत्त्याची पाने चावून खावीत. कढीपत्त्याची पाने शरीरातील मेटाबॉलिझम वाढवून अतिरिक्त चरबी जाळून टाकतात. सकाळी उठल्यानंतर कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून त्यांचा रस काढून घ्या. कढीपत्याच्या पानांचा रस प्यायल्यानंतर कोमट पाणी प्यावे. १५ दिवस नियमित कढीपत्ता खाल्ल्यास शरीरात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील.






