अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला 'हा' पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब
मागील अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर आरोग्यासाठी केला जात आहे. त्यातील अतिशय प्रभावी औषध म्हणजे जेष्ठमध. जेष्ठमध अतिशय प्राचीन काळापासून वापरली जाणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या गोडसर मुळांपासून मिळणारा रस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. जेष्ठमध शरीरासाठी अतिशय थंड मानले जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी जेष्ठमध खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय घशातील कोरडेपणा, खवखव, खोकला किंवा कफ इत्यादी अनेक समस्यांवर जेष्ठमध रामबाण उपाय आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घशात वाढलेली खवखव दूर करण्यासाठी जेष्ठमधाचे सेवन करावे. या वनस्पतीची लहानशी काडी घेऊन सतत चघळत राहावी. यामुळे खोकला आणि सर्दी कमी होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)
जेष्ठमधाचा अनेक वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. जेष्ठमधाचा वापर करून तयार केलेला काढा प्यायल्यास शरीर निरोगी राहते. आयुर्वेदिक काढा प्यायल्यामुळे श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होते. याशिवाय दमा किंवा खोकलाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी जेष्ठमधाचे आवर्जून सेवन करावे. बाजारात जेष्ठमध काड्या किंवा पावडर सहज उपलब्ध होते. नाकामध्ये अडकलेली घाण, फुफ्फुसांच्या समस्या किंवा सतत घशात वाढलेली खवखव दूर करण्यासाठी जेष्ठमध खावे. यामुळे लगेच आराम मिळेल.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी जेष्ठमधाचे सेवन केले जाते. छातीत जळजळ, पोटात गुडगुड, उलट्या, मळमळ इत्यादी समस्या वाढू लागल्यास जेष्ठमध खावे. यामध्ये सौम्य रेचक गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय बद्धकोष्ठतेचा त्रास सुद्धा होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांमुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी जेष्ठमध खावे. जेष्ठमध आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठी सुद्धा गुणकारी आहे. केस गळती वाढू लागल्यास जेष्ठमध खावे.
बाजारामध्ये जेष्ठमध पावडर सहज उपलब्ध होते. सुकलेल्या काड्यांची पावडर तुम्ही दुधात मिक्स करून पिऊ शकता. याशिवाय जेष्ठमध मधासोबत सुद्धा घेतले जाते. घशात वाढलेली खवखव कमी करण्यासाठी जेष्ठमधाची बारीक काडी घेऊन सतत चघळत राहावी. याशिवाय तुम्ही काढा किंवा चूर्ण बनवून सेवन करू शकता. मात्र नियमित जेष्ठमध खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. जेष्ठमधाचा एक चमचा किंवा अर्धा चमचा शरीरासाठी पुरेसा आहे. जेष्ठमधातील दाहशामक, कफनाशक आणि पित्तशामक गुणधर्म शरीरासाठी प्रभावी ठरतात.
सर्दी झाल्यानंतर लवकर बरी होत नाही? नाक सतत वाहतं? मग ‘या’ काढ्याचे सेवन करून मिळेल त्वरित आराम
ज्येष्ठमध खाल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम?
जास्त प्रमाणात ज्येष्ठमधाचे सेवन केल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतात, जसे: उच्च रक्तदाब, पोटदुखी, सूज.
जेष्ठमध खाण्याचे फायदे?
ज्येष्ठमधातील दाहक-विरोधी गुणधर्म घसा खवखवणे, खोकला आणि सर्दीसाठी आरामदायी ठरतात. ज्येष्ठमध पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते.