सर्दी झाल्यानंतर लवकर बरी होत नाही? नाक सतत वाहतं? मग 'या' काढ्याचे सेवन करून मिळेल त्वरित आराम
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे थंड वातावरण झाले आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. थंड वातावरणामुळे सतत शिंका येणे, नाकातून पाणी येणे, घसा बसने किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात . साथीच्या आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. सतत सर्दी आणि खोकल्यामुळे काम करताना अनेकसुद्धा त्रास होतो. सर्दी, खोकला झाल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण तरीसुद्धा काही फरक दिसून येत नाही. गोळ्यांच्या सेवनामुळे सर्दी सुकण्याची जास्त शक्यता असते. सर्दी सुकल्यानंतर छातीमध्ये वेदना होणे, खोकला लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
पावसात थोडस भिजल्यानंतर सुद्धा लगेच सर्दी होते. सर्दी, खोकल्यानंतर अनेक लोक सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा इतर उपाय करून आराम मिळवावा. आज आम्ही तुम्हाला सर्दी, खोकल्याच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदिक काढा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या काढ्याचे नियमित सेवन केल्यास सर्दी, खोकला कमी होण्यासोबतच शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल. काढा प्यायल्यामुळे श्वसनमार्ग स्वच्छ होण्यास मदत होते आणि छातीत जमा झालेला कफ पडून जातो.
आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात एक ते दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात बारीक किसून घेतलेलं आलं टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर त्यात काळीमिरी आणि लवंग घालून व्यवस्थित उकळवून घ्या. काळीमीरीचे सेवन केल्यामुळे घसा मोकळा होतो. याशिवाय लवंगमध्ये असलेले आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म सर्दी, खोकल्यापासून कायमचा आराम मिळवून देतात. त्यानंतर त्यात दालचिनी पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. दालचिनीचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली थंडी कमी होते. तयार केलेल्या काढ्यामध्ये तुळशीची पाने आणि थोडासा गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करा. काढ्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून काढा गाळून घ्या.
सर्दी खोकल्यापासून लवकर आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे. शरीरात वाढलेली थंडी नियंत्रणात राहते. डोकेदुखी, अंगदुखी आणि नाक बंद होणे, ताप इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागल्यास काढ्याचे सेवन करावे. हा काढा आठवडाभर नियमित प्यायल्यास शरीरात साचून राहिलेली सर्व घाण बाहेर पडून जाईल.
खोकला म्हणजे काय?
खोकला ही एक नैसर्गिक क्रिया आहे, जी आपल्या शरीराला श्वसनमार्गातील (respiratory tract) त्रासदायक गोष्टी जसे की श्लेष्मा (phlegm), धूळ किंवा जंतूंपासून वाचवण्यासाठी मदत करते.
खोकल्याचे मुख्य प्रकार कोणते?
कोरडा खोकला यामध्ये कफ तयार होत नाही. ओला खोकला झाल्यानंतर शरीरात कफ तयार होतो.
खोकल्यासाठी घरगुती उपचार काय आहेत?
मध आणि आले एकत्र घेतल्याने खोकल्यापासून आराम मिळतो.वाफ घेतल्याने श्वसनमार्ग मोकळा होतो आणि कफ बाहेर पडतो.