हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्मृती इराणींच्या घरी तयार केले जाते 'हे' स्पेशल सूप
सततच्या धावपळीमध्ये महिला स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. सतत काम, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांची तयारी, घरातील काम इत्यादी अनेक गोष्टी पूर्ण करण्यात महिलांचा वेळ निघून जातो. पण कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांसोबतच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. हल्ली महिलांसुद्धा अनेक वेगवेगळ्या गंभीर आजारांची लागण होते. महिलांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होणे, ही अतिशय सामान्य समस्या आहे. शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहण्याची शक्यता असते. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार, १५ ते ४९ वयोगटातील ३० टक्के महिलांना रक्ताच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. पण सर्वच महिला या समस्येकडे कायमच दुर्लक्ष करतात. पण शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे सतत दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरते.(फोटो सौजन्य: Pinterest)
वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. मासिक पाळीतील बदल, मेनोपॉज किंवा हार्मोन्सच्या असंतुलनामुळे शरीराला हानी पोहचते. शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एक खास रेसिपी सांगितली आहे. शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शेअर केलेली सूपची रेसिपी सांगणार आहोत. या सूपचे महिनाभर नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील.
सूप तयार करण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये धुवून घेतलेली मसूर डाळ, शेवग्याच्या शेंगा, कांदा, आल्याचा तुकडा, टोमॅटो, शेंगदाणे घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरच्या ६ ते ७ शिट्ट्या काढून घ्या. कुकर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात शिजवून घेतलेले पदार्थ टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. मोठ्या टोपात तूप गरम करून त्यात लसूण टाकून तयार केलेले सूप आणि गरजेनुसार पाणी घालून सूपला व्यवस्थित उकळी काढा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तूप टाकल्यामुळे पदार्थाची चव वाढण्यासोबतच शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात.
महिलांच्या आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा अतिशय प्रभावी आहेत. यामध्ये असलेले घटक हाडांमध्ये वाढलेली कमजोरी, रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करतात. सूपमध्ये आयर्न, कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते. याशिवाय मसूर डाळ पचनासाठी अतिशय हलकी असते. यामध्ये असलेले घटक शरीराला प्रोटीन देतात. तसेच कांदा टोमॅटोचे रोजच्या आहारात नियमित सेवन करावे.
ॲनिमिया म्हणजे काय?
ॲनिमिया म्हणजे रक्तातील लाल रक्तपेशींची किंवा हिमोग्लोबिनची पातळी सामान्य पातळीपेक्षा कमी असणे.लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचे प्रथिन असते, जे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करते.
ॲनिमिया होण्याची कारणे काय आहेत?
शरीरात लोहाची कमतरता असल्यास ॲनिमिया होऊ शकतो. मासिक पाळी किंवा इतर कारणांमुळे जास्त रक्तस्त्राव झाल्यास ॲनिमिया होऊ शकतो.
ॲनिमियाचा उपचार कसा केला जातो?
ॲनिमियाचे कारण शोधून त्यावर उपचार केले जातात.लोहाची कमतरता असल्यास लोहाच्या गोळ्या किंवा इंजेक्शन दिले जातात.व्हिटॅमिन बी12 किंवा फॉलिक ऍसिडच्या कमतरतेमुळे ॲनिमिया असल्यास ते घटक दिले जातात.