ओटीपोटात जडपणा जाणवतो पण वेदना होत नाहीत? 'हे' उपाय करून मिळवा कायमचा आराम
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, मानसिक ताण, जंक फूडचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव, शारीरिक हालचालींची कमतरता, पाण्याचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.त्यामुळे कायमच शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा वजन वाढल्यानंतर ओटीपोट सुद्धा कायमच जाड वाटते. ओटीपोटात वेदना होत नाहीत, पण कायमच ओटीपोटात जडपणा जाणवू लागतो. महिलांच्या शरीरात सतत हार्मोनल बदल होत असतात. हार्मोन्स. अपचन आणि गॅसमुळे ओटीपोटात वेदना न होता जडपणा जाणवू लागतो. ही समस्या उद्भवल्यानंतर महिला कायमच दुर्लक्ष करतात. पण असे न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
Explainer: कफ सिरपमधील डायएथिलिन ग्लायकॉल नक्की काय आहे? यामुळे झाला 11 मुलांचा मृत्यू
पचनाची समस्या, मासिक पाळीतील त्रास किंवा पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे ओटीपोटात जडपणा जाणवतो. त्यामुळे आहारात तळलेले, मसालेदार,प्रोसेस्ड पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे पचनाच्या समस्या उद्भवू लागतात. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरातील विषारी घटक पोटात तसेच साचून राहतात, ज्यामुळे ओटीपोटात कायमच जडपणा आणि फुगल्यासारखे वाटते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेला वायू बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या पेयांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि आरोग्य सुधारेल. कोमट पाणी शरीरासाठी अमृतासमान मानले जाते. यामुळे पचनक्रिया सुधारते, शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात, गॅस कमी होण्यास मदत होते. पोटाला आलेली सूज कमी करण्यासाठी आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्यावे.
सकाळच्या नाश्त्यात ओट्स, दही, फळे, भाज्या किंवा सॅलड बनवून खावे. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यासाठी नियमित आवळा पावडर गरम पाण्यात टाकून प्यावी. तसेच आहारात तेलकट आणि मैदा असलेल्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. मैदा पोटामध्ये तसाच साचून राहतो, वजन वाढत जाते.
शरीर मजबूत आणि कायमच निरोगी ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामासोबतच योगासने, ध्यान करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. नियमित चालणे, प्राणायाम, पवनमुक्तासन आणि भुजंगासन इत्यादी आसन केल्यास शरीर निरोगी राहण्यासोबतच रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. योगासने केल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात करा अळशीच्या चटणीचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी
प्रत्येक महिन्यातील चार किंवा पाच दिवस सर्वच महिलांना मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये ओटीपोटात वेदना वाढू लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कायमच गरम पाण्याच्या पिशवीने शेक घ्यावा. यासोबतच आहारात खजूर, फळे, सुका मेवा इत्यादी पदार्थांचे नियमित सेवन करावे.