सर्दीला म्हणा गुडबाय! गरम पाण्याची वाफ घेताना पाण्यात टाका 'हे' बारीक दाणे
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे अस्वच्छता निर्माण होते. याशिवाय साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरू लागतात. साथीच्या आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत आणि नाजूक होऊन जाते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पावसात सतत भिजल्यानंतर सर्दी, खोकला किंवा ताप येण्याची शक्यता असते. सर्दी, खोकला झाल्यानंतर नाकातून सतत पाणी येणे, नाक झोंबणे, शिंका येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी अनेक लोक दुर्लक्ष करतात तर काही मेडिकलमधील गोळ्या औषध आणून खातात. पण हे उपाय कारण्याऐवजी घरगुती उपाय करून सर्दी, खोकल्यापासून आराम मिळवावा.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा ‘या’ हिरव्या पानांचे सेवन, आतड्यांमधील चिकटलेला मल पडून जाईल बाहेर
प्रत्येक स्वयंपाक घरात ओवा हा पदार्थ उपलब्ध असतोच. तिखट बारीक दाणे पोटात दुखल्यानंतर किंवा लहान मुलांच्या औषधात वापरून खाण्यास दिले जातात. ओव्यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. तसेच यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स सुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ओव्यामध्ये असलेले थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे वातावरण शुद्ध होण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ओव्याची वाफ घेतल्यास कोणते फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी,खोकला वाढू लागतो. अशावेळी कोणतेही इतर उपाय करण्याऐवजी ओव्याच्या पाण्याची वाफ घ्यावी. गरम पाण्यात दोन चमचा ओवा टाकून पाणी गरम करून घ्यावे. त्यानंतर पाण्याची ५ मिनिटं वाफ घेतल्यास छातीत सुकलेला कफ आणि खोकला कमी होण्यास मदत होईल. दिवसभरात ४ ते ५ वेळा ओव्याच्या पाण्याची वाफ घेतल्यास २ दिवसांमध्ये सर्दी खोकला कमी होईल आणि फरक दिसून येईल.
‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे बिघडू लागते डोळ्यांचे आरोग्य, दृष्टी कमी होऊन डोळे होतील कमजोर
आरोग्यासंबंधित इतरही समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याचा वापर करावा. यासाठी एक ग्लास पाण्यात कढीपत्ता, मनुका, साखर आणि ओवा घालून मिक्स करा. तयार केलेले पाणी टोपात ओतून गरम करून काढा तयार केला करा. तयार केलेला काढा दिवसभरातून दोन ते तीन वेळा प्यायल्यास मायग्रेनच्या वेदनांपासून आराम मिळेल. तसेच केसांच्या सर्वच समस्या दूर होतील.
सर्दी खोकला होण्याची कारणे?
सतत पावसात भिजणे, थंड पदार्थाचे सेवन किंवा तिखट तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे खोकला लागण्याची शक्यता असते.
खोकल्यासाठी सामान्य घरगुती उपचार:
हळदीमध्ये अँटीव्हायरल आणि उपचारात्मक गुणधर्म आहेत. कोमट हळदीचे दूध प्यायल्याने खोकला आणि सर्दी कमी होण्यास मदत होते. मध हा खोकल्यासाठी, विशेषतः मुलांमध्ये, काळानुसार चाचणी केलेला उपाय आहे. तो घसा खवखवणे कमी करू शकतो आणि जळजळ कमी करू शकतो. एक वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी, झोपण्यापूर्वी एक चमचा मध रात्रीच्या खोकल्यापासून आराम मिळवू शकतो.