सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा 'या' हिरव्या पानांचे सेवन
पूर्वीच्या काळी आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर आयुर्वेदिक पानांचे किंवा इतर वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जायचे.निर्सगातील वेगवेगळ्या वनस्पती, पाने, फुले आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक स्वतःच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देत नाहीत. आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव आणि अपुऱ्या झोपेमुळे शरीराची पचनक्रिया लगेच बिघडू लागते. शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात, ज्यामुळे पोटात दुखणे, बद्धकोष्ठता किंवा अपचनाची समस्या उद्भवू लागते. पचनक्रिया बिघडल्यानंतर वारंवार ऍसिडिटी होणे, गॅस होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सगळ्यावर प्रभावी पाने म्हणजे कडुलिंब.(फोटो सौजन्य – istock)
‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे बिघडू लागते डोळ्यांचे आरोग्य, दृष्टी कमी होऊन डोळे होतील कमजोर
कडुलिंबाच्या पानांचा वापर आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले घटक शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे नियमित दोन किंवा तीन कडुलिंबाची पाने चावून त्यावर गरम पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जाण्यास मदत होईल. याशिवाय शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस प्यावा. यामुळे शरीर डिटॉक्स होते. चला तर जाणून घेऊया कडुलिंबाच्या पानांचे फायदे.
रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस प्यावा. कडुलिंबाच्या पानांचा रस प्यायल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि शरीर सुधारण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही उपाशी पोटी कडुलिंबाची पाने चावून खाऊ शकता. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता नियंत्रणात राहील आणि रक्तातील साखर वाढणार नाही.
पोट फुगणे, बद्धकोष्ठता, अपचन किंवा गॅसची समस्या उद्भवू लागल्यास कडुलिंबाच्या पानांचे सेवन करावे. नियमित तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. विषारी घटक साचून राहिल्यामुळे पोटात घाण तशीच राहते, ज्यामुळे ऍसिडिटी किंवा गॅसची समस्या वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उपाशी पोटी २ कडुलिंबाची पाने चावून खावीत.
Uric Acid वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, दुर्लक्ष केल्यास उद्भवेल संधिवाताची समस्या
शरीर आतून डिटॉक्स करणे आवश्यक आहे. शरीरात साचलेल्या घाणीमुळे त्वचेवर पिंपल्स येणे, बारीक बारीक मुरूम किंवा फोड येऊ लागतात. यामुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि विचित्र दिसू लागते. त्वचा खराब झाल्यानंतर पुन्हा एकदा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी.
कडुलिंबाचे फायदे काय आहेत?
कडुलिंबाच्या तेलात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्याने ते त्वचेवरील ॲक्ने, खाज, लालसरपणा कमी करण्यास मदत करते. कडुलिंबाचा रस केसांना लावल्यास कोंडा कमी होतो, केसगळती थांबते आणि केस चमकदार होतात.
कडुलिंबाचे दुष्परिणाम काय आहेत?
मळमळ, उलट्या किंवा अतिसार.काही लोकांना त्वचेवर ऍलर्जी होऊ शकते.
कडुलिंबाबद्दल अधिक माहितीसाठी कोणाशी संपर्क साधावा?
तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी किंवा आयुर्वेदिक वैद्यांशी संपर्क साधू शकता. तसेच गरोदर माता किंवा मासिक पाळीच्या समस्येने त्रस्त असलेल्या महिलांनी कडुलिंब खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.