Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangalagaur 2026: मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे

नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्याच वर्षी मंगळागौर साजरा केली जाते. मंगळागौरीला सर्वच स्त्रिया उखाणे घेतात. गंमतीशीर उखाण्यांनी कार्यक्रमांची रंगत वाढेल. चला तर पाहुयात भन्नाट उखाणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 16, 2026 | 02:00 PM
मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे

मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे. हे सण केवळ धार्मिक पूजेसाठी नाहीतर तर उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी सुद्धा साजरा केले जातात. त्यातील नवविवाहात महिलांचा आवडता सण म्हणजे मंगळागौर. यादिवशी घरात देवीची पूजा करून पारंपरिक खेळ खेळले जातात. फुगड्या, भोंडला इतर नृत्य सादर करून आनंद व्यक्त केला जातो. याशिवाय नवविवाहित महिला सुंदर सुंदर उखाणे घेतात. पण कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा उखाणे पाठ वाचायला किंवा पाठ करायला जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही हे गंमतीशीर आणि सोपे उखाणे पाठ करू शकता. चला तर जाणून घेऊया.

मंगळागौरीला दिसेल पारंपरिक मराठमोळा लुक! साडी खरेदी करताना ‘या’ रंगांना द्या पसंती

सूर्यबिंबाचा कुमकुमतिलक, पृथ्वीच्या भाळी
…रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी

सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात,
…रावांचे नाव घेते, आता सोडा माझी वाट

सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे
….. रावांचे नाव घेते मंगळागौरी देवीच्या पुढे

जडवाचे मंगळसूत्र, सोन्याने मढविले
…रावांचे नाव घेण्यासाठी, इतके का अडविले

सुखसमाधान तिथे जिथे लक्ष्मीचा वास
मंगळगौरीच्या दिवशी देते….रावांना जिलबीचा घास

मंगळागौरीपुढे लावली समईची जोडी,
….रावांमुळे मला मिळाली जीवनाची अवीट गोडी

सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह
….रावांचे नाव घेण्यासाठी, नको मला आग्रह

मंगळागौरी माते, नमन करते तुला
….रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य लाभो मला

आंब्याच्या वनराईमध्ये कोकिळेचे गुंजन…
रावांचे नाव घेते आणि करते मंगळागौरीचे पूजन

गजाननाची कृपा, गुरूंचा आशिर्वाद
…रावांचे नाव घ्यायला मंगळागौरीच्या दिवशी करते सुरुवात

मंगळागौरीला पुजल्या आहेत सौळा पत्री
…रावांची मी आहे कुशल गृहमंत्री

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
मंगळागौरीच्या दिवशी…रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा
…रावांचे नाव घेऊन, आशिर्वाद मागते सौभाग्याचा

संसाराच्या सागरात प्रीतीच्या लाटा
….रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी
… चे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी

श्रावणात बरसतात सरींवर सरी,
मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी
…रावांची सखी मी बावरी

श्रावणात बरसल्या, धुंद जलधारा…
मंगळागौरीच्या दिवशी ….
रावांचे नाव घेते आणि फुलवते संसाराचा फुलोरा

मेघमल्हार बहरताच,
श्रावणसर कोसळते,
…रावांचे नाव घेऊन मंगळागौरीची पूजा करते

सासर आहे छान, सासू आहे हौशी
…. रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी

सोळा दिव्यांनी केली मंगळागौरीची आरती
…राव आहेत माझ्या संसाररथाचे सारथी

पानाफुलांनी सजवले मंगळागौरीसाठी मखर
…राव करतात नेहमीच माझ्यावर प्रेमाची पाखर

मंगळागौरीच्या पूजेला वाजतात टाळ आणि मृदंग,
—— रावांच्या सहवासात आहे संसाराचा खरा रंग

कपाळाला कुंकू आणि गळ्यात घातले मंगळसूत्र,
—— रावांच्या नावाने जपते सुखी संसाराचे सूत्र

नऊवारी साडीवर खुलून दिसतील ‘या’ पारंपरिक हेअरस्टाईल, सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी नक्की करा ट्राय

सासरी आणि माहेरी सर्वांचा मिळो प्रेमळ आशीर्वाद,
———–रावांच्या सोबतीने संसारात आहे गोड संवाद

मंगळागौरीचे खेळ खेळूया सगळेजण मिळून,
————— रावांचे नाव घेते सर्वांना मान देऊन

Web Title: Add more fun to mangala gauri celebrations with these funny ukhanas for married women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • festivals in shravan
  • LIFESTYLE
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

नागदेवतेच्या आशीर्वादाने लाभो सुख-समृद्धी…! श्रावणातील नागपंचमीच्या नातेवाईक आणि प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा
2

नागदेवतेच्या आशीर्वादाने लाभो सुख-समृद्धी…! श्रावणातील नागपंचमीच्या नातेवाईक आणि प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
3

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

सुंदर दिसणारी ही झाडे सापांना करतात आकर्षित, घराभोवती लावण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4

सुंदर दिसणारी ही झाडे सापांना करतात आकर्षित, घराभोवती लावण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.