महाराष्ट्रातील नऊवारी साडी भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये प्रसिद्ध आहे. पूर्वीच्या काळापासून चालत आलेली नऊवारी साडी नेसण्याची परंपरा अजूनही महिला फॉलो करत आहेत. नऊवारी साडीमध्ये पेशवाई, ब्राह्मणी, कोल्हापुरी, आणि मालवणी पद्धती आहे. सण, लग्न सोहळे किंवा इतर कार्यक्रमांच्या दिवशी नऊवारी साडी अतिशय आवडीने नेसली जाते. पण साडीवर नेमकी कशा पद्धतीने हेअर स्टाईल करावी, बऱ्याचदा सुचत नाही. त्यामुळे साडीवरील लुक खुलून दिसण्यासाठी या पारंपरिक आणि हटके हेअर स्टाईल नक्की ट्राय करा. (फोटो सौजन्य – pinterest)
नऊवारी साडीवर खुलून दिसतील 'या' पारंपरिक हेअरस्टाईल, सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी नक्की करा ट्राय

नऊवारी साडी नेसल्यानंतर त्यावर खोपा हेअर स्टाईल प्रामुख्याने केली जाते. खोपा बांधून त्यावर विविध रंगीत फुले किंवा हेअर पिन लावून सुंदर हेअर स्टाईल केली जाते.

बाजारात विविध डिझाईनचे हेअर पिन्स उपलब्ध आहेत. नऊवारी साडी नेसल्यानंतर त्यावर चंद्रकोर किंवा कमळाच्या फुलांचे हेअर पिन्स लावल्यास लुक पारंपरिक दिसेल.

स्त्रीच्या सौंदर्यात भर पाडण्याचे काम गजरा करतो. त्यामुळे साधी बन हेअर स्टाईल करून त्यावर दोन किंवा तीन गजरे घातल्यास लुक पारंपरिक आणि मराठमोळा दिसेल.

लग्नात हेवी मेकअप केल्यानंतर मेकअपला शोभेल अशी हेअर स्टाईल केली जाते. त्यामुळे या पद्धतीच्या हेअर स्टाईल तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.

सुंदर हेअर स्टाईल संपूर्ण लुकची शोभा वाढवते. त्यामुळे नऊवारी किंवा कोणत्याही पद्धतीमध्ये साडी नेसल्यानंतर त्यावर हेअर स्टाईल केल्यास चारचौघांमध्ये तुम्ही सुंदर दिसाल.






