घामामुळे शरीराची वाढलेली दुर्गंधी कमी करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात टाका 'ही' आयुर्वेदिक हिरवी पाने
सर्वच ऋतूंमध्ये त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागतात. कधी त्वचेवर होणारे इन्फेक्शन, पुरळ किंवा मुरुमांची समस्या उद्भवू लागते. याशिवाय वाढत्या उन्हात त्वचा अधिक काळीच होऊन जाते. तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक चिकट आणि तेलकट होऊन जाते. त्वचा चिकट झाल्यानंतर चेहऱ्यावर किंवा शरीरावर पिंपल्स येऊ लागतात. तर हिवाळ्यात त्वचा अधिक कोरडी पडते. त्वचा कोरडी किंवा चिकट झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. बॉडी वॉश, लोशन किंवा वेगवेगळ्या बॉडीसीरमचा वापर केला जातो. मात्र तरीसुद्धा त्वचा चमकदार दिसत नाहीत. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकल रसायनचा वापर करून बनवलेल्या प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावा.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेवर पिंपल्स, फोडं, ओपन पोर्स, चिकट त्वचा, तेलकट त्वचा इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात ही हिरवी पाने टाकावीत. नियमित अंग स्वच्छ ठेवण्यासाठी अंघोळ करणे गरजेचे आहे. अंघोळ केल्यामुळे शरीरासोबतच मन सुद्धा फ्रेश आणि स्वच्छ होते. शरीरात उष्णता वाढल्यानंतर अंगावर फोड किंवा मुरूम येऊ लागतात. त्वचेवर आलेले मुरूम कमी करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात ही हिरवी पाने टाकावीत. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होईल.
अंघोळ करताना प्रामुख्याने कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करावा. अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय अंगावर चिकटपणा कमी होतो. नियमित मिठाच्या पाण्याची अंघोळ केल्यामुळे शरीरासोबतच मन फ्रेश राहण्यास मदत होते. शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकावे.
आयुर्वेदामध्ये कडुलिंबाच्या पानांना विशेष महत्व आहे. अंघोळीच्या पाण्यात कडुलिंब टाकून अंघोळ केल्यास शरीरावर सर्व घाण निघून जाईल. त्वचेवर आलेले पिंपल्स, रॅश किंवा मुरूम घालवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात कडुलिंब टाकावा. यासाठी पाणी गरम करताना त्यात कडुलिंबाची पाने टाकून पाणी गरम करून घ्यावी. त्यानंतर ते पाणी अंघोळीसाठी वापरावे. या पानांमध्ये अँण्टीबॅक्टेरियल, अँण्टीऑक्सिडंट्स गुणधर्म आढळून येतात. नैसर्गिक गुणांनी समृद्ध असलेली कडुलिंबाची पाने शरीरासाठी फायदेशीर आहेत.
प्रोबायोटिकयुक्त दह्यात मिक्स करून खा ‘हे’ पदार्थ, शरीरात वाढलेला लठ्ठपणा होईल कायमचा कमी
अंघोळीच्या पाण्यात तुळशीची पाने टाकून अंघोळ केल्यास शरीर आणि मन स्वच्छ होईल. शरीरात साचलेले नकारात्मक विचार कमी होतील. त्वचेवर आलेले मुरुम, पिंपल्स किंवा रॅश कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा वावर करावा. तुळशीच्या पानांच्या वापरामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत होते.