प्रोबायोटिकयुक्त दह्यात मिक्स करून खा 'हे' पदार्थ
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. त्यात प्रामुख्याने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे दही. दही खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी ताक, दही किंवा नारळ पाण्याचे सेवन केले जाते. दह्यात हाय प्रोटीन आणि प्रोबायोटिक असतात. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना अनेक लोक वाटीभर दह्याचे नियमित सेवन करतात. दही खाल्यामुळे लवकर भूक लागत नाही. नियमित दह्याचे सेवन केल्यास शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी दह्याचे सेवन केले जात आहे.(फोटो सौजन्य – istock)
दह्यात असलेल्या घटकांमुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. जगभरात वाढलेल्या वजनाने आणि लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी दह्यात कोणते पदार्थ मिक्स करून खावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या नियमित सेवनामुळे महिनाभरात पोटावर वाढलेली चरबी कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल.
दही आणि काळीमिरी पावडर एकत्र मिक्स करून खाल्यास शरीराचे मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये असलेल्या घटकांमुळे आरोग्य सुधारते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात दही आणि काळीमिरी पावडर मिक्स करून तयार केलेल्या दह्याचे सेवन करावे. यामुळे पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होईल. याशिवाय पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दही काळीमीरीचे सेवन करावे. गॅस, ऍसिडिटी आणि अपचनाच्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दह्यात काळीमिरी टाकून खावे. यामुळे शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत होईल.
जिरे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. जिऱ्याचे सेवन केल्यामुळे पोटासंबंधित सर्वच समस्या दूर होतात. अनेक लोक सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करतात. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. त्यामुळे दुपारच्या जेवणात वाटीभर दही घेऊन तुम्ही त्यात जिऱ्याची पावडर मिक्स करून खाऊ शकता. यामुळे आतड्यांमधील घाण स्वच्छ होईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. दही आणि जिऱ्याचे सेवन पोटांमधील आतड्यांसाठी प्रभावी आहे.