Blood sugar राहील कायमच नियंत्रणात! भात शिजवताना घाला 'हे' पदार्थ
जगभरात मधुमेहासारख्या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते आणि शरीराला हानी पोहचते. बऱ्याचदा रक्तात वाढलेल्या साखरेमुळे शरीरातील कोणताही अवयव खराब होऊ शकतो. त्यामुळे आहारात कमीत कमी साखरेचे आणि गोड पदार्थांचे सेवन करावे. मधुमेह हा कधीही न बरा होणार आहे आजार आहे. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल,मानसिक तणाव, अपुरी झोप आणि पचनाच्या समस्येंमुळे शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण होते. बऱ्याचदा मधुमेह झाल्यानंतर भात खाऊ नये असे कायमच सांगितले जाते. कारण भातामध्ये फायबर कमी आणि ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असते, ज्यामुळे रक्तशर्करा झपाट्याने वाढून आरोग्याला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मधुमेह कायम नियंत्रणात ठेवण्यासाठी भात शिजवताना कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
मधुमेहाच्या रुग्णांनी भात शिजवताना जास्त पाण्याचा वापर करावा. भात शिजवताना जास्त पाणी घालावे. एक वाटी तांदूळ घेतल्यास त्यात सहा ते सात वाटी पाण्याचा वापर करावा. यामुळे भात पूर्णपणे मऊ शिजतो. भात जास्त वेळ शिजवल्यामुळे त्यातील स्टार्चचे प्रमाण कमी होऊन जाते. स्टार्च कमी झाल्यामुळे शरीरात ग्लुकोज हळूहळू तयार होते आणि रक्तातील साखर वाढत नाही. तसेच यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो आणि शिजवलेला भात सहज पचन होण्यास मदत होते. मऊ भात खाल्यामुळे पोटात ऍसिडिटी किंवा गॅस होत नाही.
भारतीय मसाल्यांचा वापर जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना केला जातो. भात शिजवताना त्यात चिमूटभर दालचिनी पावडर टाकून मिक्स करून घ्या. दालचिनीच्या सेवनामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि शरीराला कोणतेही तोटे होत नाही. दालचिनीमध्ये असलेले नैसर्गिक घटक शरीरात इन्सुलिनची पातळी झपाट्याने वाढवत नाहीत. याशिवाय शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते आणि शरीराला अनेक फायदे होतात. शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी दालचिनीचा वापर करावा.
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आहारात नियमित तुपाचे सेवन करावे. तूप खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि शरीर हायड्रेट राहते. भात शिजवताना त्यात एक चमचा तूप टाकल्यास भात अतिशय मऊ शिजतो आणि पचनक्रिया सुधारते. तूप टाकून बनवलेल्या भाताचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढण्याचा वेग पूर्णपणे कमी होऊन जातो. रक्तात साखर वाढत नाही. तुपाचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पोट भरल्यासारखे वाटते.
पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? ‘या’ पानांचे नियमित करा सेवन, आजीबाईच्या बटव्यातील जादुई उपाय
मधुमेहाची लक्षणे काय आहेत?
खूप तहान लागणे, वारंवार लघवी होणे, विशेषतः रात्री, अति थकवा येणे, प्रयत्न न करताही वजन कमी होणे, सतत इन्फेक्शन होणे, दृष्टी कमी होणे.
मधुमेह कशामुळे होतो?
स्वादुपिंडातून पुरेसे इन्सुलिन तयार न होणे. शरीर तयार केलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही.
मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो का?
सध्या मधुमेहावर पूर्णपणे इलाज नाही, पण योग्य व्यवस्थापनाने तो नियंत्रित करता येतो.