रक्तात इंचभरसुद्धा वाढणार नाही साखर! आहारात करा 'या' भाज्यांचा समावेश
मधुमेह झाल्यानंतर कायमच शरीराची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण मधुमेह कधीच बरा होत नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरातील कोणत्याही अवयवाला इजा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे रक्तातील साखर कायमच नियंत्रणात असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा चुकीच्या डाएट आणि जीवनशैलीतील बदलांमुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढते. रक्तात वाढलेल्या साखरेकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवावर जखमा होऊन शरीराचे नुकसान होते. आहारात खाल्ले जाणारे गोड पदार्थ थेट शरीरावर परिणाम करतात. याशिवाय बैठी जीवनशैली, झोपेची कमतरता, शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या भाज्यांचा आहारात समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
अनेकांना भाज्या खायला अजिबात आवडत नाही. पण रोजच्या आहारात नियमित भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा दोडक्याच्या भाजीचे सेवन करावे. यामुळे शरीरात नैसर्गिक इन्सुलिनचे घटक वाढतात आणि शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होत नाहीत. दोडक्याची भाजी सहज पचन होते. याशिवाय शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दोडक्याच्या भाजीचे सेवन करावे.
जेवणातील सर्वच पदार्थांमध्ये भरपूर कोथिंबीर टाकली जाते. लहान मुलांना कोथिंबीर खायला आवडत नाही. पण मुलांना कोणत्या ना कोणत्या पदार्थांमधून कोथिंबीर खाण्यास द्यावी. कोथिंबीर खाल्ल्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते, पचनसंस्था मजबूत राहण्यास मदत होते. शरीराला उज देण्यासाठी कोथिंबिरीची बारीक पाने अतिशय प्रभावी ठरतात.
रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवग्याच्या पानांचे सेवन करावे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा शेवग्याच्या पानांची भाजी बनवून खावी. याशिवाय सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात शेवग्याच्या पानांची पावडर मिक्स करून प्याल्यास शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. मधुमेह झाल्यानंतर डोळ्या औषधांसोबतच शेवग्याच्या पानांचे आणि इतरही घरगुती पदार्थांचे आहारात सेवन करावे.
मधुमेह कशामुळे होतो?
स्वादुपिंडातून इन्सुलिनचे उत्पादन कमी झाल्यास किंवा स्वादुपिंड तयार झालेले इन्सुलिन प्रभावीपणे वापरू शकत नसल्यास मधुमेहाचा त्रास होतो.
मधुमेहाचे प्रकार कोणते आहेत?
प्रकार १ मधुमेह, प्रकार २ मधुमेह, गरोदरपणातील मधुमेह (गरोदरपणात होणारा मधुमेह).
मधुमेह आणि हृदयविकार यांचा संबंध आहे का?
होय, मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे हृदय आणि रक्ताभिसरणाचे आजार होण्याचा धोका वाढतो.