‘शमी’ वनस्पतीला ‘शनी’ वनस्पती देखील म्हणतात. शमीचे रोप (Shani Dev) घरात लावल्याने सुख, समृद्धी, आणि विजय प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे. यासोबतच शनिदेवाच्या महादशापासूनही मुक्ती मिळते. वास्तुशास्त्रात शमी वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. ज्योतिष शास्त्रातही शमीची वनस्पती खूप चमत्कारिक असल्याचे म्हटले आहे. शमीचे फूलही भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. ज्या घरात शमीचे रोप असते. त्या घरावर भगवान शिवाच्या कृपेचा वर्षाव होतो.
हा उपाय करा
धार्मिक मान्यता आहे की, जर कुंडलीत (kundli) शनिशी संबंधित काही दोष असेल किंवा शनीच्या (Shani) कोणत्याही महादशाच्या प्रकोपाने तुम्हाला त्रास होत असेल तर घरात शमीचे रोप नक्कीच लावा आणि रोज त्याची पूजा (pooja) करा. यामुळे शनिदेवाचे दुःख नाहीसे होते. ज्योतिष शास्त्रानुसार जर घरातील एखाद्याच्या लग्नात विनाकारण उशीर होत असेल तर शमीचे रोप लावल्याने विवाहाची शक्यता निर्माण होते आणि त्याच्या प्रभावाने नातेसंबंध लवकर येऊ लागतात.
‘या’ राशींवर शनीची महादशा
शनिदेव (Shani) मकर राशीत वक्री आहेत. त्याच्यामुळे मकर, कुंभ आणि धनु राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे, तर मिथुन आणि तूळ राशीवर शनी ढैय्याचा प्रभाव आहे. या राशीच्या लोकांनी शनिदेवाचा प्रभाव कमी करण्यासाठी शमीचे रोप लावावे.
कुठे लावावे शमीचे रोप?
घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला शमीचे रोप लावावे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शमीचे रोप लावल्याने शनिदोष समाप्त होतो. भगवान शंकराची पूजा करताना शमीची फुले अर्पण केल्याने शिव प्रसन्न होतात आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात. असे म्हणतात की ज्यांच्यावर शिवाचा आशीर्वाद असतो. त्यांना शनिदेव त्रास देत नाहीत.