Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात नेत्रसेवेमध्ये परवडणाऱ्या उपचारांची तफावत! जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली सविस्तर माहिती

संशोधनानुसार अंधत्व आणि मध्यम किंवा तीव्र दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींपैकी सुमारे ८१ टक्‍के व्यक्ती ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत आणि यामध्ये मोतीबिंदू हे सर्वात मोठे कारण आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 23, 2026 | 03:40 PM
भारतात नेत्रसेवेमध्ये परवडणाऱ्या उपचारांची तफावत! जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली सविस्तर माहिती

भारतात नेत्रसेवेमध्ये परवडणाऱ्या उपचारांची तफावत! जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली सविस्तर माहिती

Follow Us
Close
Follow Us:

भारताने अंधत्व कमी करण्यात लक्षणीय यश मिळवले आहे, परंतु नेत्रसेवेमध्ये परवडणाऱ्या उपचारांची आणि उपलब्धतेची तफावत अजूनही आहे. त्यामुळे लाखो लोकांना दृष्टी गमावण्याचा धोका कायम आहे आणि सर्वांना समान उपचार मिळवून देणे हे पुढील मोठे आव्हान ठरत आहे जाणून घेऊयात भारतातील परवडणाऱ्या नेत्रसेवेचा मार्गदर्शक आराखडा डॉ. अरुण सिंघवी, एमडी आणि ग्रुप सीईओ, एएसजी आय हॉस्पिटल, यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Heat Stroke: वाढत्या उन्हाळ्यात कोणत्याही क्षणी हिट स्ट्रोकने जाईल जीव, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अशी घ्या काळजी

भारताने नेत्रसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. १९७६ मध्ये सुरू झालेला नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस अँड व्हिज्युअल इम्पेअरमेंट हा अंधत्व कमी करण्यासाठीचा जगातील पहिला सार्वजनिक निधीतून चालणारा राष्ट्रीय कार्यक्रम होता. या कार्यक्रमामुळे देशातील अंधत्वाचे प्रमाण १.४ टक्क्यांवरून २०१९ पर्यंत ०.३६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यश आले. पण, १.४ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात ही टक्केवारी कमी असली तरी त्याचा अर्थ अजूनही लाखो लोक दृष्टी गमावण्याच्या धोक्यात आहेत. याचे एक कारण म्हणजे अनेक लोक उपचाराचा खर्च जास्त येईल या भीतीने उपचार उशिरा घेतात किंवा टाळतात आणि अनेकदा उशीर होतो.

प्रौढांमधील बहुतेक दृष्टीदोष टाळता येण्यासारखे किंवा उपचारयोग्य असतानाही, आज आपल्या आरोग्य व्यवस्थेची खरी कसोटी ही केवळ वैद्यकीय क्षमता नसून चांगली नेत्रसेवा प्रत्येक भारतीयाला परवडणारी आहे का, हे आहे. उदाहरण म्हणून मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा विचार करूया, कारण मोतीबिंदूचा परिणाम मोठ्या लोकसंख्येवर होतो. एका डोळ्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा खर्च साधारणपणे १५,००० रुपयांपासून १,२०,००० रुपयांपेक्षा जास्त असू शकतो. हा खर्च रुग्णालय आणि वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानावर अवलंबून असतो. यामध्ये फॅकोइमल्सीफिकेशन, मायक्रोइन्सिजन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, फेम्टोसेकंड लेझर-असिस्टेड शस्त्रक्रिया, रोबोटिक शस्त्रक्रिया, प्रगत इंट्राओक्युलर लेन्स आणि क्वचित प्रसंगी वापरली जाणारी पारंपारिक एक्स्ट्राकॅप्सुलर कॅटरॅक्ट एक्स्ट्रॅक्शन यांसारख्या पर्यायांचा समावेश होतो. काही सरकारी योजनांअंतर्गत शस्त्रक्रिया “मोफत” असली तरी रुग्णांना प्रवास खर्च, औषधे, कामाचा तोटा आणि इतर संबंधित आजारांमुळे स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो. संशोधनानुसार इतर आजार, रुग्णालयात जास्त काळ राहणे आणि रुग्णालयापर्यंतचे जास्त अंतर या कारणांमुळे मोतीबिंदू उपचाराचा एकूण खर्च वाढतो. त्यामुळे परवडणाऱ्या उपचारांविषयी बोलताना केवळ शस्त्रक्रियेचा खर्च नव्हे, तर रुग्ण आणि त्याच्या कुटुंबावर होणारा एकूण आर्थिक परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे.

संशोधनानुसार अंधत्व आणि मध्यम किंवा तीव्र दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींपैकी सुमारे ८१ टक्‍के व्यक्ती ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत आणि यामध्ये मोतीबिंदू हे सर्वात मोठे कारण आहे. तसेच, योग्य काळजी घेतल्यास सुमारे ८० टक्‍के दृष्टीदोष टाळता येऊ शकतो आणि लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार शक्य आहेत. अंधत्वाचे प्रमाण सुमारे ०.२५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवून नेत्र ज्योती अभियान अंतर्गत आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ८.३ दशलक्षांहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

राज्य स्तरावरील अंधत्व नियंत्रण कार्यक्रम आणि मोतीबिंदूसाठी विशेष मोहिमा यांसोबतच आयुष्मान भारत पीएमजेएअवाय आरोग्य कव्हरमुळे नेत्रशस्त्रक्रियेसाठीची उपलब्धता वाढली आहे. हे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील कौतुकास्पद यश असले तरी परवडण्यातील तफावत अजूनही कायम आहे, विशेषतः ग्रामीण भागात ही समस्या अधिक जाणवते. तसेच, विम्याचे प्रत्यक्ष लोकसंख्येतील कव्हरेज हे सैद्धांतिक क्षमतेपेक्षा कमी आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना आजही उपचारांच्या वेळी थेट स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागतात.

खासगी नेत्रसेवेचे पहिले पाऊल म्हणजे उपचार लोकांच्या जवळ नेणे. भारताला लहान शहरांमध्ये कायमस्वरूपी, सुसज्ज नेत्रसेवा केंद्रांची गरज आहे, जी उच्च दर्जाचे उपचार स्थानिक लोकांना परवडणाऱ्या दरात देतील आणि मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी करतील. द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमध्ये अशा सुविधांमध्ये गुंतवणूक केल्यास लवकर निदान, वेळेवर उपचार आणि सातत्यपूर्ण सेवा यामध्ये मोठी सुधारणा होऊ शकते, ज्यामुळे टाळता येण्याजोगा दृष्टीदोष आणि अंधत्व रोखता येईल. शहरातील मोठ्या रुग्णालयांना उपकेंद्रे, आउटरीच क्लिनिक्स आणि टेली-ऑप्थॅल्मॉलॉजीशी जोडणाऱ्या ‘हब अँड स्पोक’ मॉडेलमुळे तपासणी, निदान आणि फॉलो-अप सेवा गाव आणि लहान शहरांपर्यंत पोहोचू शकतात, आणि फक्त शस्त्रक्रियेसाठी प्रवास करावा लागेल. यामुळे अप्रत्यक्ष खर्च कमी होईल आणि अंतर हा अडथळा असतानाही उत्तम नेत्रसेवा उपलब्ध होईल.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक गंभीर नेत्रसेवा पुरवठादाराने आयुष्मान भारत आणि संबंधित राज्य सरकारी योजनांच्या सूचीबद्धतेकडे आपल्या नियमित उपचारपद्धतीचा एक भाग म्हणून पाहिले पाहिजे. यासाठी रुग्णालयांकडे अशी अंतर्गत पथके असणे आवश्यक आहे, ज्यांना कागदपत्रे, पूर्व-अधिकृतीकरण आणि दाव्यांची प्रक्रिया उत्तमरित्या समजते. यामुळे रुग्ण आणि रुग्णालय या दोघांसाठीही ही प्रक्रिया सुलभ आणि अडथळामुक्त होईल. जेव्हा परताव्याचे दर योग्य आणि निश्चित असतात, तेव्हा रुग्णालये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परवडणारी पॅकेजेस आत्मविश्वासाने देऊ शकतात.

खासगी नेत्रसेवा क्षेत्राने मनुष्यबळ प्रशिक्षणातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ऑप्टोमेट्रिस्ट, व्हिजन टेक्निशियन आणि समुपदेशक हे परवडणाऱ्या नेत्रसेवेचा कणा आहेत. कामाचे योग्य विभाजन केल्यास सर्जन आपल्या तज्ज्ञतेवर लक्ष केंद्रित करू शकतात, तर प्रशिक्षित टीम इतर कामे जसे की रिफ्रॅक्शन (चष्म्याचा नंबर तपासणे), प्राथमिक निदान, लेन्स पर्यायांबाबत मार्गदर्शन आणि शस्त्रक्रियेनंतरचा फॉलो-अप यांसारख्या गोष्टी हाताळू शकतात. यामुळे उत्पादकता सुधारते, रुग्णांचा प्रतीक्षा काळ कमी होतो आणि प्रत्येक रुग्णावरील उपचारांचा एकूण खर्चही कमी होतो.

नेत्रसेवा पुरवठादारांनी नैतिक आणि पारदर्शक क्रॉस-सब्सिडी मॉडेल्सही विकसित करणे आवश्यक आहे. प्रगत इंट्राओक्युलर लेन्स किंवा लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांसारख्या प्रीमियम सेवांमधून मिळणारा महसूल खरोखरंच गरजू रुग्णांसाठी कमी खर्चात किंवा मोफत शस्त्रक्रिया करण्यास मदत करू शकतो, मात्र याबाबत स्पष्ट माहिती देणे आणि काटेकोर तपासणी करणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात चिकन खावे की मटण? कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढते उष्णता, जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत

स्केल, कार्यक्षमता आणि नवकल्पनांसोबतच, खासगी नेत्रसेवा क्षेत्राने रुग्णांमध्ये जागरूकता वाढवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा लोकांना कळते की मोतीबिंदू पूर्णपणे बरा होऊ शकतो, सरकारी योजना आणि विमा उपलब्ध आहेत, आणि शस्त्रक्रिया जलद व सुरक्षित आहे, तेव्हा ते लवकर उपचार घेतात. मोठ्या प्रमाणावर तपासणी शिबिरे, शालेय नेत्रतपासणी कार्यक्रम आणि नियोक्ता, सहकारी संस्था व पंचायत यांच्यासोबत भागीदारी करून उपचारातील अंतर कमी करता येऊ शकते. आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की, कोणालाही आपली दृष्टी आणि बचत यांमधून निवड करावी लागू नये आणि स्पष्ट दिसणे नेहमीच योग्य खर्चात उपलब्ध असेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी काय खावे?

    Ans: पालक, मेथी, शेपू यांसारख्या हिरव्या पालेभाज्या, तेलकट मासे, बदाम, शेंगदाणे, तांबे युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

  • Que: डिजिटल उपकरणांमुळे (स्क्रीन) डोळ्यांचे संरक्षण कसे करावे?

    Ans: दर २० मिनिटांनी, २० फूट दूर असलेल्या वस्तूवर २० सेकंद पहा.

  • Que: डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणती योगासने करावीत?

    Ans: भ्रामरी प्राणायाम (गुंजारव श्वास) - डोळ्यांचा दाब कमी करतो, सर्वांगासन - डोळ्यांकडील रक्ताभिसरण सुधारते.

Web Title: Affordable treatment gap in eye care in india know the detailed information given by the experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • eye care
  • eye infection
  • eyes health

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.