वाढत्या उन्हाळ्यात कोणत्याही क्षणी हिट स्ट्रोकने जाईल जीव, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अशी घ्या काळजी
हिट स्ट्रोक म्हणजे काय?
हिट स्ट्रोक येण्याची कारणे?
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे?
राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कुठेही बाहेर जाण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. कारण कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर डोकेदुखी, उलट्या, मळमळ होण्याची जास्त शक्यता असते. तर काहीवेळा डिहायड्रेशन होऊन वारंवार चक्कर येते. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडून जाते. यामुळे शरीरात कोरडेपणा जाणवू लागतो. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. शरीराच्या तापमानात वाढ झाल्यानंतर कोणत्याही क्षणी हिट स्ट्रोक येऊन मृत्यू होऊ शकतो. हिट स्ट्रोक येणे ही अतिशय गंभीर स्थिती आहे. यामध्ये शरीराचे तापमान अचानक वाढते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास कोणत्याही क्षणी जीव जाऊ शकतो. चला तर जाणून हिट स्ट्रोकची लक्षणे आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)
डायबीटीज कंट्रोलमध्ये नाही ! शुगर कमी करण्यासाठी रोज कितीवेळ चालावं ?
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काहीवेळा शरीराचे तापमान झपाट्याने वाढते आणि शरीर थंड करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. हिट स्ट्रोक आल्यानंतर सगळ्यात आधी मेंदू, हृदय आणि किडनी यांसारख्या अतिमहत्वाच्या अवयवांवर लगेच परिणाम होतो. तसेच शरीरात वाढलेल्या तापमानामुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान होते. गोंधळ, झटके येणे, कोमा किंवा मानसिक नियंत्रण हरवणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसू लागतात. शरीर थंड ठेवण्यासाठी हृदयाला जास्तीचे काम करावे लागते, ज्यामुळे हृदयाच्या पेशी कमकुवत होऊन जातात.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सुती आणि आरामदायी कपडे परिधान करावेत. सुती कपडे घातल्यामुळे हवा खेळती राहते आणि गरम होत नाही. उन्हात कुठेही बाहेर फिरायला जाताना सोबत पाण्याची बाटली, टोपी, सनग्लासेस वापरावे. याशिवाय त्वचेच्या रक्षणासाठी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते. दिवसभरातील अतिउष्णतेच्या वेळी शारीरिक कष्टाची कामे करू नयेत.
Ans: उष्माघात ही शरीरातील उष्णता नियंत्रणाबाहेर गेल्याने निर्माण होणारी गंभीर स्थिती आहे.
Ans: तीव्र डोकेदुखी आणि चक्कर येणे, त्वचा गरम आणि कोरडी होणे.
Ans: अति उष्ण आणि दमट हवामानात जास्त वेळ राहणे, कडक उन्हात शारीरिक कष्टाची कामे करणे.






