मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे
जगभरात वेगवेगळ्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झालाय आहे. त्यातील अतिशय गंभीर आणि धोकादायक आजार म्हणजे मधुमेह. जंगबहारत अनेक लोक मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. रक्तात साखर वाढल्यानंतर शरीराच्या इतर अवयवांना मोठ्या प्रमाणावर इजा होते. त्यामुळे शरीरात मधुमेहाची लक्षणे दिसू लागताच, तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घेणे आवश्यक आहे. याशिवाय मधुमेह झाल्यानंतर आहारात पथ्य करण्याचा सल्ला दिला जातो. कमी गोड, भात किंवा जंक फूडचे सेवन केल्यामुळे रक्तात साखर वाढते आणि आरोग्य बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मधुमेह झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास डोळ्यांच्या दृष्टीवर गंभीर परिणाम दिसून येतात. यामुळे दृष्टी कमकुवत होणे, डोळ्यांना धूसर दिसणे, अचानक कमी दिसणे इत्यादी अनेक लक्षणाइ शरीरात दिसू लागतात. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने मधुमेहाची चाचणी करून योग्य औषध उपचार घेणे आवश्यक आहे.
रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. दिवसभर आराम केल्यानंतर सुद्धा रात्रीच्या वेळी शरीरात थकवा जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.शरीरात दिसणारी ही लक्षणे मधुमेहाचे गंभीर संकेत आहेत. शरीरात ग्लूकोज योग्य प्रकारे पोहचत नसल्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होऊन जाते. त्यामुळे काम करताना सतत अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो.
कोलेस्ट्रॉलने भरलेल्या रक्तवाहिन्या कायमच्या होतील स्वच्छ! नियमित खा ‘ही’ फळे, हृदय राहील मजबूत
मधुमेहाच्या रुग्णांनी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. कारण मधुमेहाच्या रुग्णांना जखम झाल्यानंतर ती लवकर बरी होत नाही. या जखमा आणखीनच मोठ्या होऊन जातात. याशिवाय जखम झालेला अवयव काढून टाकावा लागतो. त्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. मधुमेह झालेल्या रुग्णांना वारंवार तहान सुद्धा लागते. वारंवार लघवीला जाऊन शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि वारंवार तहान लागते. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
मधुमेह म्हणजे काय?
मधुमेह ही एक चयापचय स्थिती आहे, ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी सामान्य पेक्षा जास्त असते. शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार न झाल्यामुळे किंवा तयार झालेल्या इन्सुलिनचा योग्य वापर न झाल्यामुळे असे होते. इन्सुलिन एक हार्मोन आहे, जे रक्तातील साखर पेशींमध्ये प्रवेश करण्यास मदत करते.
मधुमेहाचे मुख्य प्रकार कोणते?
टाइप 1 मधुमेह: या प्रकारात, शरीरात इन्सुलिन तयार होत नाही.
टाइप 2 मधुमेह: या प्रकारात, शरीर इन्सुलिन तयार करते, परंतु त्याचा योग्य वापर करू शकत नाही.
गर्भावस्थेतील मधुमेह :काही महिलांना गर्भधारणेदरम्यान रक्तातील साखरेची पातळी वाढते.
मधुमेहाचे निदान कसे केले जाते?
उपलब्ध असलेल्या रक्तातील साखरेच्या चाचण्यांद्वारे मधुमेहाचे निदान केले जाते, जसे की उपवासाची रक्तातील साखर (fasting blood sugar), जेवणानंतरची रक्तातील साखर, आणि HbA1c चाचणी.