दैनंदिन आयुष्यातील 'या' चुकीच्या सवयींमध्ये वेळीच करा बदल
सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात निरोगी आणि उत्साही करण्यासाठी सगळ्यात आधी उपाशी पोटी पाण्याचे सेवन केले जाते. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि पोट स्वच्छ होत. याशिवाय अनेकांना सकाळी लघवीला जावे. ही अतिशय सामान्य घटनाअसली तरी सुद्धा अनेकांना सकाळी उठल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. दिवसभरात खूप कमी प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात.(फोटो सौजन्य – istock)
कोलेस्ट्रॉलने भरलेल्या रक्तवाहिन्या कायमच्या होतील स्वच्छ! नियमित खा ‘ही’ फळे, हृदय राहील मजबूत
धावपळीच्या जीवनशैलीमुळे लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध इत्यादी सर्वच आरोग्यासंबंधित समस्येने त्रस्त आहेत. आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल इत्यादी आजारांची शरीराला लागण होण्याची जास्त शक्यता असते. जीवनशैलीतील चुकीच्या सवयी आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. पाण्याचे कमी सेवन केल्यामुळे लघवी करताना जळजळ होणे, वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला निरोगी आरोग्यासाठी कोणत्या सवयींमध्ये बदल करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या सवयी शरीरासाठी अतिशय घातक ठरतात.
तुम्हाला जर वारंवार लघवीला होत असेल तर पाणी पिण्याच्या प्रमाणावर योग्य लक्ष द्यावे. कमी प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे नियमित भरपूर पाणी प्यावे. दिवसभरातून दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच पाणी पिताना हळूहळू पाण्याचे सेवन करावे. रात्री झोपण्याच्या ३ तास आधी पाण्याचे सेवन अजिबात करू नका, पाण्याचे सेवन केल्यास रात्री अधूनमधून उठावे लागेल.
कॉफी, चहा, कोल्ड्रिंक्स, अल्कोहोल, मसालेदार अन्न, लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो आणि चॉकलेट इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. साखर युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात नकारात्मक बदल दिसून येतात. त्यामुळे नियमित पौष्टिक आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
वारंवार लघवीची समस्या कमी करण्यासाठी नियमित व्यायाम किंवा योगासने करावेत. योगासने आणि व्यायाम केल्यामुळे पेल्विक फ्लोर स्नायूंना ताकद मिळते, ज्यामुळे लघवीवर नियंत्रण राहते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित ५ किंवा १० मिनिटं व्यायाम करावा. ज्यामुळे शरीरातसकारात्मक बदल दिसून येतील. लघवीला आल्यानंतर ती थांबवल्यास मुत्राशयासंबंधित समस्या उद्भवू लागतात.
वाढलेले वजन किंवा वजन वाढवणाऱ्या लोकांमध्ये लघवीसंबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. यामुळे पोटाचा दाब मूत्राशयावर पडतो आणि वारंवार लघवीला जावे लागते. त्यामुळे वाढलेल्या वजनावर नियंत्रण असणे अतिशय महत्वाचे आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित योगासने किंवा व्यायाम करावा.