Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हात पोटात वाढलेल्या जळजळमुळे आंबट ढेकर येतात? तात्काळ आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी थंड पेयांचे आणि आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात आणि पचनक्रिया सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 13, 2026 | 05:30 AM
उन्हात पोटात वाढलेल्या जळजळमुळे आंबट ढेकर येतात? तात्काळ आराम मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

उन्हात पोटात वाढलेल्या जळजळमुळे आंबट ढेकर येतात? तात्काळ आराम मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

पोटात जळजळ वाढण्याची कारणे?
उन्हाळ्यात शरीराची काळजी कशा प्रकारे घ्यावी?
पित्त नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय?

उन्हाळा सुरुवात झाल्यानंतर मानवी शरीरात असंख्य बदल जाणवू लागतात. शरीरात होणाऱ्या या बदलांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. उन्हाचा पारा वाढल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर थकवा, अशक्तपणा वाढतो आणि आरोग्य बिघडून जाते. या दिवसांमध्ये खूप जास्त घाम येणे. डिहायड्रेशन, पाण्याची कमतरता, अचानक चक्कर येणे, उन्हामुळे पोटात जळजळ होणे यांसारख्या बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. पोटात जळजळ वाढल्यानंतर अस्वस्थपणा वाढू लागतो आणि ऍसिडिटीचे प्रमाण वाढते. शरीरात वाढलेल्या ऍसिडिटीमुळे डोकेदुखी, मळमळ, अपचन तर काहीवेळा उलट्या सुद्धा होतात. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे ते पोटाच्या विरुद्ध दिशेला येतात, ज्यामुळे अन्ननलिकेमध्ये पित्त वाढते.(फोटो सौजन्य – istock)

वाढता उच्च रक्तदाब Kidney करून टाकेल कायमची निकामी! विषारी घटक नैसर्गिकरित्या फिल्टर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तिखट आणि अतिमसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जळजळ होते. तिखट पदार्थ लवकर पचन होत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात चिकन, मटण आणि अतितिखट पदार्थांचे अजिबात सेवन करू नका. हे पदार्थ शरीराला हानी पोहचवतात. छातीत किंवा पोटात वाढलेल्या जळजळमुळे कोणतेही पदार्थ खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ खाल्ल्यामुळे पोटातील जळजळ कमी होते आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळतो. चला तर जाणून घेऊया.

आयुर्वेदानुसार, पोट आणि छातीमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी शतावरी, शंख भस्म आणि ज्येष्ठमध इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय संतुलित अन्नपदार्थांच्या सेवनामुळे पोटातील अग्नी शांत होते. शरीरात वाढलेल्या पित्तामुळे पोटात जळजळ, आंबट ढेकर, डोकं जड वाटणे किंवा डोळ्यांमध्ये जळजळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे आणि पेयांचे सेवन करावे. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते.

रात्रीच्या वेळी उशिरा जेवण, कोणत्याही वेळ तिखट तेलकट पदार्थ खाणे, तळलेले पदार्थ खाणे, जास्त चहा किंवा कॉफी पिणे, जास्त स्ट्रेस आणि जास्त वेळ उपाशीपोटी राहिल्यामुळे पोटात पित्त वाढते. शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी शतावरी आणि शंखभस्मचे एकत्र सेवन करावे. यामुळे पोटात थंडावा येतो आणि शांत वाटते. तसेच पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही ज्येष्ठमध आणि खडी साखर एकत्र मिक्स करून खाऊ शकता. यामुळे पोटातील उष्णता शांत होऊन घशा जवळील जळजळ थांबेल.

पोटात वाढलेल्या गॅसमुळे आतडयांना हानी पोहचते? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, तात्काळ मिळेल आराम

पित्ताच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी संध्याकाळी ७ वाजण्याच्या आतमध्ये जेवण करावे. जेवण आणि झोपण्याच्या आधी ३ तासांपेक्षा जास्त अंतर असावे. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होते. सतत आंबट ढेकर येत असतील तर पोटाला थंडावा देण्यासाठी सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया निरोगी आणि सुरळीत राहते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऍसिडिटीची मुख्य लक्षणे कोणती?

    Ans: छाती आणि पोटात जळजळ, अस्वस्थता आणि वारंवार ढेकर येणे.

  • Que: ऍसिडिटीवर त्वरित घरगुती उपाय काय आहेत?

    Ans: एक ग्लास थंड दूध प्यायल्याने जळजळ कमी होते, जेवणानंतर बडीशेप चावल्याने पचन सुधारते.

  • Que: कोणते पदार्थ टाळावेत?

    Ans: जास्त मसालेदार आणि तेलकट अन्न, लिंबूवर्गीय फळे

Web Title: Sour belching due to increased inflammation in the stomach in the sun do these home remedies to get immediate relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • acidity
  • gas home remedies
  • Health Care Tips
  • summer heat

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
3

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
4

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.