डाळिंब सोल्यानंतर साल फेकून न देता 'या' प्रकारे करा वापर
त्वचेचे सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. स्किन केअर, महागड्या ट्रीटमेंट आणि इतरही अनेक उपाय केले जातात. मात्र तरीसुद्धा त्वचा चमकदार आणि सुंदर होत नाही. वाढत्या वयात त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्वचेवरील तारुण्य कमी होऊन चेहऱ्यावर सतत सुरकुत्या येणे, त्वचा निस्तेज दिसणे किंवा चेहऱ्यावर वांग येऊ लागतात. त्वचा आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. त्यात अतिशय आवडीने खाल्ले जाणारे फळ म्हणजे डाळिंब. डाळिंबाचे सेवन केल्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते आणि शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. लाल चुटुक डाळिंबाचे दाणे आरोग्य आणि त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहेत. डाळिंब खाल्ल्यानंतर डाळिंबाच्या साली फेकून दिल्या जातात. मात्र या सालींमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेवर येईल काचेसारखी चमक! वाटीभर खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, घरगुती उपाय ठरेल प्रभावी
धूळ, माती, प्रदूषण आणि अपचनामुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि तेलकट होऊन जाते. तेलकट झालेल्या त्वचेवर लगेच पिंपल्स किंवा ऍक्ने येतात. त्यामुळे सुंदर त्वचेची पूर्णपणे वाट लागून जाते. अशावेळी कोणत्याही हानिकारक केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डाळिंबाच्या सालीचा वापर कसा करावा? यामुळे त्वचेला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
डाळिंब सोलून झाल्यानंतर डाळिंबाच्या उरलेल्या साली कडक उन्हात व्यवस्थित सुकवून घ्याव्यात. या साली सुकल्यानंतर कडक होतील. मिक्सरच्या भांड्यात डाळिंबाच्या सुकलेल्या साली टाकून बारीक पावडर तयार करून घ्या. डाळिंबाच्या सालींची गुलाबी पावडर तयार होईल. डाळिंबाच्या सालीच्या पावडरमध्ये गुलाब पाणी टाकून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण त्वचेवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेवर वाढलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होईल.
Eye Care: पावसाळ्यात सर्वाधिक धोका डोळ्यांना, इन्फेक्शन न होण्यासाठी वेळीच घ्या काळजी; सोप्या टिप्स
डाळिंबाच्या सालींमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. यामुळे त्वचेवर वाढलेले पिंपल्स आणि मुरूम कमी होण्यास मदत होते. कमी वयात त्वचेवर वाढलेला कोरडेपणा, टॅनिंग आणि इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी डाळिंबाच्या सालीचा वापर करावा. डाळिंबाच्या सालीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेमधील घट्टपणा कायम टिकवून ठेवतात. तसेच त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. त्वचेवर वाढलेले काळे डाग आणि पिंपल्स घालवण्यासाठी डाळिंबाच्या सालींचा फेसपॅक बनवून लावावा.