पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? (फोटो-istockphoto)
सध्या देशभरात पाऊस सुरु झाला आहे. संपूर्ण देश मान्सूनने व्यापला आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी अनेक भागात शिरले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान पावसाळ्यात आपल्याला अनेक आजार होण्याचा देखील धोका असतो. पावसाळ्यामध्ये डोळ्यांची देखील काळजी घेणे आवश्यक असते. डोळ्यांमध्ये खाज सुटणे किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. कधी कधी आपण पावसात भिजतो, त्यामुळे आजारपण येण्याची शक्यता असते.
पावसाच्या पाण्यात असणारे किटाणू, धूळ हे डोळ्यांसाठी हानिकारक असू शकते. आद्रतेमुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकते. त्यामुळे आज आपण डोळ्यांना खाज सुटू नये किंवा पावसाच्या पाण्याने डोळ्यांना इन्फेक्शन होऊ नये यासाठी कोणते उपाय करावेत हे पाहणार आहोत. त्या उपायांच्या आधारे तुम्ही डोळ्यांची निगा राखू शकता.
डोळ्यांची काळजी कशाप्रकारे घ्यावी
पावसाळ्यात डोळ्यांची निगा राखणे आवश्यक असते. त्यासाठीच्या टिप्स जाणून घेऊयात.
पावसाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते. नाहीतर तुम्हला इन्फेक्शनच्या समस्येला तोंड द्यायला लागू शकते. पावसात बाहेर जात असताना छत्री किंवा रेनकोट घेऊन जावे. डोळ्यांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. तसेच डोळ्यांना वारंवार चोळणे किंवा हात लावणे देखील शक्यतो टाळावे.
स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत
पावसाच्या पाण्याने डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यात असणारे किटाणू किंवा धूळ यामुळे डोळ्यांना खाज सुटण्याची शक्यत असते. जर का तुम्ही पावसात भिजून आला असेल तर तुम्ही गार पाण्याने डोळे धुवू शकता. तसेच गुलाब पाण्याचा देखील तुम्ही वापर करू शकता.
डोळ्यांची तपासणी
पावसाळ्यात अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार पसरू शकतात. त्याचा परिणाम डोळ्यांना देखील जाणवू शकतो. त्यामुळे असा काही त्रास जाणवत असल्यास किंवा काही कालावधी नंतर नियमितपणे डोळ्यांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.
स्क्रीन टाइम
आजकाल आपली सर्व कामे लॅपटॉप, मोबाईलद्वारे पूर्ण होतात. दिवसातला बराचसा वेळ आपला स्क्रीन पाहण्यात जातो. त्यामुळे जितके शक्य असेल तितके स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न करावा.
टीप: आम्ही दिलेला लेख हा उपलब्ध माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घावा.