त्वचेवर येईल काचेसारखी चमक! वाटीभर खोबरेल तेलात मिक्स करा 'हा' पदार्थ
सर्वच महिलांना चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक वेगवेगळ्या उपाय केले जातात. कधी स्किन केअर प्रॉडक्टमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम्स लावल्या जातात. मात्र त्वचेची काळजी घेताना त्वचेला सूट होईल असेच स्किन केअर प्रॉडक्ट वापरावे, अन्यथा त्वचा अधिकच निस्तेज आणि कोरडी पडून जाते. याशिवाय वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे, धूळ, माती, प्रदूषणामुळे त्वचेवर घाण जमा होऊ लागते. ही घाण त्वचेच्या ओपन पोर्समध्ये जमा झाल्यानंतर चेहरा अतिशय तेलकट आणि चिकट होऊन चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्वचेवरील नाहीशी झालेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी महागड्या स्किन ट्रीटमेंट किंवा इतरही अनेक वेगवेगळे उपाय केले जातात.तसेच धावपळीच्या जीवनशैलीमुळे वारंवार पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही.(फोटो सौजन्य – istock)
महिला पार्लरमध्ये गेल्यानंतर फेशियल किंवा क्लिनअप, इतर महागड्या स्किन ट्रीटमेंट करून घेतात. त्वचेवर वाढलेला कोरडेपणा आणि रुक्ष झालेली त्वचा सुधारण्यासाठी महिला अनावश्यक खर्च करतात. मात्र यामुळे त्वचा काही वेळापुरतीच सुंदर आणि चमकदार दिसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेचा हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. घरगुती पदार्थांचा वापर त्वचेसाठी केल्यास चेहरा नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि सुंदर होईल.
त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करू नये. यासाठी वाटीमध्ये पिकलेले केळ व्यवस्थित मॅश करून घ्यावे. त्यानंतर त्यात चमचाभर दही आणि आवश्यकतेनुसार खोबऱ्याचे तेल टाकून मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण त्वचेवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होईल. याशिवाय त्वचेची हरवलेली चमक पुन्हा मिळेल. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. यामुळे डेड स्किन कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास त्वचा अतिशय उजळदार आणि सुंदर दिसेल.
तरुण वयात डोळ्यांखाली काळे डाग नेमके कशामुळे येतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय
मागील अनेक वर्षांपासून खोबरेल तेलाचा वापर त्वचा आणि केसांसाठी केला जात आहे. यामुळे त्वचा मुलायम आणि सुंदर होते. खोबरेल तेल त्वचा खोलवर मॉइश्चराईज करुन कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. त्वचा मऊ आणि कायम फ्रेश ठेवण्यासाठी केळ्याचा वापर करावा. त्वचेवर वाढलेली डेड स्किन कमी करण्यासाठी दही अतिशय फायदेशीर आहे. दह्याचा फेसपॅक त्वचेसाठी वापरल्यास त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.