
त्वचेच्या सर्व समस्या होतील चुटकीसरशी होतील गायब! पपईच्या सालींचा 'या' पद्धतीने करा वापर
दैनंदिन आहारात नियमित फळांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे पपई. गोड चवीचा पपई लहान मुलांपासून मोठेसुद्धा आवडीने खातात. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर वाटीभर पपईचे सेवन केल्यास पोट भरलेले राहते. घरात पपई आणल्यानंतर गर काढून साल फेकून दिली जाते. मात्र सालीचा सुद्धा वापर करू शकता. पपईच्या गरासोबतच पपईची साल सुद्धा अतिशय गुणकारी आहे. पपईच्या सालीचा वापर त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, पिगमेंटेशन, डार्क स्पॉट आणि काळे डाग कमी करण्यासाठी पपईच्या सालीचा वापर करावा. वाढत्या वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी पपई अतिशय प्रभावी ठरेल. आज आम्ही तुम्हाला पपईच्या सालींचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
पपई स्वच्छ धुवून कापताना त्याची साल सुद्धा हळुवारपणे काढली जाते. काढून घेतलेली साल एकत्र जमा करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर साल २ ते ३ दिवस कडक होईपर्यंत सुकवून घ्या. साल पूर्णपणे कडक झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. तयार केलेली पावडर काचेच्या डब्यात भरून ठेवा.
फेसपॅक तयार करण्यासाठी वाटीमध्ये पपईच्या सालीची पावडर घेऊन त्यात कच्चे दूध, हळद आणि मध घालून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होईल आणि त्वचा अतिशय उजळदार, सुंदर दिसेल. पपईच्या सालीचा फेसपॅक आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा चेहऱ्यावर लावल्यास त्वचेच्या बऱ्याच समस्यांपासून सुटका मिळेल आणि चेहरा अतिशय उजळदार सुंदर दिसेल.
पपईच्या सालीचा वापर त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे नैसर्गिकरित्या एक्सफोलिएशन, मॉइश्चरायझेशन मिळते. तसेच त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी पपईच्या सालींचा वापर करावा. यामध्ये असलेले पापेन नावाचे एन्झाइम त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते आणि त्वचेला तरुण व तेजस्वी ठेवते. यामध्ये असलेल्या नैसर्गिक एक्सफोलिएशन आणि अँटीऑक्सिडंट्समुळे चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी होतात आणि वयापेक्षा त्वचा जास्त तरुण दिसते.